शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
3
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
4
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
5
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
6
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
7
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
8
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
9
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
10
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
11
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
12
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
13
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
14
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
15
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
16
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
17
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
18
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
19
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
20
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत

परवानगी एकीकडची, झाडे तोडली दुसरीकडची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2019 06:00 IST

यासंदर्भात वरिष्ठांकडे केलेल्या तक्रारीत या प्रकरणाची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. त्यात नमुद केल्यानुसार जुना खसरा नं.४६ ची आराजी १.१९ हेक्टर शासनाची जमीन होती. देसाईगंजच्या महसूल अधिकाऱ्यांनी ती जमीन मामला क्र.५३ एनलएनडी १९७४-७५ अन्वये शेतीच्या उपयोगासाठी शेतमालक शामराव जांभुळकर यांना पट्ट्याद्वारे वाटपात दिली. त्यात ४५ सागाची झाडे असून त्यावर सरकारची मालकी असल्याची स्पष्ट नोंद आहे.

ठळक मुद्देकंत्राटदाराचा प्रताप । वनाधिकाऱ्यांची डोळेझाक

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : आरमोरी तालुक्यातील मौजा नरचुली येथे वनजमिनीचा पट्टा मिळालेल्या शेतात असलेल्या सागवानाच्या झाडांचा परवाना काढून लगतच्या राखीव वनातील काही झाडांची कटाई करून परस्पर हैदराबादला विकल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार शेतकऱ्याला हाताशी धरून कंत्राटदाराने केला असून वनविभागाच्या काही अधिकाऱ्यांकडून त्याकडे हेतुपूरस्सर डोळेझाकपणा केला जात असल्याचा आरोप नरचुलीचे सरपंच संदीप भेवर आणि एस.डब्ल्यू.कोल्हे यांनी केला आहे.यासंदर्भात वरिष्ठांकडे केलेल्या तक्रारीत या प्रकरणाची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. त्यात नमुद केल्यानुसार जुना खसरा नं.४६ ची आराजी १.१९ हेक्टर शासनाची जमीन होती. देसाईगंजच्या महसूल अधिकाऱ्यांनी ती जमीन मामला क्र.५३ एनलएनडी १९७४-७५ अन्वये शेतीच्या उपयोगासाठी शेतमालक शामराव जांभुळकर यांना पट्ट्याद्वारे वाटपात दिली. त्यात ४५ सागाची झाडे असून त्यावर सरकारची मालकी असल्याची स्पष्ट नोंद आहे. गावाच्या पुनर्मोजणीतही सदर सागवाच्या झाडांवर सरकारची मालकी असल्यो नमूद आहे. त्या खसरा नंबर, गट नंबरला लागून पूर्वेस, उत्तरेस आणि दक्षिणेस वनखात्याचे संरक्षित मोठ्या झाडांचे जंगल आहे. दरम्यान कंत्राटदारान शेतमालकाचे मुलाला हाताशी धरून आरमोरीचे उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयातील सर्व्हेअरसोबत हातमिळवणी करून कच्चा रस्ता खसरा नं.जुना ४६ मध्ये दर्शविला आहे. त्यात पश्चिमेकडील जमीन कमी करून त्याऐवजी वनखात्याची मोठी झाडे असलेले अंदाजे ०.४० आर क्षेत्र दिलीप शामराव जांभुळकर यांच्या नावाने नकाशात टाकून जागा मोजणीचा चुकीचा नकाशा दिल्याचा आरोप तक्रारीत केला आहे. हा प्रकार कंत्राटदार मोहन सोनटक्के यांच्या पुढाकाराने झाल्याचा ठपका तक्रारर्त्यांनी ठेवला आहे.चुकीच्या नकाशाच्या आधारे वन सर्व्हेक्षक माडुरवार यांनी ठेकेदाराशी हातमिळवणी करून सिमेवरील झाडांना हॅमर मारून शेतमालकाच्या जमिनीची चुकीची हद्द ११ मार्च २०१९ ला कायम केली. त्यात मोठ्या झाडांच्या जंगलाचे गट नं.७३ झाडांचे क्षेत्र शेतकºयाच्या नावे दाखविले. दरम्यान उपलब्ध अधिकार अभिलेख पंजीत ४५ सागवानी झाडांवर सरकारची मालकी आहे व तलाठ्याचे प्रतिवेदन पट्ट्याने दिल्याबाबतची नोंद असताना सुद्धा ५१ साग व ३ बिजा झाडांच्या तोडाईस ८ एप्रिल २०१९ रोजी दिलेली परवानगी बेकायदेशिर ठरत आहे. यात सहायक वनसंरक्षक व्ही.जी.साबळे यांनी ठेकेदाराशी हातमिळवणी केल्याचा आरोप तक्रारकर्त्यांनी केला आहे. या प्रकरणात चुकीची झाडे तोडून शासनाचे १५ लाख रुपयांचे नुकसान केले असून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.कापलेली झाडे शेतकऱ्याच्या मालकीची आहेत. भूमिअभिलेख कार्यालयाच्या नोंदीनुसार त्यावर शेतकºयाचा अधिकार आहे. त्याची तपासणी करूनच शेतकऱ्याला लाकडांच्या वाहतुकीची परवानगी देण्यात आली.- व्ही.जी.साबळे,सहायक वनसंरक्षक

टॅग्स :forest departmentवनविभाग