शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीशी तडजोड चालणार नाही! राजकीय लेबलं लावू नका, याकडे संकट म्हणून पाहा; राज ठाकरेंनी ठणकावलं
2
जय मराठी! ५ जुलैला विजयी मेळावा होईल, पण तो कोणत्याही पक्षाचा नसेल; राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
3
भारतात राहण्यासाठी काहीही! ५ बांगलादेशी पुरुषांनी निवडला 'विचित्र' मार्ग, कसे सापडले पोलिसांच्या तावडीत?
4
घसरणीनंतर पुन्हा वाढले सोन्याचे दर... खरेदीची संधी गेली का? २४ कॅरेटचा आजचा भाव काय?
5
हिंदी सक्ती : "समिती कोणतीही असू दे, आता सक्ती विषय..."; उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारला इशारा 
6
ऐकावे ते नवलंच! एकटा दरोडेखोरांशी भिडला; कंबरेत गोळी घुसली, २ km पर्यंत कळालेही नाही...
7
रस्ते, मेट्रो, सिंचन, कुंभमेळा...सरकारने सादर केल्या 57 हजार 509 कोटींच्या पुरवणी मागण्या
8
'ChatGPT' ला हे प्रश्न विचारू नका, नाहीतर तुम्ही मोठ्या अडचणीत सापडू शकता
9
प्रेमात मिळाला धोका तेव्हा खासगी आयुष्यातील 'तो' व्हिडिओ केला लीक; क्रिकेटर अडकला होता वादात
10
अदानी ग्रीन एनर्जीचा ऐतिहासिक विक्रम! अक्षय ऊर्जा क्षेत्रात असं काम करणारी पहिलीच भारतीय कंपनी
11
सौरभ गोखले आणि अनुजा साठेला नकोय मूल, अभिनेत्री म्हणाली- "आम्हाला प्राणी जास्त आवडतात..."
12
मर्यादेपेक्षाही अधिक महाग होणार चांदी; रॉबर्ड कियोसाकी यांच्या दाव्यात किती तथ्य?
13
"मराठी बोला तुम्ही मराठी बोला...", मुंबईच्या लोकलमध्ये तरुणाईचा गजर, व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल!
14
श्वेता तिवारीला एक्स पतीने कारमध्ये एका व्यक्तीसोबत पकडलं होतं रंगेहाथ, राजा चौधरीचा खुलासा
15
"ठाकरे बंधूंच्या ताकदीपुढे सरकारनं माघार घेतली; ही विजयाची पहिली पायरी, यापुढे..."
16
येत्या ७ जुलैला सार्वजनिक सुट्टी मिळणार? सोमवारी जाहीर झाली तर काय काय बंद असणार...
17
शुबमन गिलचा एक मेसेज अन् तो सासरवाडीतून थेट टीम इंडियाच्या ताफ्यात (VIDEO)
18
तेलंगणात रसायनांनी भरलेल्या टँकरचा स्फोट, किमान १० कामगारांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
19
Wimbledon 2025 : नोव्हाक जोकोविच विक्रमी २५ वे ग्रँडस्लॅम जिंकण्याचा डाव साधणार का?
20
दरोडा, खून...महाराष्ट्रासह चार राज्यांमध्ये १६ गंभीर गुन्हे; कुख्यात गुंडाचा उत्तर प्रदेशात एन्काउंटर

कर्मचाऱ्यांना किमान वेतन द्या

By admin | Updated: June 21, 2014 23:58 IST

अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांचा मेळावा नुकताच एटापल्ली तालुक्यातील तुमडी येथील सेवाआश्रमच्या पटांगणावर घेण्यात आला. निसर्गरम्य वातावरणात घेण्यात आलेल्या मेळाव्यात अंगणवाडी

अंगणवाडी महिलांची : तुमडी येथील मेळाव्यात मागणीगडचिरोली : अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांचा मेळावा नुकताच एटापल्ली तालुक्यातील तुमडी येथील सेवाआश्रमच्या पटांगणावर घेण्यात आला. निसर्गरम्य वातावरणात घेण्यात आलेल्या मेळाव्यात अंगणवाडी महिलांना किमान वेतन मिळाले पाहिजे, अशी मागणी महिला कर्मचाऱ्यांनी एकमताने शासनाकडे केली.मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माया शेडमाके होत्या. प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. रमेशचंद्र दहीवडे, विजय चौधरी, सुधाकर बावणे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक माया शेडमाके यांनी केले. त्यांनी अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांच्या अनेक प्रश्नाबाबत माहिती देतांना म्हटले की, दुर्गम भागातही अंगणवाडी कर्मचारी सेवा देत आहेत. परंतु अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दिले जाणारे मानधन हे सेवेच्या तुलनेत अत्यल्प आहे. त्यामुळे अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ करण्याची गरज आहे, असे सांगितले. मानधन वाढ तसेच पेंशनच्या प्रश्नाला घेऊन सतत एक महिना अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांनी संघर्ष केला. शासन बोगस घोषणा देत असेल तर त्यांना धडा शिकवा, असे डी. एस. वैद्य यांनी सांगितले. अंगणवाडी महिलांच्या प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी केंद्र शासनाने ३१ महिला खासदारांची कमिटी गठीत केली होती. सदर कमिटीने अंगणवाडी महिलांच्या प्रश्नांचा अभ्यास करून केंद्र सरकारला अहवाल सादर केला आहे. अंगणवाडी महिलांना किमान वेतन देण्यात यावे, सामाजिक सुरक्षा, प्राव्हीेडंट फंड, पेंशन तसेच वाढत्या महागाईनुसार महागाई नुसार देण्यात यावा आदी शिफारशी केल्या आहेत. नवीन सरकारने अंगणवाडी महिलांच्या प्रश्नांची गंभीरपणे दखल घेऊन महिला कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न त्वरित मार्गी लावावे, अशी मागणी प्रा. रमेशचंद्र दहीवडे यांनी केली. कार्यक्रमाचे आभार प्रतिभा देशपांडे यांनी मानले. विठाबाई भट, छाया कागदेलवार, नागोबाई मडावी, नागमणी दासरी, रेखा येगटीवार, बेबी त्रिनगरीवार, वंदना कातरकर, अनुसया झाडे, सुमंत तोकलवार यांनी सहकार्य केले.