शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

विकासकामे गुणवत्तापूर्ण होतील याकडे लक्ष द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2019 00:03 IST

जिल्ह्यातील विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही. मात्र प्राप्त झालेल्या निधीतून गुणवत्तापूर्ण विकासकामे करण्याकडे अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष द्यावे, असे निर्देश पालकमंत्री तथा जिल्ह्याचे वने, वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.

ठळक मुद्देसंडे अँकर । आढावा सभेदरम्यान पालकमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना निर्देश; रिक्त पदे भरण्याचे आश्वासन

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यातील विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही. मात्र प्राप्त झालेल्या निधीतून गुणवत्तापूर्ण विकासकामे करण्याकडे अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष द्यावे, असे निर्देश पालकमंत्री तथा जिल्ह्याचे वने, वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्रीपद स्वीकारल्यानंतर मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन विभागाच्या सभागृहात शुक्रवारी विकासकामांचा आढावा घेतला. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्ष योगीता भांडेकर, खासदार अशोक नेते, आमदार डॉ. होळी, आमदार कृष्णा गजबे, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. विजय राठोड, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, उपवनसंरक्षक कुमारस्वामी, सहायक जिल्हाधिकारी डॉ. इंदूराणी जाखड, गडचिरोलीच्या नगराध्यक्ष योगीता पिपरे, वडसाच्या नगराध्यक्ष शालू दंडवते, जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय कंकडालवार, जिल्हा नियोजन अधिकारी टी.एस. तिडके आदी मान्यवर उपस्थित होते.आढावा सभेत जिल्हाधिकाºयांनी जिल्ह्यातील महत्त्वाच्या विभागातील रिक्त पदांची माहिती सादर केली. यावेळी पालकमंत्री मुनगंटीवार यांनी अत्यंत महत्त्वाची रिक्त पदे तातडीने भरावीत. पदे रिक्त राहिल्यास अडचण निर्माण होते. त्यामुळे रिक्त पदे भरण्यासाठी शासन प्रयत्न करेल, असे आश्वासन दिले.रस्ता हा विकासाचा केंद्रबिंदू आहे. रस्ते बनविताना रस्त्यांची गुणवत्ता दर्जेदार असावी. कमीतकमी वेळेत ते कसे तयार होतील, याकडे लक्ष द्यावे. रस्त्यांची गुणवत्ता तपासण्याकरिता पथक तयार करण्यात येईल. कमी उंचीच्या पुलांमुळे पावसाळ्यात अतिदुर्गम भागातील रहदारी पूर्णपणे बंद होते. पुलाची उंची वाढविण्यास शासन निधी उपलब्ध करून देईल. दुर्गम भागात बांधकामाच्या निविदा कंत्राटदार भरत नाही. त्यामुळे विकासकामे होत नाही. ही बाब जिल्हाधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. यावर छत्तीसगडच्या धरतीवर जिल्हा निर्माण समिती तयार करून ही समस्या कमी करण्यासाठी पुढाकार घेतला जाईल. खत व बियाणांचा शेतकºयांना तुटवडा निर्माण होणार नाही, याकडे कृषी विभाग व इतर विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.तक्रार निवारण केंद्र स्थापन करणारनागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यात हॅलो चंद्रपूर तक्रार निवारण केंद्र तयार करण्यात आले. याच धरतीवर गडचिरोली जिल्ह्यातही हॅलो गडचिरोली तक्रार निवारण केंद्र स्थापन केले जाईल. या केंद्राच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या सोडविल्या जातील, असे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले.

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार