शहरं
Join us  
Trending Stories
1
Priya Marathe Passes Away: लोकप्रिय अभिनेत्री प्रिया मराठेचं निधन, कॅन्सरशी झुंज ठरली अपयशी
2
Ratnagiri Crime: 'मैत्रिणीकडे चाललेय'; रत्नागिरीच्या भक्तीला प्रियकरानेच संपवलं, दुर्वास पाटील कसा अडकला?
3
एअर इंडियाच्या विमानाचे आपात्कालीन 'लँडिंग'; हवेत असतानाच इंजिनला लागली आग, प्रवासी सुखरूप
4
टॅरिफ वॉरदरम्यान PM मोदी आणि जिनपिंग यांची भेट; चीनचे राष्ट्राध्यक्ष म्हणाले,'एकत्र येणे महत्त्वाचे'
5
फक्त १ लाख रुपये जमा करून मिळवा १४,३२५ रुपये निश्चित व्याज! कॅनरा बँकेने आणखी खास FD योजना
6
'त्या' महिला पोलीस निरीक्षकाची बदली मॅटकडून रद्द
7
"आमच्या मालिकेवेळी तिला पुन्हा कॅन्सर...", प्रिया मराठेच्या निधनानंतर सुबोध भावेची भावुक पोस्ट
8
Amit Shah: मुंबईकरांना बदल हवा, कामाला लागा; अमित शाहांचा भाजप नेत्यांना कानमंत्र!
9
LPG, ITR ते क्रेडिट कार्ड... १ सप्टेंबरपासून ‘या’ ७ गोष्टींचा तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
10
"माझा प्रॉब्लेम आहे, मंगळसूत्र चोरांच्या विरोधात मी लढत नाही"; जयंत पाटलांनी गोपीचंद पडळकरांना डिवचलं
11
Maharashtra Rains: महाराष्ट्रात पावसाचा कहर, तुमच्या जिल्ह्यात किती टक्के बरसला? जाणून घ्या आकडा
12
रोहित शर्माची झाली फिटनेस टेस्ट; ऑस्ट्रेलियाविरूद्ध वनडे मालिकेत खेळणार की नाही? जाणून घ्या
13
"१० वर्षे सत्तेत होता, खोलात जायला लावू नका"; आरक्षणावरुन शरद पवारांच्या सल्ल्यावर अजितदादांचे प्रत्युत्तर
14
नंदुरबारमध्ये शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचा नदीतून जीवघेणा प्रवास
15
कहानी में ट्विस्ट! शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी मेलानिया ट्रम्प यांच्या नावाचे नामांकन?
16
आजचे राशीभविष्य, ३१ ऑगस्ट २०२५ : आजचा दिवस शुभ फलदायी, धन लाभ होईल, मानसिक शांतता लाभेल !
17
Mumbai Police: मुंबई पोलीस, गुन्हे शाखेच्या पोलिसांच्याही सुट्ट्या रद्द!
18
शेकडो टॉयलेट, ११ टँकर, ४५० कर्मचारी; आंदोलकांची गैरसोय टाळण्यासाठी महापालिकेकडून उपाययोजना
19
हलगीचा ताल, झांजेच्या झंकाराने निनादले रस, आंदोलकांचा नाचत जल्लोष 
20
maratha andolan: आझाद मैदानात चिखलात बसून आंदोलन

मार्ग खड्ड्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 04:25 IST

गडचिरोली : तालुक्यातील उसेगाव ते भिकारमौशी मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडून दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या मार्गावरून ये-जा करताना नागरिकांना ...

गडचिरोली : तालुक्यातील उसेगाव ते भिकारमौशी मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडून दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या मार्गावरून ये-जा करताना नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या मार्गाची दुरुस्ती करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.

कुत्र्यांचा बंदोबस्त करा

एटापल्ली : दिवसेंदिवस शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे. कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी नगरपंचायतीची आहे. या कुत्र्यांचा बंदोेबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून हाेत आहे.

सायटोलाजवळ पूल बांधकामाची मागणी

कुरखेडा : तालुक्यातील अरततोंडी- सायला मार्गावरील सती नदीवर पूल बांधण्यात यावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. अरततोंडी ते सती नदीघाट हे अंतर जवळपास दोन कि.मी. आहे. याठिकाणी पूल बांधणे अत्यंत आवश्यक झाले असल्याने पूल बांधकाम करण्याची मागणी आहे.

