महेंद्र रामटेके ।लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : वर्धा जिल्ह्याच्या सावंगी येथूून मोतीबिंदूची शस्त्रक्रिया आटोपून रविवारी आरमोरी येथे परतलेल्या वृद्ध रुग्णांना जनता कर्फ्यूचा मोठा फटका बसला. कर्फ्यूमुळे सर्वच दुकाने, हॉटेल व वाहतुकीची साधने बंद होती. त्यामुळे ४५ रुग्ण आरमोरी येथील उपजिल्हा रुग्णालयात अडकून पडले होते. ही बाब कळताच ताडुरवार नगरातील अनेक युवक वृद्ध रुग्णांच्या मदतीसाठी धावून आले. त्यांनी वर्गणी गोळा करून वृद्धांच्या भोजनाची व्यवस्था केली.सावंगी ते आरमोरी असा पाच ते सहा तासांचा प्रवास करून आलेल्या थकलेल्या व उपाशीपोटी असलेल्या वृद्धांना आजाराची गरज होती. अशावेळी ताडुरवार नगरातील युवकांनी मदतीसाठी पुढाकार घेतला. वर्गणी गोळा करून व स्वत: स्वयंपाक बनवून उपाशीपोटी असलेल्या त्या ४५ वृद्ध रुग्णांना जेवन दिले. कठीण प्रसंगात एक दिवसाचा काही होईना पण त्या वृद्धांचा आधार बनलेल्या त्या युवकाच्या माणुसकीच्या दर्शनाची सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.वर्धा जिल्ह्यातील सावंगी मेघे येथील आचार्य विनोबा भावे रुग्णालयात मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिरासाठी आरमोरी येथील उपजिल्हा रुग्णालयात तपासणी झालेल्या आरमोरी तालुक्यातील अनेक गावातील ४५ वृद्ध महिला व पुरूषांना १६ मार्चला सावंगी मेघे येथे पाठविण्यात आले होते. या सर्व वृद्ध रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया झाल्यानंतर ४५ वृद्ध रुग्णांना रविवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास आरमोरी येथे आणण्यात आले. जवळपास पाच ते सहा तासांचा प्रवास करून ते आले होते. त्यांना येथून स्वगावी जायचे होते. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार रविवारी जनता कर्फ्यू पाळण्यात आला. त्यामुळे वाहतुकींची सर्व साधने व बाजारपेठ बंद होती. लोक आपापल्या घरी असल्याने सर्वत्र शुकशुकाट होता. या परिस्थितीचा सदर वृद्ध रुग्णांना मोठा बसला. वाहतुकीच्या साधनांअभावी त्यांना स्वगावी जाता आले नाही. परिणामी ते उपजिल्हा रुग्णालयात अडकून पडले. ही बाब ताडुरवार नगरातील काही युवकांच्या निदर्शनास आली व युवक वृद्ध रुग्णांच्या मदतीला धावून आले व त्यांच्या भोजनाची व्यवस्था केली.युवकांच्या या माणुसकीने सदर वृद्ध रुग्णही भारावून गेले. या सामाजिक कार्यासाठी ताडुरवार नगरातील रहिवासी राकेश वाटगुरे, मुकुल खेवले, दिनेश कुथे, श्रावण मेश्राम, महेंद्र रामटेके यांच्यासह नेत्रचिकित्सा सहाय्यक डॉ.रवींद्र चिटकुले यांच्या मार्गदर्शनाखाी राहित येरमे, सुरज नैताम, योगेश धकाते, अनिकेत नैताम, भाऊराम मेश्राम, महेंद्र देविकर, रूपेश धकाते, शिवा नैताम, सागर निंबेकर, राहुल मेश्राम, चेतन सोनटक्के, सुनील भांडेकर आदींनी हातभार लावला. युवकांनी केलेल्या या कार्याचे आरमोरी शहरासह तालुक्यात कौतुक केले जात आहे.
वृद्ध रुग्णांसाठी लोकांनी केली भोेजनाची व्यवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2020 05:00 IST
वर्धा जिल्ह्याच्या सावंगी येथूून मोतीबिंदूची शस्त्रक्रिया आटोपून रविवारी आरमोरी येथे परतलेल्या वृद्ध रुग्णांना जनता कर्फ्यूचा मोठा फटका बसला. कर्फ्यूमुळे सर्वच दुकाने, हॉटेल व वाहतुकीची साधने बंद होती. त्यामुळे ४५ रुग्ण आरमोरी येथील उपजिल्हा रुग्णालयात अडकून पडले होते. ही बाब कळताच ताडुरवार नगरातील अनेक युवक वृद्ध रुग्णांच्या मदतीसाठी धावून आले. त्यांनी वर्गणी गोळा करून वृद्धांच्या भोजनाची व्यवस्था केली.
वृद्ध रुग्णांसाठी लोकांनी केली भोेजनाची व्यवस्था
ठळक मुद्देकर्फ्यूमुळे आरमोरीत अडकले : वर्धा, सावंगी येथून मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करून परतले