शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
2
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
3
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
4
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
5
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
6
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
7
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
8
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
9
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
10
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
11
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
12
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
13
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
14
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
15
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
16
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
17
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
18
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
19
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
20
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!

ओबीसी आरक्षणासाठी शेकापचा चक्काजाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 00:43 IST

गडचिरोली जिल्ह्यात इतर मागासवर्गीयांचे आरक्षण १९ वरून ६ टक्के केले ते पूर्ववत १९ टक्के करावे या प्रमुख मागणीसह धानाला ३५०० रुपये हमीभाव आणि इतर स्थानिक मागण्यांसाठी शेतकरी कामगार पक्षाने (शेकाप) बुधवारी जिल्हा मुख्यालयासह गडचिरोली विधानसभा मतदार संघात ११ ठिकाणी चक्काजाम आंदोलन केले.

ठळक मुद्देशेकडो कार्यकर्ते स्थानबद्ध : जिल्हाभरात ठिकठिकाणी आंदोलनातून वेधले लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात इतर मागासवर्गीयांचे आरक्षण १९ वरून ६ टक्के केले ते पूर्ववत १९ टक्के करावे या प्रमुख मागणीसह धानाला ३५०० रुपये हमीभाव आणि इतर स्थानिक मागण्यांसाठी शेतकरी कामगार पक्षाने (शेकाप) बुधवारी जिल्हा मुख्यालयासह गडचिरोली विधानसभा मतदार संघात ११ ठिकाणी चक्काजाम आंदोलन केले. यावेळी पोलिसांनी शेकडो कार्यकर्त्यांना स्थानबद्ध करून नंतर त्यांची सुटका केली.शेकापचे जिल्हा चिटणीस रामदास जराते, महिला नेत्या जयश्री येळदा, पुरोगामी महिला संघटनेच्या जिल्हा सरचिटणीस अर्चना चुधरी, गडचिरोली तालुका चिटणीस सुधाकर आभारे, श्रीधर मेश्राम, श्यामसुंदर उराडे यांच्या नेतृत्वात जिल्ह्यातील हे आंदोलन करण्यात आले.गडचिरोली शहरात इंदिरा गांधी चौकात दुपारी १२ वाजताच्या सुमारास शेकापच्या कार्यकर्त्यांनी जमून घोषणाबाजी केली. त्यानंतर चारही मार्गावरील वाहतूक रोखून धरली. यामुळे अनेक वाहने खोळंबली होती. दरम्यान पोलिसांनी सर्व आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात स्थानबद्ध केले.गडचिरोली शहरातील आंदोलनापूर्वी काही ठिकाणी सकाळी ९ पासूनच चक्काजाम आंदोलन करण्यात आले. त्यात नागपूर मार्गावरील पोर्ला येथे युवा कार्यकर्ते होमराज उपासे यांच्या नेतृत्वात मंगेश भानारकर, विकास झोडगे, रविंद्र येमगेलवार इतर कार्यकर्त्यांनी, याच मार्गावर नगरी येथे शेकापचे आरमोरी विधानसभा चिटणीस रोहीदास कुमरे, माजी सरपंच मोरेश्वर बांबोळे यांच्या नेतृत्वात जवळपास तासभर आंदोलन झाले.चामोर्शी-मूल मार्गावर रमेश चौखुंडे, दुर्वास म्हशाखेत्री यांच्या नेतृत्वात भेंडाळा येथे सगणापूर, रामाळा, घारगाव, एकोडी, दोटकुली या परिसरातील गावातील कार्यकर्त्यांनी जमून चक्काजाम आंदोलन केले. आष्टी येथे पुरोगामी विद्यार्थी संघटनेचे जिल्हा चिटणीस अक्षय कोसनकर यांच्या नेतृत्वात तर अनखोडा येथे प्रेम कोसनकर यांच्या नेतृत्वात आंदोलन झाले. चामोर्शी येथील मुख्य मार्गावर हत्ती गेटजवळ शेकापचे तालुका चिटणीस दिनेश चुधरी, प्रकाश सहारे अनेक नागरिक या आंदोलनात सहभागी झाले होते.कुनघाडा रै. येथील बस स्थानकावर शेकापचे विधानसभा चिटणीस नरेश मेश्राम, विठ्ठल दुधबळे यांच्या नेतृत्वात बैलबंड्या आडव्या करून चक्काजाम करण्यात आला. यावेळी चामोर्शीचे तहसीलदार बावणे यांनी घटनास्थळी भेट देऊन सदर मागण्या जिल्हा प्रशासनाला कळविण्यात येईल असे आश्वासन दिले.गडचिरोली-चामोर्शी मार्गावरील शिवणी येथे शेकापचे जिल्हा सहचिटणीस वसंत गावतुरे, ओबीसी जागृती अभियानाचे जिल्हा समन्वयक दिनेश बोरकुटे, शेकापचे दत्तू चौधरी यांच्या नेतृत्वात आंदोलन झाले. याशिवाय पोटेगाव मार्गावर गुरवळा येथे शेकापचे जिल्हा सदस्य प्रकाश मंटकवार, तालुका सदस्य चंद्रकांत भोयर यांच्या नेतृत्वात जवळपास ३ तास आंदोलन चालले. विश्रामपूर येथे भिकारमौशी, मरेगाव, कळमटोला, बाम्हणी, आंबेटोला, उसेगाव, बोदली, मेंढा येथील नागरिकांनी सर्कल चिटणीस रोशन नरुले यांच्या नेतृत्वात गडचिरोली-धानोरा मार्ग रोखण्यात आला. याशिवाय जांभळी येथे चातगाव-कारवाफा सर्कल चिटणीस वसंत लोहट यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले.अशा आहेत मागण्याजिल्ह्यातील ओबीसींचे आरक्षण पूर्ववत १९ टक्के करावे, धानाला ३५०० रुपये हमीभाव द्यावा, ढिवर समाजाला मामा तलाव, बोडीतील मासेमारीचे पारंपरिक मालकी हक्क देण्यात यावे, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी व कर्जपुरवठा करण्यात यावा, गडचिरोली जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा.

टॅग्स :OBCअन्य मागासवर्गीय जातीChakka jamचक्काजाम