नक्षली पत्रके, बॅनर आढळले : रेपनपल्ली-गुडेरा मार्गावरगडचिरोली : येत्या २ डिसेंबरपासून नक्षल्यांच्या पीएलजीए स्थापना सप्ताहास सुरुवात होत असून, नक्षल्यांनी ठिकठिकाणी बॅनर व पत्रके टाकून सप्ताह साजरा करण्याचे आवाहन केले आहे.दरवर्षी नक्षलवादी २ ते ८ डिसेंबरपर्यंत पीपल्स लिबरेशन गुरिल्ला आर्मीचा स्थापना सप्ताह साजरा करतात. या सप्ताहादरम्यान ते हिंसक कारवाया करतात. सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर नक्षल्यांनी जंगलव्याप्त भागात बॅनर बांधून व पत्रके टाकून सप्ताह साजरा करण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. सिरोंचा-आलापल्ली मुख्य मार्गावर रेपनपल्ली-गुडेरा दरम्यानच्या रस्त्यावर रविवारी अशाप्रकारचे बॅनर व पत्रके आढळून आली. त्यात पीएलजीए सप्ताह साजरा करा, हवाई हल्ल्यांचा विरोध करा, सलवा जुडूम-२ चा विरोध करा, असे आवाहन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे. (प्रतिनिधी)
२ डिसेंबरपासून नक्षल्यांचा पीएलजीए सप्ताह
By admin | Updated: November 30, 2015 01:14 IST