शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
2
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
3
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
4
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
5
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
6
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
7
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
8
अरे व्वा...! काही तासांत क्लिअर होणार चेक; ४ ऑक्टोबरपासून दोन टप्प्यांत अंमलबजावणी
9
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
10
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
11
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
12
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
13
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
14
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
15
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
16
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
17
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
18
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
19
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
20
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले

निषेधातून जागविली राष्ट्रभक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2019 00:43 IST

जम्मू-काश्मिरमधील पोलवामा येथे जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात ४९ जवान शहीद झाले. या हल्ल्यामुळे देशभर संतापाची लाट उसळली आहे. गडचिरोली जिल्ह्यातही या घटनेचा निषेध सर्व स्तरातून होत आहे.

ठळक मुद्देपुलवामा हल्ल्याचा जिल्हाभरात निषेध : व्यापारी संघटनेतर्फे कॅन्डल मार्च तर प्लॅटिनम शाळेतर्फे रॅली

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जम्मू-काश्मिरमधील पोलवामा येथे जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात ४९ जवान शहीद झाले. या हल्ल्यामुळे देशभर संतापाची लाट उसळली आहे. गडचिरोली जिल्ह्यातही या घटनेचा निषेध सर्व स्तरातून होत आहे. शनिवारी गडचिरोली येथे व्यापारी असोसिएशन तसेच मुस्लीम समाजातर्फे कॅन्डल मार्च काढून या हल्ल्याचा निषेध करण्यात आला. तसेच प्लॅटिनम ज्युबिली हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाने शहरातून मोठी यात्रा काढून या हल्ल्याचा निषेध केला. शहीद जवानांना श्रध्दांजली अर्पण करीत गडचिरोलीकरांनी निषेधातून राष्टÑभक्ती जागविली.खासदार अशोक नेते यांच्या नेतृत्वामध्ये ही मुकयात्रा काढण्यात आली. समाजकंटकांच्या गटाला हाताशी धरून परकीय शक्तीने हा अतिशय निंदनिय हल्ला घडवून आणलेला आहे. जगामध्ये सर्वत्र शांतता नांदावी, अशी नेहमीच आपली समज राहिली आहे. पण याला आपला कमकुवतपणा समजून वारंवार आपल्या संहिष्णूतेवर घाला घातला जात आहे, असे प्रतिपादन खा. नेते यांनी यावेळी केले.आपण जरी सीमेवर बंदूक धरून देशासाठी योगदान देऊ शकत नसलो तरी आपल्या व आपल्या मायभूमीच्या संरक्षणासाठी जे आपले भाऊबंद जीवाची पर्वा न करता दिवस रात्र एक करीत आहेत, त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहून आपण त्यांना मजबूत पाठबळ नक्कीच देऊ शकतो. पुलवामा येथे झालेला हल्ला हा मानवतेला काळिमा फासणारा असून याप्रसंगी आपण सर्वांनी एकजुटीने पुढे येऊन याचा निषेध केला पाहिजे, असे मत प्लॅटिनम ज्युबिली एज्युकेशन सोसायटी गडचिरोलीचे महासचिव अझिझ नाथानी यांनी व्यक्त केले.