शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
3
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
4
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
5
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
6
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
7
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
8
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
9
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
10
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
11
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
12
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
13
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
14
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
15
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
16
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
17
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
18
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
19
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
20
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

भूखंड वाटले मात्र उद्योगांचा पत्ता नाही

By admin | Updated: December 20, 2014 01:35 IST

स्थानिक औद्योगिक विकास महामंडळाने १७ उद्योजक कंपन्यांना २८ हजार ५८० चौ. मिटर भूखंडाचे वाटप चार महिन्यांपूर्वी केले.

गडचिरोली : स्थानिक औद्योगिक विकास महामंडळाने १७ उद्योजक कंपन्यांना २८ हजार ५८० चौ. मिटर भूखंडाचे वाटप चार महिन्यांपूर्वी केले. मात्र या उद्योजक कंपन्यांनी अजूनपर्यंत या ठिकाणी उद्योग निर्माण करण्याच्या हालचालीसुध्दा सुरू केल्या नाहीत. उद्योग निर्मितीसाठी जमीन वाहतुकीची सुविधा, ऊर्जा साधणे व मनुष्यबळ अत्यंत महत्त्वाचा आहे. या चारही बाबी एका ठिकाणी मिळणे अशक्य असल्याने उद्योग निर्मितीत अडचणी निर्माण होतात. या समस्या उद्योजकाला निर्माण होऊ नये यासाठी राज्य शासनाने एमआयडीसीची स्थापना केली आहे. गडचिरोली येथील एमआयडीसी शहराच्या अगदी जवळ आहे. एमआयडीसीसाठी शेकडो एकर जागा आरक्षित करण्यात आली आहे. गडचिरोली येथील एमआयडीसीमध्ये एकूण १४८ भूखंड आहेत. उद्योग निर्मितीसाठी १७ उद्योजक कंपन्यांनी सहा महिन्यापूर्वी भूखंडांची मागणी केली होती. बऱ्याच दिवसानंतर उद्योजकांनी सकारात्मक प्रतिसाद दर्शविल्याचे लक्षात घेऊन एमआयडीसीच्या प्रशासनाने सर्वच कंपन्यांचे प्रस्ताव मंजूर केले व त्यांना भूखंडांचे वाटप केले. १७ उद्योजकांना २८ हजार ५८० चौरस मिटर जागेचे वाटप केले. भूखंडांचे वाटप करून चार महिन्याचा कालावधी पूर्ण झाला आहे. यापैकी एकाही उद्योजकांनी उद्योग स्थापण करण्यासाठी हालचाल सुरू केली नाही, असे सध्या चित्र आहे. काही महिन्यांपूर्वी गडचिरोली एमआयडीसीतील बरीचशी जागाही सीआरपीएफला लीजवर देण्यात आली होती. त्यावेळी लघू उद्योजकांनी मोठी ओरड केली होती. या पार्श्वभूमीवर गडचिरोलीत १७ उद्योजकांना भूखंड वितरित करण्यात आल्याची ही आनंदायी बाब ठरणार आहे. हे उद्योग सुरू झाल्यास येथे काही प्रमाणात रोजगार निर्मिती होईल, अशी आशा आहे.