शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

एटापल्लीचे वनोद्यान बनले कुरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2020 06:00 IST

वन विभागाने गडचिरोली जिल्ह्यात विविध ठिकाणी वनोद्यान तयार केले होते. एटापल्ली येथील वनोद्यानामध्ये विविध प्रकारची औषधी वनस्पती, १६ प्रकारच्या बांबूचे रोपवन, २५ प्रकारचे गुलाब व इतर फुलझाडे लावण्यात आली होती. तसेच बच्चेकंपनीसाठी झुले, ध्यानकुटी, बनविण्यात आली होती. कच्च्या रस्त्याच्या बाजुला विटा लावल्या होत्या.

ठळक मुद्देबगिचात वाढले गवत । कुंपण तोडून मोकाट जनावरांचा शिरकाव

रवी रामगुंडेवार ।लोकमत न्यूज नेटवर्कएटापल्ली : लाखो रुपये खर्चून वन विभागाने कसनसूर मार्गावर २०१२ मध्ये तब्बल दोन हेक्टर जागेवर वनोद्यान उभारले. मात्र या वनोद्यानाकडे आता दुर्लक्ष झाले असल्याने वनोद्यानात गवत उगवले आहे. कुंपण तोडून मोकाट जनावरे वनोद्यानात चरताना दिसून येतात.वन विभागाने गडचिरोली जिल्ह्यात विविध ठिकाणी वनोद्यान तयार केले होते. एटापल्ली येथील वनोद्यानामध्ये विविध प्रकारची औषधी वनस्पती, १६ प्रकारच्या बांबूचे रोपवन, २५ प्रकारचे गुलाब व इतर फुलझाडे लावण्यात आली होती. तसेच बच्चेकंपनीसाठी झुले, ध्यानकुटी, बनविण्यात आली होती. कच्च्या रस्त्याच्या बाजुला विटा लावल्या होत्या. या विटांना रंगरंगोटी करण्यात आली होती. त्यामुळे वनोद्यान एटापल्ली येथील नागरिकांना आकर्षीत करीत होते.या वनोद्यानाची देखरेख करण्याकरिता वनमजूर नेमण्यात आला होता. त्याची २४ तास वनोद्यानात ड्युटी असायची. एटापल्ली येथील शेकडो नागरिक या उद्यानात फिरायसाठी जात होते. एटापल्ली शहराचे हे एक आकर्षण केंद्र बनले होते. मात्र निधी नसल्याचे कारण पुढे करून मागील दोन ते तीन वर्षांपासून या उद्यानाकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. येथील वनमजुराला हटविण्यात आल्याने देखभाल व दुरूस्ती करणारा एकही व्यक्ती आता शिल्लक नाही. त्यामुळे वनोद्यानात गवत उगवले आहे. मोकाट जनावरांनी फुलझाडे, औषधी वनस्पती फस्त केली आहे. शासनाचे लाखो रुपये पाण्यात गेले आहेत.वन विभागाने उत्पन्नातून खर्च करावेगडचिरोली जिल्ह्यात वन विभाग हा सर्वात श्रीमंत असलेला विभाग आहे. जंगलातील लाकडे विकून दरवर्षी शेकडो कोटी रुपयांचा निधी वन विभागाकडे जमा होते. सदर जंगलाची देखरेख वन विभागासोबतच स्थानिक नागरिकांनीही केली आहे. त्यामुळे वन विभागाएवढाच स्थानिक नागरिकांचाही अधिकार आहे. वन विभागाला मिळणाऱ्या उत्पन्नातून काही निधी बगिचाची देखभाल करण्यावर खर्च करावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.सदर उद्यानाची निर्मिती तत्कालीन वन परिक्षेत्राधिकारी एस. एन. टेकाम यांच्या कालावधीत झाली. वनोद्यान बनविण्यासाठी या ठिकाणचे पूर्वीचे अतिक्रमण काढण्यात आले. त्यावेळी फार मोठा विरोध झाला. या विरोधाचा सामना करीत टेकाम यांनी अतिक्रमण हटवून वनोद्यान तयार केले. मात्र काही कालावधीतच वनोद्यानाची दुरवस्था झाली आहे. यावर प्रतिक्रिया देताना एस. एम. टेकाम म्हणाले, उद्यानाची वाईट स्थिती बघून आपल्याला अतिशय दु:ख होत आहे. वन विभागाकडे निधी नसेल तर नागरिकांकडून तिकीट घेऊन वनोद्यानाची देखभाल करावी, असा सल्ला दिला.तारेचे कंपाऊंड तुटले आहे. निधी नसल्याने काहीच करता येत नाही. वन मजुरांकडून काम करण्याची मजुरीसुध्दा मंजूर होत नाही.- पी. एन. कुनघाडकर,क्षेत्र सहायक, एटापल्लीउद्यानाची देखभाल करावी यासाठी मागील पाच वर्षांपासून आपण वन विभागाकडे लेखी पाठपुरावा करीत आहोत. मात्र याकडे वन विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. वनमजूर वनाधिकाऱ्यांच्या घरी कामे करतात. तेच मजूर वनोद्यानात का लावले जात नाही?- महेश पुल्लूरवार,अध्यक्ष, व्यापारी संघटना एटापल्ली

टॅग्स :forest departmentवनविभाग