शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

युवा संसदेत खेळाविषयी नऊ ठराव पारित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 00:34 IST

धानोरा तालुक्यातील सर्च (शोधग्राम) येथे आयोजित आदिवासी युवा संसद आणि माँ दंतेश्वरी युवा जत्रेची पारंपरिक परांग नृत्याच्या साथीने मोहमाउलीची स्थापना करून उत्साहात सांगता झाली.

ठळक मुद्देतीन दिवस कार्यक्रम : आदिवासी युवक-युवतींचा सहभाग, माँ दंतेश्वरीची पूजा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : धानोरा तालुक्यातील सर्च (शोधग्राम) येथे आयोजित आदिवासी युवा संसद आणि माँ दंतेश्वरी युवा जत्रेची पारंपरिक परांग नृत्याच्या साथीने मोहमाउलीची स्थापना करून उत्साहात सांगता झाली. तीन दिवस चाललेल्या विविध कार्यक्रमानंतर चार गटात झालेल्या चर्चेत एकूण ९ ठराव पारित करण्यात आले. डॉ.अभय बंग, डॉ. राणी बंग आणि माजी आमदार हिरामण वरखडे यांच्या हस्ते पालखीचे वहन करण्यात आले.६ ते ८ फेब्रुवारीदरम्यान आयोजित युवा संसद व जत्रा महोत्सवात कबड्डी आणि व्हॉलिबॉल सामन्यांचे आयोजन केले होते. अखेरच्या दिवशी दंतेश्वरी देवीची पूजा करण्यात आली. मंदिरापासून मोह माउलीची परांग नृत्याच्या साथीने पालखी काढून स्थापना करण्यात आली. या पारंपरिक नृत्यात शोधग्रामचे सर्व कर्मचारीही सहभागी झाले होते. कार्यक्रमात सहभागी झालेल्या कोंदावाही, वाघभूमी, कोवांटोला, पवनी, माळदा, उदेगाव, कुथेगाव, रेखाटोला, साखराटोला, फुलबोडी येथील ग्रामप्रमुखांचा डॉ.अभय बंग, डॉ.राणी बंग आणि माजी आमदार हिरामण वरखडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.व्हॉलिबॉल सामन्यांत मुलांमध्ये भीमपूर संघाने तर मुलींमध्ये कोवांटोला संघाने विजय मिळविला. तसेच कबड्डी सामन्यांत मुलांमध्ये फुलबोडी तर मुलींमध्ये माळंदा संघ विजयी ठरला. विजेत्या संघांचाही यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.संस्कृती टिकविणे युवकांची जबाबदारी- डॉ.बंगआदिवासी संस्कृती, त्यांची पारंपरिक गाणी, नृत्य, नाटकांची प्रदीर्घ परंपरा टिकावी यासाठी २० वर्षांपासून शोधाग्राममध्ये युवा संसद आणि जत्रेला सुरूवात कारण्यात आली. आतापर्यंत ही संस्कृती वयोवृद्धांनी सशक्तपणे टिकविली. पण ती तशीच पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी आता तरु णांची आहे. त्यासाठीच हे आयोजन केले जाते. खेळ हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे. पण खेळ म्हटला की स्पर्धा आली. त्यातून कुणी एक जण पुढे जाणार. मात्र असे न होता सर्वांसाठी खेळ, सर्वांसाठी आनंद, सर्वांसाठी आरोग्य, सर्वांसाठी व्यसनमुक्ती आणि सर्व जण चॅम्पियन ही भावना मध्यवर्ती ठेवून या स्पर्धांचे आयोजन केले जात असल्याचे डॉ. अभय बंग यांनी समारोपीय मार्गदर्शनात सांगितले.युवा संसदेत यावर्षी ‘चाम्पियन कसे बनावे’ हा विषय ठेवण्यात आला होता. चार गटात झालेल्या चर्चेत एकूण ९ ठराव पारित करण्यात आले. यामध्ये आठ महिने गावात नियमित स्पर्धा आयोजित करणे, पारंपरिक आदिवासी खेळांचे जतन करणे, खेळासाठी चांगले मैदान तयार करणे, नियमित व्यायाम आणि खेळांचा सराव करणे, गावाबाहेर आयोजित स्पर्धांमध्ये सहभाग घेणे, खेळासाठी आवश्यक प्रशिक्षक तयार करणे, जिल्हा व राज्य पातळीवरील स्पर्धांत सहभाग घेणे, कबड्डी खेळात कौशल्य प्राप्त करण्यासाठी प्रो-कबड्डी सामन्यांचे व्हिडीओ पाहण्याची सोय करणे आदी खेळाविषयी ठराव घेण्यात आले. यासोबतच कोणताही खेळाडू दारू, खर्रा, नस, गुडाखू याचे सेवन करणार नाही, असा ठरावही घेण्यात आला.