शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

विदर्भ गर्जना यात्रेत सहभागी व्हा

By admin | Updated: January 31, 2015 23:21 IST

विदर्भ राज्य निर्मितीचे आंदोलन आणखी तीव्र करण्यासाठी सिंदखेड ते कालेश्वरपर्यंत विदर्भ गर्जना यात्रा काढण्यात येणार आहे. या यात्रेत गडचिरोली जिल्ह्यातील बहूसंख्य नागरिकांनी सहभाग घ्यावा

१ मार्चला देसाईगंजात : विदर्भ आंदोलन समितीचे आवाहनगडचिरोली : विदर्भ राज्य निर्मितीचे आंदोलन आणखी तीव्र करण्यासाठी सिंदखेड ते कालेश्वरपर्यंत विदर्भ गर्जना यात्रा काढण्यात येणार आहे. या यात्रेत गडचिरोली जिल्ह्यातील बहूसंख्य नागरिकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.भारतीय जनता पार्टीने निवडणुकीपूर्वी विदर्भ राज्य देण्याचे आश्वासन दिले. या आश्वासनावर विश्वास ठेवत विदर्भातील जनतेने भाजपाला भरभरून मतदान केले. सत्ता येताच भाजपाने स्वतंत्र विदर्भ देण्याऐवजी आपण विदर्भाचा विकास करू, असे आश्वासन देणे सुरू केले आहे. मात्र दुसऱ्या बाजुला राज्याच्या तिजोरीत खळखळाट असल्याचेही सांगण्यात येत आहे. तिजोरी रिकामी असतांना विदर्भाचा विकास कसा करणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. काँग्रेसप्रमाणे भाजपासुद्धा वेळ मारून नेण्याचे काम करीत आहे. विदर्भ राज्याचे आंदोलन तीव्र करण्यासाठी सिंदखेड ते कालेश्वरपर्यंत विदर्भ गर्जना यात्रा काढली जाणार आहे. विदर्भातील नैसर्गिक साधनसंपत्तीची लूट करून उर्वरित महाराष्ट्राचा विकास केला जात आहे. याबाबत यात्रेदरम्यान जनजागृती केली जाणार आहे. विदर्भ वैधानिक विकास महामंडळाची मुदत ३१ मार्च रोजी संपत असून त्याला मुदतवाढ देण्याऐवजी विदर्भ राज्य देण्याची मागणी तीव्र करण्यासाठी आंदोलन उभे केले जाणार आहे. सदर यात्रेला १५ फेब्रुवारी रोजी नागपूरपासून प्रारंभ होणार आहे. विदर्भातील मुख्य ठिकाणी सभा घेत सदर यात्रा १ मार्च रोजी देसाईगंज येथे पोहोचणार आहे. देसाईगंज येथे सायंकाळी ५ वाजता सभा घेतल्यानंतर यात्रा आरमोरी येथे येणार आहे. आरमोरी येथे रात्री ७ वाजता सभा व तिथेच मुक्कामी राहणार आहे. २ मार्च रोजी ब्रह्मपुरी, नागभिड, सावली व मुल येथे जाणार आहे. ३ मार्च रोजी गडचिरोली येथे दुपारी २ वाजता सभा घेण्यात येणार असून त्यानंतर यात्रेचा समारोप करण्यात येणार आहे. अशी माहिती विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. पत्रकार परिषदेला डॉ. रमेश गजबे, अरुण केदार, जिल्हाध्यक्ष राजेंद्र ठाकुर, रमेश भुरसे, समय्या पसुला, राजू जक्कलवार, अमिता मडावी, सुधाकर नाईक, काशीनाथ नागोसे, सिद्धार्थ नंदेश्वर, आत्माराम भागडकर उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)