देलाेडा-सूर्यडाेंगरी मार्ग उखडला

वडधा : देलाेडा- सूर्यडाेंगरी मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडून दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या मार्गाने ये-जा करणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या मार्गाची दुरुस्ती करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

मध संकलनाच्या प्रशिक्षणाची मागणी

धानोरा : जिल्ह्यात मधसंकलनाला चांगला वाव आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना मध संकलनाचे प्रशिक्षण दिल्यास चांगल्या दर्जाचे मधसंकलन होण्यास मदत होईल. त्यामुळे मधसंकलनाचे प्रशिक्षण देण्याची मागणी केली जात आहे. यासाठी प्रक्रिया उद्योगाची गरज आहे.

डुकरांचा हैदाेस वाढला

गडचिरोली : गेल्या काही दिवसांपासून गडचिरोली शहरातील सर्व २३ वाॅर्डांत डुकरांचा हैदोस प्रचंड वाढला आहे. मात्र, पालिकेच्या वतीने डुकरांच्या बंदोबस्ताकरिता काही महिन्यांपूर्वी हाती घेण्यात आलेली मोहीम थंडबस्त्यात असल्याचे दिसून येते. पालिका प्रशासनाचे डुकराच्या हैदोसाकडे दुर्लक्ष आहे.

सीसीटीव्ही कॅमेरे लावा

गडचिरोली : खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे निर्देश शासनाने दिले होते. मात्र, यासाठी अनुदानाची तजवीज शासनाने करून दिली नसल्याने अजूनपर्यंत गडचिरोली जिल्ह्यातील एकाही शाळेने सीसीटीव्ही कॅमेरे लावले नाहीत. त्यामुळे धाेका आहे.

बायोगॅस अनुदान वाढवा

गडचिरोली : जिल्ह्यातील ९० टक्के कुटुंबांकडे पशुधन उपलब्ध आहे. त्यामुळे १०० टक्के अनुदानावर शासनाकडून बायोगॅस संयंत्र बांधून दिल्यास या कुटुंबांना बिनाखर्ची गॅसची सुविधा उपलब्ध होईल. ग्रामीण भागात आजही बऱ्या प्रमाणात गोधन आहे. गोधनापासून मिळणाऱ्या शेणाचा उपयोग हाेऊ शकताे.

वसातील निवारा जीर्ण

गडचिरोली : आरमोरी मार्गावर असलेल्या गडचिरोली तालुक्यातील वसा येथील प्रवासी निवाऱ्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. या प्रवासी निवाऱ्याचे छत वादळामुळे पूर्णत: उडाले आहे. प्रवासी निवाऱ्याला वनस्पतींनी वेढा घातला असून, भिंतींना तडे गेले आहेत. त्यामुळे प्रवाशांना धोका आहे.

शेतीचा नमुना आठ द्या

वैरागड : वनहक्क कायद्यांतर्गत शेतकऱ्यांना अतिक्रमित जागेच्या मालकीहक्काचे पट्टे देण्याची कार्यवाही जिल्ह्यात सुरू आहे. मात्र, सदर पट्टे मिळालेले शेकडो शेतकरी सातबाऱ्यापासून वंचित आहेत. सातबारा मिळालेले शेतकरीसुद्धा नमुना आठपासून वंचित आहेत. पीक कर्ज मिळण्यास अडचणी येत आहेत.

केरोसीनअभावी अडचण

अहेरी : ज्या नागरिकांकडे सिलिंडर उपलब्ध आहे, अशा नागरिकांना केरोसीनचा पुरवठा करणे शासनाने बंद केले आहे. विद्युत पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढते. त्यावेळी दिव्याचा वापर करावा लागतो. केरोसीन मिळत नसल्याने अडचण वाढली आहे. ग्रामीण भागात विद्युत पुरवठा वारंवार खंडित होतो.

राजोलीचा पूल अर्धवट

धानोरा : तालुक्यातील राजोली गावाजवळच्या कठाणी नदीवर पाच वर्षांपूर्वी बांधण्यात आलेला पूल दोन वर्षांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे रपट्यासह वाहून गेला. दरवर्षी पावसाळ्याच्या दिवसांत या गावातील विद्यार्थी व नागरिकांना पुलाअभावी नवरगावमार्गे अधिकचे १५ कि.मी. अंतर कापावे लागते.

मातीचे बंधारे बांधा

आलापल्ली : वन विभागातर्फे दोन वर्षांपूर्वी जंगलातील सहा स्थानांवर मातीचे बांध बांधण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आला होता; परंतु प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सदर प्रस्ताव अजूनही धूळखात पडला आहे. मातीचे बंधारे निर्माण झाल्यास सिंचनाची सोय होईल.