शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

रिक्त पदांमुळे पीएचसी खिळखिळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2020 05:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कमलापूर : अहेरी तालुक्याच्या अतिदुर्गम व नक्षलग्रस्त भागात असलेल्या कमलापूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैैद्यकीय अधिकारी गट ...

ठळक मुद्देकमलापुरातील स्थिती : वैद्यकीय अधिकाऱ्यासह आरोग्य कर्मचाऱ्यांची सात पदे रिक्त

लोकमत न्यूज नेटवर्ककमलापूर : अहेरी तालुक्याच्या अतिदुर्गम व नक्षलग्रस्त भागात असलेल्या कमलापूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैैद्यकीय अधिकारी गट ‘ब’ या प्रवर्गासह प्रयोगशाळा तंत्रज्ञ व अन्य आरोग्य कर्मचाºयांची एकूण सात पदे रिक्त असल्याने सेवेवर परिणाम झाला आहे. परिणामी यामुळे आरोग्य सेवा खिळखिळी झाली आहे.कमलापूर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत एक आरोग्य पथक, नऊ उपकेंद्राचा समावेश आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत १८ हजार ९०० एवढी लोकसंख्या आहे. या व्यतिरिक्त आरोग्य केंद्रात दररोज ओपीडीमध्ये रूग्णांवर औषधोपचार करण्यासाठी विविध १६ पदे मंजूर आहेत. यामध्ये गट ‘अ’ व ‘ब’ प्रवर्गाचे दोन वैद्यकीय अधिकारी, एक आरोग्य सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, कनिष्ठ लिपीक, औषध निर्माण अधिकारी, दोन आरोग्य सहायक, एक आरोग्य सहायिका, नेत्र चिकित्सक, वाहन चालक, तीन परिचर, एक सफाईगार आदी पदांचा समावेश आहे.या आरोग्य कर्मचाºयांच्या भरवशावरच रूग्णांवर उपचार करणे शक्य आहे. मात्र येथे मागील काही महिन्यांपासून गट ‘ब’ प्रवर्गाचे वैद्यकीय अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, कनिष्ठ लिपीक, नेत्र चिकित्सक, वाहन चालक, दोन परिचर आदी सात पदे रिक्त आहेत. या कर्मचाऱ्यांची कामे अन्य कर्मचाऱ्यांना करावी लागत असल्याने त्यांच्यावर अतिरिक्त कामाचा ताण आहे.प्राथमिक आरोग्य केंद्र, आरोग्य पथक व उपकेंद्रातील बहुतांश पदे रिक्त असल्याने रूग्णांवर वेळीच उपचार होण्यासाठी अडचणी येतात. त्यामुळे रूग्णांना मनस्ताप सहन करावा लागतो. लोकसंख्येचा विचार करता कमलापूर येथे गट ‘ब’ च्या वैद्यकीय अधिकाºयांची नियुक्ती लवकर करणे आवश्यक आहे. परंतु याकडे दुर्लक्ष होत असल्याने आरोग्य सेवेचा बोजवारा पुढील काळात उडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

टॅग्स :hospitalहॉस्पिटल