शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

केंद्राप्रमाणे डॉक्टरांना वेतन द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 23:28 IST

महाराष्ट्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना केंद्र शासन व इतर राज्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांप्रमाणे वेतन व इतर भत्ते देण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी गट ‘अ’ संघटनेने जिल्हाधिकारी यांच्या मार्फत शासनाकडे पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.

ठळक मुद्देविविध मागण्या : राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटनेचे निवेदन

आॅनलाईन लोकमतगडचिरोली : महाराष्ट्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना केंद्र शासन व इतर राज्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांप्रमाणे वेतन व इतर भत्ते देण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी गट ‘अ’ संघटनेने जिल्हाधिकारी यांच्या मार्फत शासनाकडे पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.निवेदनात म्हटले आहे की, ग्रामीण भागात काम करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना राज्य शासनाच्या कोट्यातील ५० टक्के जागा पदव्युत्तर शिक्षणासाठी राखीव ठेवल्या जात होत्या. त्यामुळे सार्वजनिक आरोग्य विभागात सेवा देण्यासाठी तज्ज्ञ मनुष्यबळ उपलब्ध होत होते. ही संधी कायम ठेवावी, १९८६ च्या निर्णयानुसार केंद्र शासनातील वैद्यकीय अधिकाऱ्यांप्रमाणे समान वेतन व भत्ते देण्याची तरतूद असतानाही याकडे दुर्लक्ष केले जात आहे. वैद्यकीय अधिकारी यांच्यावर हल्ले होत आहेत. त्यामुळे सुरक्षा पुरवावी, एन.एम.सी. बिल अन्यायकारक आहे, असे निवेदनात म्हटले आहे.निवेदन देतेवेळी संघटनेचे अध्यक्ष डॉ. सुनील मडावी, डॉ. अमित साळवे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.