शहरं
Join us  
Trending Stories
1
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
2
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
3
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
4
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
5
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
6
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
7
राज ठाकरेंचा मुद्दा, आशिष शेलारांनी दिले उत्तर; आभार मानत म्हणाले, 'त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याबद्दल...'
8
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
9
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
10
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
11
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
12
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
13
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
14
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
15
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
16
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
17
Astrology: जोडीदार 'क्लिक' होत नाही अशी तरुणांची सबब; हा ग्रहांचा परिणाम समजावा का?
18
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
19
IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराजनं सांगितलं त्याच्या आगळ्यावेगळ्या सेलिब्रेशनमागचं कारण!
20
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 

लॉकडाऊनमधील ३०% वीज बिलाचा भरणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2020 05:01 IST

लॉकडाऊनध्ये शिथीलता दिल्यानंतर मिटर रिडिंग घेण्यात आली. भरलेली रक्कम वजा करून उर्वरीत तिनही महिन्यांचे बिल एकाचवेळी पाठविण्यात आले. वीज बिल जास्त आल्याने अनेकांनी बिल भरलेच नाही. परिणामी या कालावधीतील बिलाची केवळ २९.८५ टक्के एवढीच वसूली झाली आहे.

ठळक मुद्देमहावितरणची अडचण वाढली : तीन महिन्यांचे एकत्रित बिल

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : लॉकडाऊनमुळे मार्च ते मे या तीन महिन्यांमध्ये विजेच्या मिटरची रिडिंग करण्यात आली नाही. त्यामुळे ग्राहकांना सरासरी वीज बिल पाठविण्यात आले. काही ग्राहकांनी बिल भरले तर काहींनी मात्र बिल भरलेच नाही. लॉकडाऊनध्ये शिथीलता दिल्यानंतर मिटर रिडिंग घेण्यात आली. भरलेली रक्कम वजा करून उर्वरीत तिनही महिन्यांचे बिल एकाचवेळी पाठविण्यात आले. वीज बिल जास्त आल्याने अनेकांनी बिल भरलेच नाही. परिणामी या कालावधीतील बिलाची केवळ २९.८५ टक्के एवढीच वसूली झाली आहे.लॉकडाऊनच्या कालावधी अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्वच सेवा बंद ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे या कालावधीत मिटर रिडिंगचेही काम बंद ठेवण्यात आले होते. स्वत: मिटर रिडिंग घेऊन ते महावितरणच्या अ‍ॅपवर टाकण्याची सुविधाही ग्राहकांना देण्यात आली होती. मात्र या बाबातचे तांत्रिक ज्ञान ग्राहकांना नसल्याने बहुतांश ग्राहकांनी स्वत: मिटर रिडिंग केली नाही. ज्या ग्राहकांनी मिटर रिडिंग केली नाही. त्यांना सरासरी वीज बिल पाठविण्यात आले. मार्च ते मे या कालावधीत उन्हाळा होता. तसेच संपूर्ण कुटुंब घरीच राहत होते. त्यामुळे कुलर, एसी, पंखे, टिव्ही या साधनांचा वापर वाढला होता. बील मात्र सरासरीच पाठविले जात होते. त्यामुळे वीज बिलातील तफावत वाढत गेली. काही ग्राहकांनी तर लॉकडाऊनच्या कालावधीत वीज बिलाचा भरनासुद्धा केला नाही. त्यामुळे त्यांना आता तिनही महिन्यांचे बिल एकाचवेळी पाठविण्यात आले आहे. लॉकडाऊनमुळे अनेक नागरिकांचा रोजगार हिरावल्या गेला. त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची बनली आहे. अशातच तीन महिन्यांचे वीज बिल एकाचवेळी पाठविण्यात आल्याने ते भरावे कसे असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे अनेकांनी ते भरले नसल्याचे दिसून येते. घरगुती ग्राहकांकडून वीज बिलाची १० कोटी ९९ लाख रूपयांची मागणी होती. त्यापैकी ३ कोटी २८ लाख रूपयांचे बिल ग्राहकांनी भरले आहे. तसेच व्यावसायिक ग्राहकांकडे १ कोटी १२ लाख रूपयांची मागणी होती. त्यापैकी ५३ लाख रूपये भरले आहेत. औद्योगिक ग्राहकांककडून ९३ लाख रूपयांच मागणी होती. त्यापैकी १ कोटी ५० लाख रूपयांचा भरणा या ग्राहकांनी केला आहे.शंखांचे निरसन सुरूचप्रत्यक्ष वीज बिल वापराच्या तुलनेत अधिकचे बिल पाठविण्यात आले असल्याची शंका काही ग्राहकांना आहे. त्यामुळे ते महावितरणकडे तक्रारी करीत आहेत. त्यांच्या तक्रारींचे निरसण व्हावे यासाठी महावितरण तर्फे वेळोवेळी वेबिणार आयोजित केले जात आहेत. तसेच तालुका स्तरावर तक्रार घेऊन येणाऱ्या ग्राहकांच्याही तक्रारींचे निरसन केले जात आहे.रोवणीच्या खर्चामुळे रखडली वीज बिलेजून महिन्यात लॉकडाऊनच्या कालावधीतील वीज बिल एकाचवेळी पाठविण्यात आले. या महिन्यापासूनच खरीपच्या हंगामाला सुरूवात झाली. शेतकऱ्यांकडे असलेल्या पैशातून त्यांनी खते, बियाणे खरेदी केली. तसेच धानाच्या रोवणीसाठी तजवीज करून ठेवली. त्यामुळे वीज बिल भरू शकले नाहीत. तर मजूर वर्ग लॉकडाऊनच्या कालावधीत बेरोजगार झाला होता. जमा असलेली पुंजी या कालावधीत संपली. लॉकडाऊनमध्ये शिथीलता दिल्यानंतर रोजगार सुरू झाला. मात्र आर्थिक परिस्थिती सुधारण्यास आणखी काही दिवसांचा कालावधी लागणार आहे. तोपर्यंत महावितरणला वीज बिलाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

टॅग्स :electricityवीज