शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

मेळाव्यातून शासन लोकांच्या दारी

By admin | Updated: April 11, 2017 01:01 IST

नक्षलग्रस्त भागात सर्वसामान्य जनतेचा सरकार व पोलिसांप्रती विश्वास वाढावा यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातात.

पोलिसांचा पुढाकार : दुर्गम भागात २००५ पासून ११३७ जनजागरण मेळावे गडचिरोली : नक्षलग्रस्त भागात सर्वसामान्य जनतेचा सरकार व पोलिसांप्रती विश्वास वाढावा यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातात. सरकारच्या योजनांचा लाभ सामान्य माणसापर्यंत पोहोचविण्यासाठी पोलीस प्रशासन प्रयत्न करीत आहे. २००५ पासून ते फेब्रुवारी २०१७ पर्यंत गडचिरोली जिल्ह्यात ११३७ जनजागरण मेळाव्यातून पोलीस प्रशासनाने हजारो लोकांशी संवाद साधल्याची माहिती पुढे आली आहे.गडचिरोली जिल्ह्यात १९८० च्या दशकात नक्षलवादी कारवायांच्या उदय झाला. याचा थेट परिणाम विकास प्रक्रियेवर झाला. सुरुवातीच्या काळात दुर्गम व अतिदुर्गम भागात नक्षलवाद्यांच्या विचारांना समर्थन देणाऱ्यांची संख्या अधिक होती. मात्र कालांतराने सरकार व पोलीस यंत्रणेने लोकांशी संवाद वाढविला. यासाठी जनजागरण मेळावे, ग्रामभेटी अशा आयुधांचा वापर केला जाऊ लागला. गडचिरोली या मागास जिल्ह्यात पोलीस हे प्रशासनच मुख्य अंग आहे. त्यामुळे पोलिसांनी या कामात पुढाकार घेतला. २००५ मध्ये ९९, २००६ मध्ये ३९, २००७ मध्ये ४१, २००८ मध्ये २२, २००९ साली ४२, २०१० मध्ये ९, २०११ मध्ये २०, २०१२ मध्ये ५२, २०१३ मध्ये २१३, २०१४ मध्ये १७९, २०१५ मध्ये २१६, २०१६ मध्ये १९६ व २०१७ मध्ये २८ फेब्रुवारीपर्यंत ९ जनजागरण मेळावे पार पडले. या मेळाव्याच्या माध्यमातून केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आली. महसूल प्रशासनाच्या अनेक प्रमाणपत्रांचे वाटप नागरिकांना या मेळाव्याच्या माध्यमातून करण्यात आले. आरोग्य, वन, आदिवासी विकास, पशुसंवर्धन आदी विभागाच्या योजनांची माहिती देऊन त्याचे अर्जही या मेळाव्यातून लाभार्थ्यांकडून भरून घेतले जाऊ लागले. तसेच गावातील तरूण युवक, युवतींसाठी क्रीडा स्पर्धा व विविध स्पर्धांचे आयोजन अलिकडच्या काळात जनजागरण मेळाव्याच्या माध्यमातून केले जाऊ लागले आहे. मेळाव्यात नागरिकांना संसारोपयोगी साहित्यांचेही वितरण केले जात आहे. राज्याचे पोलीस महासंचालक, जिल्हा पोलीस अधीक्षक यांनीही काही जनजागरण मेळाव्यांना हजेरी लावून लोकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सोबत राहून विकास प्रक्रियेला गती देण्याचे आवाहन केले.जनजागरण मेळाव्याच्या वाढत्या प्रमाणामुळे ग्रामीण भागात नक्षलवाद्यांचा दबाव कमी झाल्याचे चित्र दिसून येत आहे. जनजागरण मेळावे व एकूण सोशल पोलिसिंग हे पोलीस यंत्रणेचा कणा असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. (जिल्हा प्रतिनिधी)