शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

वाकडी मार्गाची दुर्दशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2017 00:40 IST

चामोर्शी तालुक्यातील लखमापूर बोरी- वाकडी हा मार्ग पूर्णपणे उखडला असून गिट्टी बाहेर पडली आहे. त्यामुळे या मार्गावरून ये- जा करणाºया नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.

ठळक मुद्देनागरिक त्रस्त : अर्धवट डांबरीकरण झाल्याने उद्भवली समस्या

लोकमत न्यूज नेटवर्कलखमापूर बोरी : चामोर्शी तालुक्यातील लखमापूर बोरी- वाकडी हा मार्ग पूर्णपणे उखडला असून गिट्टी बाहेर पडली आहे. त्यामुळे या मार्गावरून ये- जा करणाºया नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. या मार्गाचे खडीकरण करून डांबरीकरण करावे, अशी मागणी येथील नागरिकांकडून होत आहे.लखमापूर बोरी ते वाकडीपर्यंत तीन किमीचे अंतर आहे. दोन गावांमध्ये घनदाट जंगल असून मधोमध मोठा नाला आहे. लखमापूर बोरी हे मोठे गाव असल्याने वाकडी येथील नागरिकांना विविध कामांसाठी लखमापूर बोरी येथे नियमित यावे लागते. १० ते १५ वर्षांपूर्वी रोहयोच्या माध्यमातून या रस्त्याची निर्मिती करण्यात आली. त्यानंतर २०१५ मध्ये लखमापूर बोरीपासून नाल्यापर्यंत डांबरीकरण करण्यात आले. परंतु सदर डांबरीकरण अर्धवट झाले. सध्या दोन किमी रस्ता डांबरीकरणाशिवाय असल्याने या मार्गावरील गिट्टी पूर्णत: उखडलेली आहे. विशेष म्हणजे पुलाजवळ मोठा खड्डा पडून वाहतुकीस अडथळा होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.नाल्यावर पुलाची प्रतीक्षालखमापूर बोरी येथील शेतकºयांच्या जमिनी नाल्याच्या पलिकडे आहेत. शेतात उत्पादित झालेला माल घरापर्यंत नाल्यातून आणण्याकरिता कसरत करावी लागते. अनेक वर्षांपासून पुलाचे बांधकाम करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. परंतु नागरिकांच्या मागणीकडे दुर्लक्ष होत आहे. लोकप्रतिनिधींनी येथे पूल बांधकाम करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु अनेक वर्षांचा कालावधी उलटूनही पुलाचे बांधकाम झाले नाही. शाळेत जाणाºया विद्यार्थ्यांनाही त्रास सहन करावा लागत आहे.