शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोल दरवाढ हे काँग्रेसचेच पाप; रावसाहेब दानवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 18:15 IST

पेट्रोल दरवाढ म्हणजे काँग्रेसचेच पाप आहे, असा आरोप करून तत्कालीन काँग्रेस सरकारने इंधनाचे दर आंतरराष्ट्रीय दराशी लिंक केल्यामुळे भारतात पेट्रोलचे दर एवढे वाढले आहे, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केला.

ठळक मुद्देयुतीसाठी शिवसेनेसोबत बोलणी सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : सततच्या पेट्रोल दरवाढीने सामान्य लोकच नाही तर आम्हीसुद्धा त्रस्त आहोत. आम्ही संवेदनशिल असल्यामुळे आम्हालाही त्याची झळ जाणवते. पण ही दरवाढ म्हणजे काँग्रेसचेच पाप आहे, असा आरोप करून तत्कालीन काँग्रेस सरकारने इंधनाचे दर आंतरराष्ट्रीय दराशी लिंक केल्यामुळे भारतात पेट्रोलचे दर एवढे वाढले आहे, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केला.सर्व लोकसभा मतदार संघात बुथ प्रमुखांच्या नियुक्तीचा आढावा घेण्यासाठी दौऱ्यावर असलेल्या दानवे यांनी शनिवारी (दि.२७) गडचिरोलीत पदाधिकाºयांची बैठक घेतली. त्यानंतर आयोजित पत्रपरिषदेत त्यांनी भाजपच्या निवडणूक तयारीची माहिती दिली. यावेळी खासदार तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष अशोक नेते, जि.प.अध्यक्ष योगिता भांडेकर, आ.डॉ.देवराव होळी, आ.कृष्णा गजबे, आ.संजय पुराम, आ. कीर्तीकुमार भांगडिया, नगराध्यक्ष योगिता पिपरे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.यावेळी दानवे म्हणाले, निवडणुकीसाठी राज्यात ९१ हजार ४०० बूथ आहेत. त्यापैकी ८८ हजार बूथ प्रमुखांची नेमणूक भाजपने केली आहे. त्यातील ८३ हजार प्रमुखांशी प्रत्यक्ष फोनवर बोलून त्यांच्या नियुक्तीची खात्री झाली आहे. प्रत्येकी १० ते १२ घरे सांभाळणारे ७५०० कार्यकर्ते प्रत्येक विधानसभा मतदार संघात तयार केले जात आहे. याशिवाय पूर्णवेळ विस्तारक सक्रिय आहेत. अनेक वर्षेपर्यंत तिसऱ्या-चौथ्या स्थानावर राहणाऱ्या भाजपला २०१४ च्या लोकसभा-विधानसभा निवडणुकांमध्ये मिळालेले यश मोदींमुळे मिळाले हे खरे असले तरी मोदी हे भाजपपासून वेगळे नाहीत. त्यामुळे हे यश भाजपचेच आहे. २०१९ च्या निवडणुकीतही असेच यश मिळेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.शिवसेना हा आमचा नैसर्गिक मित्र असल्याने युती होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. मात्र युतीसंदर्भात कोणते निकष राहील हे उघड करण्यास दानवे यांनी नकार दिला. त्या निकषांबद्दल आम्ही त्यांच्याशीच चर्चा करणार असून आमचे आतून बोलणे सुरू असते, असेही दानवे म्हणाले.

दुष्काळी तालुक्यांची संख्या वाढू शकतेसध्या जाहीर केलेली दुष्काळसदृश तालुक्यांची संख्या ही नजरअंदाज पैसेवारीवर जाहीर केली आहे. पीकांची परिस्थिती वाईट असणारे अनेक तालुके त्यातून सुटले आहेत. मात्र पुढे दुसऱ्या टप्प्यात तेही तालुके दुष्काळसदृश म्हणून जाहीर होऊ शकतात, अशी माहिती यावेळी रावसाहेब दानवे यांनी दिली.

टॅग्स :raosaheb danveरावसाहेब दानवे