शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

सूरजागड प्रकल्पाविरोधात रोष; संतप्त व्यापारी बैठकीत आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2023 12:16 IST

जनआंदोलनाची तयारी: बैठकीत आश्वासनावर बोळवण; धूळ, प्रदूषणातून आरोग्याशी खेळ

आलापल्ली (गडचिरोली) : बेदरकार वाहतूक, रोज शेकडो वाहनांची रेलचेल, गोंगाट, धूळ, प्रदूषण अन् सतत होणारे अपघात यामुळे आलापल्लीकरांचा जीव मेटाकुटीला आला आहे. २० मे रोजी शिक्षकाचा बळी गेल्यानंतर २१ मे रोजी पोलिस अधिकाऱ्यांच्या पुढाकाराने व्यापारी व लॉयड मेटल्स कंपनीच्या प्रतिनिधींची बैठक अहेरीत झाली. यावेळी व्यापारी व स्थानिकांनी सूरजागड लोहखाण प्रकल्पाविरोधात तीव्र संताप व रोष व्यक्त केला.

कंपनीच्या प्रतिनिधींनी केवळ आश्वासनांवर बोळवण केली. त्यामुळे नागरिकांनी जनआंदोलनाची तयारी केली आहे. आलापल्लीहून नागेपल्लीकडे दुचाकीवरून निघालेले आश्रमशाळा शिक्षक वसुदेव मंगा कुळमेथे (वय ४५, रा. नागेपल्ली, ता. अहेरी) यांचा लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना २० मे रोजी घडली. यानंतर व्यापाऱ्यांनी दुकाने बंद करून अधिकाऱ्यांना धारेवर धरले. शिवाय कुळमेथे यांच्या नातेवाइकांनी भररस्त्यात ठिय्या देत राेष व्यक्त केला होता. २१ मे राेजी अहेरीतील प्राणहिता पोलिस कॅम्प येथे बैठक झाली. यावेळी उपअधीक्षक अमोल ठाकूर, पोलिस निरीक्षक किशोर मानभाव, सहायक निरीक्षक विजय चव्हाण, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष चंद्रकिशोर पांडे, सरपंच शंकर मेश्राम, मुनेश्वर हडपे, महावीर अग्रवाल, राजेश गोयल, विजय निमलवार, अज्जू पठाण, विनोद कावेरी, विजय गुप्ता, अमोल कोलपकवार व लॉयड मेटल्स कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.

लोकप्रतिनिधी मूग गिळून गप्प

दरम्यान, सूरजागड खाणीतील लोह वाहतुकीमुळे जिल्ह्यात अपघाताचे सत्र सुरू असताना लोकप्रतिनिधींनी मिठाची गुळणी धरली आहे. खासदारांसह तिन्ही आमदार यावर तोडगा काढण्यासाठी पुढाकार घेत नसल्याने स्थानिकांमध्ये नाराजी आहे. बेदरकार वाहतुकीने सामान्यांचे बळी जात असताना लोकप्रतिनिधी डोळ्यावर पट्टी बांधून का बसलेत, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे. आदिवासी विद्यार्थी संघाचे अजय कंकडालवार व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी कंपनीविरोधात गुन्हा नोंदविण्याची मागणी करून आवाज उठविण्याचा प्रयत्न केला.

या प्रश्नांवर गाजली बैठक....

अहेरीत झालेल्या बैठकीत आलापल्लीतील मुख्य रस्त्याचे डांबरीकरण करावे, जड वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवावे, शाळेच्या वेळेत जड वाहने बंद ठेवावीत, धुळीचा बंदोबस्त करण्यासाठी दररोज स्वच्छता करावी, लोहखनिज वाहतूक करणाऱ्या दोन वाहनांत शंभर मीटर अंतर ठेवावे, रुग्णवाहिका उपलब्ध करावी, आलापल्ली ते नागेपल्लीदरम्यान पथदिवे व सीसीटीव्ही लावावेत, अपघाती मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई द्यावी आदी मागण्या करण्यात आल्या. व्यापाऱ्यांनी आक्रमकपणे मुद्दे मांडले.

...म्हणून स्थानिकांमध्ये नाराजी

यापूर्वी खुद्द जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांनी आलापल्लीत बैठक घेऊन सूरजागड लोहखनिज वाहतुकीमुळे होणारा त्रास व अपघात रोखण्यासाठी उपाय करण्याचे आश्वासन दिले होते. पण काही दिवसांतच स्थानिकांची निराशा झाली. अपघातसत्र , धूळ, प्रदूषणाचा त्रास कमी होत नाही. त्यामुळे आताही केवळ आश्वासने दिली. त्याची पूर्तता होईल की नाही, याची शंका असल्याने स्थानिकांमध्ये नाराजी कायम आहे.

टॅग्स :localलोकलGadchiroliगडचिरोली