शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
4
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
5
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
6
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
7
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
8
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
9
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
10
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
11
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
12
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
13
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
14
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
15
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
16
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
17
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
18
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
19
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
20
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
Daily Top 2Weekly Top 5

मिरची उत्पादक संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2020 05:00 IST

तालुक्यातील कोटापल्ली, रेगुंठा, नरसिंहापल्ली, मोयाबिनपेठा या भागातील शेतकरी दरवर्षी आपल्या शेतात मोठ्या प्रमाणात मिरची पिकाची लागवड करतात. यावर्षी सुद्धा या भागातील शेतकऱ्यांनी मिरचीचे उत्पादन बऱ्यापैकी घेतले आहे. झाडाची मिरची पिकल्यानंतर त्याची तोडणीसुद्धा मजुरांकडून करण्यात आली आहे. तोडलेल्या मिरचीचे ढीग शेतशिवारात करण्यात आले आहे.

ठळक मुद्देशेतात व घरी पडून : कोरोनाच्या संचारबंदीने वाहतूक व विक्री थांबली

कौसर खान ।लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : कोरोनाच्या संचारबंदीने दळणवळण, वाहतूक व बाजारपेठ बंद असल्याने सिरोंचा तालुक्यातील मिरची उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत. लाखो रूपयांची गुंतवणूक करून पिकविलेली लाल मिरची विक्रीअभावी शेतशिवार तसेच घरी पडून आहे. यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांवर संकट कोसळले आहे.तालुक्यातील कोटापल्ली, रेगुंठा, नरसिंहापल्ली, मोयाबिनपेठा या भागातील शेतकरी दरवर्षी आपल्या शेतात मोठ्या प्रमाणात मिरची पिकाची लागवड करतात. यावर्षी सुद्धा या भागातील शेतकऱ्यांनी मिरचीचे उत्पादन बऱ्यापैकी घेतले आहे. झाडाची मिरची पिकल्यानंतर त्याची तोडणीसुद्धा मजुरांकडून करण्यात आली आहे. तोडलेल्या मिरचीचे ढीग शेतशिवारात करण्यात आले आहे. काही शेतकऱ्यांनी मिरची उन्हात वाळल्यानंतर मिरची घरी असलेल्या ढोलीमध्ये सुरक्षितरित्या ठेवली आहे. बऱ्याच शेतकऱ्यांनी मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात शहरातील व्यापाऱ्यांना मिरची विकण्याचा प्रयत्न केला. मात्र मिरचीची विक्री करता आली नाही. त्यानंतर महाराष्ट्रासह देशभरात कोरोनाचे संकट उद्भवले. संचारबंदी व बाजारपेठ बंदमुळे शेतमालाची वाहतूक थांबली. उत्पादित मिरची विक्रीअभावी पडून असल्याने सिरोंचा तालुक्यातील मिरची उत्पादक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. लालरंगाची मिरची पांढरी पडत असून भाव कमी मिळण्याच्या चिंतेने शेतकरी त्रस्त झाले आहेत.माल नेण्याची मुभा द्याएक हेक्टर क्षेत्राच्या मिरची पिकासाठी शेतकऱ्यांना दोन ते तीन लाख रूपये खर्च येतो. मोठी गुंतवणूक करूनही मिरची बाजारपेठेत पोहोचू न शकल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. नागपूरच्या मिरची बाजारात सिरोंचातील मिरची नेण्याची मुभा द्यावी, अशी मागणी मिरची उत्पादक शेतकºयांनी केली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसFarmerशेतकरी