शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

प्लॅटिनमची हेमानी जिल्ह्यात अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2018 23:49 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या निकालात यावर्षीही मुलींनीच बाजी मारली आहे. जिल्ह्यातून सर्वाधिक गुण घेणाऱ्या पहिल्या ३ क्रमांकात ४ मुली आणि एका मुलाचा समावेश आहे.

ठळक मुद्देजिल्ह्याचा निकाल ८५.८९ टक्के : पहिल्या तीन क्रमांकांवर ५ पैकी ४ मुलीच

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या निकालात यावर्षीही मुलींनीच बाजी मारली आहे. जिल्ह्यातून सर्वाधिक गुण घेणाऱ्या पहिल्या ३ क्रमांकात ४ मुली आणि एका मुलाचा समावेश आहे. गडचिरोली शहरातील प्लॅटिनम ज्युबिली शाळेच्या मार्टिना मन्सूर हेमानी हिने ९६.४० टक्के गुण घेऊन जिल्ह्यात प्रथम येण्याचा बहुमान पटकावला. यासोबतच जिल्ह्यातून द्वितीय क्रमांक याच शाळेच्या संस्कृती दासरवार आणि सृष्टी दुधबावरे (९५.८० टक्के) यांनी तर तृतीय क्रमांक प्लॅटिनमचीच मिनाक्षी परतानी आणि शिवाजी विद्यालयाचा प्रशांत दिवाकर पिपरे (९५.६०) यांनी पटकावला आहे.यावर्षी दहावीची परीक्षा देणारे जिल्ह्यातील ८५.८९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. १५ हजार ९७० विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी १३ हजार ७१७ विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. त्यातील १४०८ विद्यार्थी प्रावीण्य श्रेणीत आले आहेत. या परीक्षेत मुलांपेक्षा मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण जास्त आहे. ८३.७८ टक्के मुले तर ८८.१६ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. त्यामुळे सावित्रीच्या लेकींनी पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.जिल्ह्यातील ४४ शाळांमधील विद्यार्थी यावर्षी १०० टक्के उत्तीर्ण झाले आहेत तर दोन शाळांना भोपळा (शून्य टक्के निकाल) मिळाला आहे. विशेष म्हणजे १०० टक्के निकाल देणाºया शाळांमध्ये चार शासकीय मराठी आश्रमशाळा आणि आदिवासी प्रकल्प कार्यालयाद्वारे संचालित एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेचाही समावेश आहे.दुपारी १ वाजता निकाल लागताच शहरातील विविध शाळांनी आपल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा शाळेच्या वतीने सत्कार केला. दुर्गम भागात मात्र अनेक ठिकाणी इंटरनेटची सुविधा योग्य नसल्यामुळे विद्यार्थ्यांना आॅनलाईन निकाल पाहण्यासाठी ताटकळत राहावे लागले.प्लॅटिनम ज्युबिली हायस्कूलने मारली बाजीराज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक व शिक्षण मंडळाच्या बारावी आणि दहावीच्या परीक्षेत प्लॅटिनम ज्युबिली शाळेने आपले वर्चस्व सिद्ध केले. बारावीच्या परीक्षेत जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकावण्याचा बहुमान या शाळेच्या विद्यार्थ्याने पटकावला होता. त्यानंतर दहावीतही याच शाळेच्या विद्यार्थ्यांनी जिल्ह्यातून प्रथम, द्वितीय व तृतीय स्थान पटकावून आपले वर्चस्व कायम ठेवले. एवढेच नाही तर ९० टक्केपेक्षा जास्त गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये सर्वाधिक विद्यार्थी याच शाळेचे आहेत. अनुभवी शिक्षकवृंद आणि विद्यार्थ्यांवर घेतली जाणारी मेहनत यामुळे हे शक्य झाल्याची भावना या शाळेचे सचिव अजिज नाथानी यांनी व्यक्त केली.मार्टिना हेमानी प्रशासकीय सेवेत जाणार९६.४० टक्के घेऊन जिल्ह्यातून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा बहुमान पटकावणाºया प्लॅटिनम ज्युबिली स्कूलच्या मार्टिना मन्सूर हेमानी हिला भारतीय प्रशासकीय सेवेत जायचे आहे. मात्र तत्पूर्वी एमबीबीएस आणि एमडी करण्याचा मनोदय तिने ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला. वडील व्यापारी असले तरी गृहिणी असलेली आई उच्च शिक्षित असल्यामुळे तिला शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळाले. मात्र लहान भाऊ अगदी दिड वर्षाचा असल्यामुळे दहावीचा अभ्यास करताना तिला घरी बºयाच अडचणी येत होत्या. अपेक्षित लक्ष्य गाठू शकणार की नाही या भितीने तिला ग्रासले होते. मात्र शाळेचे प्राचार्य रहीम आमलानी यांनी प्रोत्साहन देत शाळेतच अभ्यासाची सोय केली. शाळेचे वर्ग ११ ते ५ असले तरी मार्टिना सकाळी ७.३० पासून शाळेच्या वाचनालयात येऊन अभ्यास करायची. त्यामुळे पुन्हा आत्मविश्वास वाढला आणि हे यश गाठता आले. त्यामुळे माझ्या यशाचे खरे मानकरी प्राचार्य आमलानी हेच असल्याचे मार्टिनाने आपली प्रतिक्रिया देताना सांगितले.

टॅग्स :SSC Results 2018दहावी निकाल २०१८