लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली नगर पालिकेंतर्गत २५ वार्डातील विविध भागात मोकाट डुकरांचा वावर गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात वाढला आहे. परिणामी शहराच्या बहुतांश भागात अस्वच्छता दिसून येते. डुकरांचा वावर व अस्वच्छतेमुळे गडचिरोली शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मात्र शहरात मोकाट फिरणाºया डुकरांचा बंदोबस्त करण्याबाबत पालिका प्रशासनाचे प्रयत्न तोकडे पडत आहेत.शहरातील गोकुलनगर, आशीर्वाद नगर, कन्नमवार नगर, लांजेडा, इंदिरा नगर, फुले वार्ड, चनकाई नगर आदी भागात नेहमी मोकाट डुकरे फिरताना दिसून येतात. बºयाचदा मुख्य मार्गावरही डुकरे फिरत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत असतो.नाली, गटारे तसेच कचºयाचे डम्पिंग यार्ड बनलेल्या रिकाम्या भूखंडात मोकाट डुकरे सकाळपासूनच फिरत असतात. पहाटेच्या सुमारास फिरावयास जाणाºया नागरिकांना याचा त्रास होत आहे. पालिकेने ठिकठिकाणी ठेवलेल्या कचराकुंडी परिसरात डुकरे हैदोस घालित असल्याने रोगाचा प्रसार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मोकाट डुकरांमुळे मुख्य रस्त्यांवर बºयाचदा वाहनांना अपघातही घडले आहेत. त्यामुळे गडचिरोली पालिका प्रशासनाने शहरातील डुकरांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.न.प. कर्मचाºयांमार्फत डुकरांच्या बंदोबस्ताचे काम सुरू आहे. आठ दिवसांपूर्वी कर्मचाºयांच्या पथकाने आठ मोकाट डुकरे पकडून जंगलात सोडली. मोकाट डुकरांचा बंदोबस्त करण्याबाबत न.प.चा ठराव आहे. या कामासाठीची टेंडर प्रक्रिया राबविण्याचा प्रयत्न होता. मात्र सदर कामासाठी कोणीही व्यक्ती तयार होत नसल्याने हे काम कर्मचाºयांमार्फत सुरू आहे.- कृष्णा निपाने, मुख्याधिकारी,नगर पालिका, गडचिरोलीपालिका असंवेदनशील-सतीश विधातेशहराच्या बहुतांश वार्डात गेल्या अनेक दिवसांपासून मोकाट डुकरांचा वावर वाढला आहे. सदर मोकाट डुकरे पहाटेपासूनच नाली, गटारे, मोकळे अस्वच्छ भूखंडाच्या परिसरात फिरत असतात. त्यामुळे अनेक भागात स्वच्छतेचा फज्जा उडाला आहे. डुकरांचा वावर वाढल्याने स्वाईन फ्लू सारखा मोठा आजार पसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपण १९ आॅगस्ट रोजी पालिकेच्या मुख्याधिकाºयांना लेखी निवेदन देऊन मोकाट डुकरांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. मात्र पालिकेतर्फे याबाबत केवळ थातूरमातूर कारवाई केली जात आहे. मोकाट डुकरांचा पूर्ण बंदोबस्त करण्याबाबत पालिका प्रशासन प्रचंड असंवेदनशील आहेत, असा आरोप काँग्रेसचे शहर अध्यक्ष तथा नगरसेवक सतीश विधाते यांनी केला आहे.ठोस कृतीची गरजनगर पालिका कर्मचाºयांच्या वतीने शहरात डुकरांच्या बंदोबस्ताचे काम केले जात असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगितले जात आहे. पकडलेले डुकर शहरालगतच्या जंगलात सोडल्यानंतर ही डुकरे पुन्हा शहराच्या विविध वार्डात येऊन फिरत असतात. त्यामुळे मोकाट डुकरांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यासाठी पालिका प्रशासनाने कठोर निर्णय घेऊन ठोस कृती करण्याची गरज आहे. अन्यथा रोगराईला आमंत्रण मिळेल.
डुकरांच्या हैदोसाने गडचिरोलीकर त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2017 23:50 IST
गडचिरोली नगर पालिकेंतर्गत २५ वार्डातील विविध भागात मोकाट डुकरांचा वावर गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
डुकरांच्या हैदोसाने गडचिरोलीकर त्रस्त
ठळक मुद्देअस्वच्छतेने दुर्गंधी वाढली : पालिका प्रशासनाचे प्रयत्न पडताहेत तोकडे; शहरवासीयांचे आरोग्य धोक्यात