शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत धर्मशाळा नाही की कुणीही यावे अन् स्थायिक व्हावे, आश्रयाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचे परखड मत
2
आजचे राशीभविष्य २० मे २०२५ : थकबाकी मिळण्यास, व्यापारातील वसुली होण्यास उत्तम दिवस
3
जगबुडी नदीत कार कोसळून मुंबईच्या पाच जणांचा मृत्यू, वडिलांच्या अंत्यविधीसाठी जाताना मुलीचा अंत
4
चार कोटींचे आंबे अमेरिकेने नाकारले; फेकून देण्याची वेळ
5
आंतरजातीय/धर्मीय अल्पवयीन जोडप्यांनाही सुरक्षा, जिल्ह्यांतील विश्रामगृहात राहणार विशेष कक्ष
6
कोरोनाने डोके वर काढताच ठाणे पालिका ‘अलर्ट’; हाँगकाँग, सिंगापूरमुळे खबरदारी, रुग्णालय सज्ज
7
ज्योतीची एनआयए, आयबीकडून चौकशी
8
विधानभवनच्या गेटवर आग; सहा मिनिटांत आटोक्यात
9
मुंबईच्या स्मशानात २ वर्षांत ४ लाख क्विंटल लाकडं जाळणार; पर्यावरणवाद्यांनी सुचवला मोक्षकाष्ठचा पर्याय, राेजगारही मिळेल 
10
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
11
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
12
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
13
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
14
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
15
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
16
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
17
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
18
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
19
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
20
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू

रुग्ण बरे हाेण्याचे प्रमाण वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 05:00 IST

  लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : हिवाळ्यात थंडीमुळे काेराेनाबाधित रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता हाेती. शिवाय अनलाॅक झाल्यापासून नागरिकही काही ...

ठळक मुद्देनवीन ४२ काेराेनाबाधितांची भर : सद्यस्थितीत ५१० रुग्ण शिल्लक

  लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : हिवाळ्यात थंडीमुळे काेराेनाबाधित रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता हाेती. शिवाय अनलाॅक झाल्यापासून नागरिकही काही प्रमाणात बिनधास्त झाले. मात्र आता नवीन काेराेनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस घटत आहे. काेराेना रुग्ण बरे हाेण्याचे प्रमाण वाढत आहे. बुधवारी गडचिराेली जिल्ह्यात नवीन ४२  बाधितांची भर पडली असून दिवसभरात ७४ जणांनी काेराेनावर मात  केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. जिल्ह्यातील आतापर्यंत बाधित ८ हजार ४१ पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या ७ हजार ४४८ वर पोहचली. तसेच सध्या ५१० क्रियाशील कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण ८३ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. जिल्ह्यातील काेरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.६३ टक्के, क्रियाशील रूग्णांचे प्रमाण ६.३४ टक्के तर मृत्यू दर १.०३ टक्के झाला. नवीन ४२ बाधितामध्ये गडचिरोली १५, अहेरी ५, आरमोरी ४, चामोर्शी  ८, धानोरा १, एटापल्ली २, कुरखेडा २, मुलचेरा १, देसाईगंज येथील ४ जणांचा समावेश आहे. आज कोरोनामुक्त झालेल्या ७४ रूग्णांमध्ये गडचिरोली ३७, अहेरी ४, आरमोरी १८, भामरागड १, चामोर्शी २, धानोरा १, एटापल्ली ५, मुलचेरा २, कोरची १,  कुरखेडा ३ जणांचा समावेश आहे.नवीन बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील इंदिरा नगर १, रामनगर १,  आंबेडकर वार्ड १, नवेगाव ३, इंदाळा १, साई नगर १,  सीआरपीएफ २,  कलेक्टर कॉलनी १, कारगीर चौक १, पोलीस कॉलनी १, विसापूर १, अहेरी तालुक्यातील बाधितामध्ये  स्थानिक २, आलापल्ली १, नागेपल्ली १, महागाव १, आरमोरी तालुक्यातील बाधितांमध्ये  देलोडा १, स्थानिक २, देऊळगाव १, चामोर्शी तालुक्यातील बाधितांमध्ये  बहादुरपुर १, भाडभीडी १, जयनगर १, स्थानिक २,  आष्टी २,  इल्लूर पेपरमिल १,  धानोरा तालुक्यातील बाधितांमध्ये शासकीय आश्रम शाळा १, एटापल्ली तालुक्यातील बाधितांमध्ये स्थानिक १, आष्टी १, कुरखेडा तालुक्यातील बाधितांमध्ये कडोली १, धानेगाव १, मुलचेरा तालुक्यातील बाधितांमध्ये स्थानिक १, देसाईगंज तालुक्यातील बाधितांमध्ये  शिवाजी वाॅर्ड २,  भगतसिंग वाॅर्ड १, गिरोला १ जणाचा समावेश आहे.बाजारपेठेत नागरिक बनले बिनधास्तकाेराेना संदर्भात राज्य सरकारने अनलाॅक केल्यानंतर शहरी व ग्रामीण भागातील नागरिक नियमाबाबत बिनधास्त झाले आहेत. गडचिराेली येथील आठवडी बाजार व बाजारपेठेत बरेच नागरिक तसेच काही विक्रेते मास्कच्या वापराला पाठ दाखवित असल्याचे दिसून येते. दैनंदिन गुजरी बाजारातही विक्रेते व ग्राहकांमध्ये मास्कचा वापर पूर्वीसारखा आता दिसून येत नाही. काही माेजकेच लाेक मास्क लावून असल्याचे दिसतात.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या