शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात कांजण्यांची साथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 00:55 IST

जिल्हाभरात कांजण्यांची साथ पसरली असून हजारो बालकांना याची लागण झाली आहे. कांजण्याला इंग्रजीमध्ये चिकन पॉक्स असे संबोधले जाते. हा एक सामान्यपणे पसरणारा संसर्गजन्य आजार आहे. लहान मुलांना या रोगाची लागण सर्वाधिक होते.

ठळक मुद्देहजारो बालकांना लागण : ऐन परीक्षेच्या कालावधीत शाळांची पटसंख्या घटली

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्हाभरात कांजण्यांची साथ पसरली असून हजारो बालकांना याची लागण झाली आहे.कांजण्याला इंग्रजीमध्ये चिकन पॉक्स असे संबोधले जाते. हा एक सामान्यपणे पसरणारा संसर्गजन्य आजार आहे. लहान मुलांना या रोगाची लागण सर्वाधिक होते. त्याचबरोबर युवक व वयोवृध्दांनाही या रोगाची लागण होते. जानेवारी महिन्यापासून जिल्ह्यात काजण्याची साथ पसरली आहे. हजारो बालकांना कांजण्याची लागण झाली आहे. कांजण्या झाल्यानंतर संबंधित विद्यार्थ्याला शाळेत पाठविले जात नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांची शाळेतील पटसंख्याही घसरली आहे. रूग्णाशी प्रत्यक्ष संपर्क येणे किंवा हवेमधून काजण्या प्रसार होतो. संसर्ग झाल्यानंतर विषाणूंचा प्रभाव १० ते २१ दिवस राहतो. अंगावर पुरळ येण्यापासून ते पुरळ्यांची खपली निघेपर्यंत रूग्ण विषाणूचा वाहक असतो. पुरळ येऊन खपल्या निघेपर्यंत जवळपास सात दिवस लागतात.कांजण्या हा एक सामान्य आजार आहे. कांजण्या झाल्यानंतर ताप येतो. १२ ते २४ तासांमध्ये पुरळांवर खाज सुटते. पुरळ पाण्याने भरतात. दोन ते पाच दिवसांमध्ये त्यांच्या संख्येत वाढ होते. त्वचेवर जुन्या पुरळांबरोबर नवीन पुरळेही येतच राहतात. कधी कधी शरीराच्या सर्व त्वचेवर पुरळ उठतात. काही रूग्णांमध्ये तोंडाच्या आतील बाजूस नाकामध्ये, कानामध्ये सुध्दा पुरळ येतात. जवळपास २५० ते ५०० पुरळ येणे सर्वसामान्य मानले जाते.कांजण्या हा संसर्गजन्य रोग असल्याने याची लागण झालेल्या बालकाला शाळेमध्ये पाठवू नये, अन्यथा इतर बालकांनाही संसर्ग होण्याची शक्यता राहते. काजण्यासाठी अ‍ॅन्टीबायोटिक औषधी दिली जाते. ही औषधी जिल्ह्यातील सर्वच सरकारी रूग्णालयांमध्ये उपलब्ध आहे. काजण्या झाल्यानंतर डॉक्टरांकडून उपचार करून घ्यावा. पुरळ झाल्यानंतर जंतूसंसर्ग होणार नाही, यासाठी अ‍ॅन्टीबायोटिक औषधी घेणे आवश्यक आहे. कांजण्या झाल्यानंतर बालकाला ताप सुध्दा येत असल्याने पालकांनी मुलाला धीर द्यावा.- डॉ. सुनील मडावी, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी, गडचिरोली

टॅग्स :Healthआरोग्य