या कृत्याचा निषेध नोंदविण्यासाठी प्लॅटिनम ज्युबिली शाळा व महाविद्यालयाचे जवळजवळ १२०० विद्यार्थी, पालक व कर्मचारीवृंद यांनी दुपारच्या सुमारास शहरातून मुकयात्रा काढून शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली. आपल्या आत्मसन्मानावर झालेल्या या हल्ल्याचा निषेध करून शहीद जवानांच्या आत्म्यांस शांती तसेच त्यांच्या कुटुंबियांना या दु:खातून सावरण्याची शक्ती मिळावी यासाठी परमात्म्याकडे सर्व उपस्थितांनी प्रार्थना केली.याप्रसंगी जि.प.चे माजी अध्यक्ष रवींद्र ओल्लालवार, डॉ. भारत खटी, शिया-इमामी इस्माईली जमातचे अध्यक्ष कासमभाई धनानी, उपाध्यक्ष नुरुद्दीन नाथानी, प्लॅटिनम ज्युबिली एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. कमरुद्दीन लाखांनी, संचालक शौकतभाई धम्मानी, अमीरआली नाथानी, निझार देवानी आदीसह इतर मान्यवरांनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून सदर घृणास्पद हल्ल्याचा निषेध केला. शहीद सैनिकांच्या कुटुंबियांना हे दु:ख सहन करण्याची शक्ती लाभो, अशी परमेश्वराकडे प्रार्थना करून दिवंगत जवानांना श्रद्धांजली अर्पण केली.गडचिरोली व्यापारी असोसिएशनच्या वतीने सायंकाळी ५ वाजतापासून त्रिमूर्ती चौकासह शहरातील बाजारपेठ बंद करण्यात आली. त्यानंतर कॅन्डल मार्च काढून इंदिरा गांधी चौकात पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. यावेळी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष रवी चन्नावार, गुरूदेव हरडे, मनोज देवकुले, बबलू शर्मा, अनिल करपे, वलय चन्नावार, रत्नाकर बोगोजुवार, जगदिश डोमळे, सचिन येनगंधलवार, सुमीत येनगंधलवार, हेमंत राठी, नंदकिशोर काबरा, नंदू वाईलकर, पवन जवार, जुगल वासेकर, सुरेश भोजापुरे, नितीन चिमड्यालवार, आफताफ पठाण, अमित कडीवाल, प्रफुल बिजवे, दिनेश काबरा, यांच्यासह व्यापारी उपस्थित होते.कारगील चौकात पुलवामातील शहिदांना श्रद्धांजलीगडचिरोली शहरातील कारगील चौकात पुलवामा हल्ल्यातील शाहिदांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. माजी सैनिक कन्हैया सिंह बैस यांच्या हस्ते मेणबत्ती पेटवून वतीने कारगील चौक दुर्गा उत्सव मंडळ गडचिरोलीच्या वतीने हा कार्यक्रम घेण्यात आला.पाकिस्तान पुरस्कृत दशतवाद्यांनी पुलवामा,जम्मू कश्मिर येथे सीआरपीएफ च्या जवानांवरती भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात भारतमातेचे ४९ सुपुत्र शहीद झाले . सर्व भारतीय शहीद जवानांच्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहेत. या जवानांच्या आत्म्यास शांती लाभावी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना ईश्वर शक्ती प्रदान करावी अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली. याप्रसंगी शहीदांना श्रध्दांजली वाहण्यात आली. यावेळी कारगील चौक दुर्गा उत्सव मंडळाचे अध्यक्ष उदय धकाते, उपाध्यक्ष कालू गोवर्धन,सचिव प्रकाश भांडेकर, माजी सैनिक कन्हैया सिंह बैस, डॉ. नरेश बिडकर, नगरसेवक संजय मेश्राम, मोतीराम हजारे, राजू पुंडलीककर, नरेंद्र चनावार, सुनील देशमुख, नंदू कुमरे,मोबिन सय्यद, किशोर सोनटक्के, सुचिता धकाते, मंगला गोधनकार, नीलिमा देशमुख, सुनीता साळवे, गीता हिंगे उपस्थित होते.मुस्लीम समाजाने केला निषेधगडचिरोली शहरातील मुस्लीम समाज बांधवांनी शनिवारी सायंकाळच्या सुमारास येथील जामा मस्जिदपासून कॅन्डल मार्च काढून पुलवामा घटनेचा निषेध केला. त्रिमूर्ती चौकातून रॅली काढून ‘पाकिस्तान मुर्दाबाद, शहीदो के सन्मान मे, मुसलमान मैदान मे’ अशी नारेबाजी करीत इंदिरा गांधी चौकात भारतीय शहीद जवानांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. यावेळी एजाज शेख, रहिम शेख, शहादत पठाण, लतिफ पठाण, प्रतिक पठाण, शबीर शेख, समीर खान, समशेरखॉ पठाण, फरजीन शेख, गुलाम जाफर, अरशद खान, शबीर खान, अयुब शेख, पप्पू शेख व समाज बांधव हजर होते.

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्ला