शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोलीत शिक्षिकेच्या प्रसंगावधानाने टळले बालिकेचे अपहरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 20:48 IST

शहरातील एका कॉन्व्हेंट स्कूलमधून तीन वर्षीय बालिकेचे अपहरण करण्याचा प्रयत्न झाला. शाळेच्या शिक्षिकेने समयसूचकता दाखवत बालिकेच्या वडिलांना फोन करून माहिती दिल्याने अपहरणकर्त्यांचा डाव फसला.

ठळक मुद्देदेसाईगंजमध्ये खळबळ१० दिवसातील दुसरी घटना

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : शहरातील ब्रह्मपुरी मार्गावरील एका कॉन्व्हेंट स्कूलमधून तीन वर्षीय बालिकेचे अपहरण करण्याचा प्रयत्न झाला. शाळेच्या शिक्षिकेने समयसूचकता दाखवत बालिकेच्या वडिलांना फोन करून माहिती दिल्याने अपहरणकर्त्यांचा डाव फसला.प्राप्त माहितीनुसार, देसाईगंज शहरातील उद्योजक आकाश अग्रवाल यांच्या एकुलत्या एक तीन वर्षीय कन्येला पालकांनी नेहमीप्रमाणे गुरूवारी (दि.१५) ब्रम्हपुरी रोडवरील लिटील फ्लॉवर स्कूलमध्ये सोडून दिले. सकाळी ११.५० च्या दरम्यान चेहरा दुपट्ट्याने बांधलेले दोन इसम दुचाकीवरून शाळेत आले. नायरा अग्रवालला नेण्यासाठी आलो आहोत अशी बतावणी त्यांनी केली. मात्र शिक्षिका अनिसा लालानी यांनी नायराचे वडील आकाश अग्रवाल यांना विचारुन सांगते, असे म्हणून त्या आत गेल्या आणि मोबाईलवरून अग्रवाल यांना नायराला घेण्यासाठी कोणाला पाठविले का, असे विचारले. मात्र आपण कोणालाही पाठविले नसून रोज तिची आजी तिला घेण्यासाठी येते. आम्ही कुणालाही पाठवले नाही, असे उत्तर मिळाल्याने शिक्षिका लालानी त्या इसमांना पाहण्यासाठी बाहेर आल्या. मात्र त्या बाहेर येण्यापूर्वीत दुचाकीवरून आलेले ते दोघेही पसार झाले होते. त्यामुळे नायराचे अपहरण करण्याचा त्यांचा डाव होता, हे स्पष्ट झाले.६ फेब्रुवारीला आंबेडकर वॉर्डातील नगर परिषद शाळेतील पाच विद्यार्थ्यांचे अपहरण करुन सहा बुरखाधारी अपहरणकर्त्यांनी अनिकेत शाळेच्या मागील भाटीया पटेल यांच्या शेतातील ओसाड घरात त्यांना तब्बल पाच तास डांबून ठेवले होते, मात्र अपहरणकर्त्यांची गाडी वेळेवर न आल्याने अपहरण करण्यासाठीचा डाव उधळल्या गेला होता. त्या प्रकरणाला १० दिवस लोटत नाही तोच पुन्हा अपहरणाचा प्रयत्न करण्याची घटना घडल्यामुळे देसाईगंज शहरात अपहरण करणारी टोळी सक्रिय असण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. पोलीस त्यांना केव्हा शोधून काढतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अपहरकर्ते ओळखीचेच?अग्रवाल यांच्या मुलीला जवळचे नातेवाईक व मित्रपरिवारात परी या नावानेच ओळखतात. नायरा हे तिचे शाळेतील नाव आहे. हे नाव फक्त घरातील मंडळी व शाळेच्या शिक्षिकांनाच माहित आहे. मात्र नायराला नेण्यासाठी आलेल्या त्या दोन इसमांनी थेट ‘नायरा’ हिला घेण्यासाठी आम्हाला पाठविले असे सांगितल्याने ते कुणीतरी ओळखीतलेच असावे, अथवा संपूर्ण माहिती काढलेल्या व्यक्तीने हे कटकारस्थान रचले असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

टॅग्स :Crimeगुन्हाKidnappingअपहरण