शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

फेब्रुवारीपर्यंत प्रलंबित प्रश्न मार्गी लावणार

By admin | Updated: December 24, 2015 01:54 IST

गडचिरोली पोलिसांच्या प्रलंबित प्रश्नाबाबत पालकमंत्री व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावून त्यावर फेब्रुवारी २०१६ पर्यंत निर्णय घेतला जाईल,...

राम शिंदे यांची ग्वाही : गृहराज्यमंत्र्यांनी घेतला गडचिरोली पोलीस दलाचा आढावागडचिरोली : गडचिरोली पोलिसांच्या प्रलंबित प्रश्नाबाबत पालकमंत्री व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावून त्यावर फेब्रुवारी २०१६ पर्यंत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती गृहराज्यमंत्री प्रा. राम शिंदे यांनी मंगळवारी गडचिरोली येथे दिली. जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असताना पोलीस विभागाच्या विश्रामगृहात त्यांनी गृह विभागाच्या कामकाजाचा आढावा घेतला.यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी पोलीस दलाच्या वर्ष २०१५ मधील कामगिरीचे पॉवर पार्इंट प्रेझेन्टेशन मंत्री महोदयांसमोर सादर केले. यावेळी पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम, विशेष पोलीस महानिरिक्षक रवींद्र कदम, जिल्हाधिकारी रणजितकुमार, अप्पर पोलीस अधीक्षक मंजूनाथ शिंगे, जिल्हा कारागृह अधीक्षक डॉ. बी. एन. ढोले आदी उपस्थित होते. यावेळी सादरीकरणात पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी ५२ नक्षलवाद्यांनी पोलीस विभागाच्या विविध जनजागृती उपक्रमामुळे आत्मसमर्पण केले, अशी माहिती दिली. वर्षभरात ३० चकमकी झाल्या. २६ नक्षलवाद्यांना अटक करण्यात पोलीस दलाला यश आले. या कालावधीत २४३ किलो ग्रॅमहून अधिक स्फोटक निकामी करण्यात आले. १० ईआयडी पोलिसांनी जप्त केली, असे सांगितले. बंदोबस्तावरील पोलीस दलाची फेररचना तसेच नव्या पोलीस मदत केंद्राची निर्मिती यामुळे गडचिरोलीत नक्षल कारवाया नियंत्रणात ठेवणे शक्य झाले, अशी माहितीही पाटील यांनी दिली. पोलीस दलातील ५४ महिला कर्मचाऱ्यांना नर्सिंग प्रशिक्षण देण्यात आले असून पोलीस दलासोबतच गावकऱ्यांनाही आरोग्य विषयक समस्यांसाठी त्यांची मदत होणार आहे, ही बाब मंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. अग्नीपंख, भरारी योजना, नवजीवन आत्मसमर्पण अभियान यासारख्या योजनांमधून नक्षल कुटुंबाच्या पुनर्वसनाला गती देण्यात आली, असेही पोलीस अधीक्षकांनी यावेळी सांगितले. आत्मसमर्पीत नक्षलवाद्यांच्या निवासासाठी लवकरात लवकर निधी मिळावा, अशी आग्रही मागणी पोलीस अधीक्षकांनी केली. याबाबत तत्काळ प्रस्ताव सादर करून अन्य प्रलंबित मागण्याही शासनाकडे कळवा, असे निर्देश गृहराज्यमंत्र्यांनी दिले. फेब्रुवारी २०१६ पर्यंत हे सारे प्रश्न निकाली काढले जातील, असेही यावेळी नामदार शिंदे म्हणाले. यावेळी पालकमंत्र्यांनीही पोलीस विभागाच्या अनेक प्रश्नांवर गृह राज्यमंत्र्यांशी चर्चा केली. (जिल्हा प्रतिनिधी)