शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

पीककर्ज भरले, व्याज परतावा केव्हा मिळणार ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2024 15:34 IST

Gadchiroli : सध्या व्याज परताव्याच्या रकमेसाठी शेतकऱ्यांच्या बँकेत चकरा

लोकमत न्यूज नेटवर्क अहेरी : येथील स्थानिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत पीककर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांनी यंदा व्याजासह रक्कम भरणा करून कर्जाचा भार हलका केला. मात्र, खरीप हंगामाची चाहूल लागली असली तरी व्याजाच्या रकमेचा परतावा मिळत नसल्याने नवीन हंगामासाठी पीककर्ज घ्यावे की नाही, याबाबत बळीराजा संभ्रमात आहे. सध्या व्याज परताव्याच्या रकमेसाठी शेतकरी बँकेत हेलपाटे मारत आहेत.

शेतकऱ्यांनी आर्थिक धमणी म्हणून जिल्हा बँकेची ओळख आहे. यंदा बँकेच्या धोरणात बदल झाला असून प्रती तीन लाख रुपयांच्या पीककर्जावर सहा टक्के व्याज व त्यावरील कर्जावर १० टक्के व्याज लावून परतफेड करावे लागले. नियमित भरणा करणाऱ्या कास्तकरांचे यात नुकसान झाले असून ३१ मार्चच्या मुदतीनंतर व्याजाची रक्कम १२ टक्के होणार असल्यामुळे शेतकरी बांधवांची अवस्था इकडे आड, तिकडे विहीर अशी झाली होती. व्याजाची रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यांमध्ये परत मिळणार या आशेने बळीराजाने तडजोड करून रक्कम जुळवली; परंतु अजूनपर्यंत व्याजाच्या रकमेची कोणतीच अधिकृत महिती बँकेत आली नसल्याने शेतकरी वर्ग चिंतेत आहे.

अहेरी, देवलमारी, इंदाराम, आवलमारी, महागाव व राजाराम अशा एकूण सहा आदिवासी सहकारी सोसायट्यांचे जिल्हा बँकेच्या अहेरी शाखेत खाते आहे. सर्व १२४ शेतकऱ्यांनी वेळेत कर्जपरतफेड केली. सुमारे १२ लाख रुपयांचे व्याज बँकेकडे थकीत आहे.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या एकूण ५५शाखांमधील ४७ शाखांमध्ये पीक कर्ज वाटप करण्यात येते. व्याजाच्या रकमेचा तपशील मागविण्यात आला आहे. जवळपास ४० शाखांचे तपशील प्राप्त झाले असून इतर उर्वरित शाखांचे तपशील मिळताच शेतकऱ्यांना व्याजाची रक्कम परत करण्यात येईल.- आर. वाय. सोरते, सरव्यवस्थापक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, गडचिरोली 

टॅग्स :Gadchiroliगडचिरोलीbankबँक