शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
3
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
4
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
5
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
6
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
7
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
8
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
9
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
10
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
11
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
12
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
13
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
14
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
15
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
16
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
17
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
18
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
19
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
20
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
Daily Top 2Weekly Top 5

पालक सचिवांनी घेतला दुष्काळी परिस्थितीचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 00:05 IST

जिल्ह्यातील पाणी टंचाई, चारा टंचाई व रोजगार हमीच्या कामांबाबत तसेच महसूल विभागासह अन्य सर्व विभागांच्या विकास कामांचा आढावा महसूल आणि वन विभागाचे तथा जिल्ह्याचे पालक सचिव विकास खारगे यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत घेतला.

ठळक मुद्देजिल्ह्यात पाणी-चारा टंचाई नाही : वृक्षलागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यातील पाणी टंचाई, चारा टंचाई व रोजगार हमीच्या कामांबाबत तसेच महसूल विभागासह अन्य सर्व विभागांच्या विकास कामांचा आढावा महसूल आणि वन विभागाचे तथा जिल्ह्याचे पालक सचिव विकास खारगे यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत घेतला. यावेळी त्यांनी राज्य शासनाच्या ३३ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत दिलेले उद्दीष्ट पूर्ण करण्याचे निर्देश सर्व कार्यालय प्रमुखांना दिले.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात झालेल्या या आढावा बैठकीला जिल्हाधिकारी शेखर सिंग, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजय राठोड प्रामुख्याने उपस्थित होते.ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने पाणी टंचाईबाबत माहिती दिली. सप्टेंबर २०१८ च्या पाणी टंचाई अहवालाच्या आधारे जिल्ह्यात टंचाईचा टप्पा १ व २ मध्ये टंचाईसदृश परिस्थिती नसल्यामुळे निरंक पाणी टंचाई आराखडे सादर केले. जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्तांनी सांगितले, जिल्ह्यात गाई म्हशी, बैल, शेळी, मेंढी यांची संख्या ७ लाख ९४ हजार १५९ असून उपलब्ध चाऱ्याच्या स्त्रोतानुसार म्हणजेच वनक्षेत्र, बांधावरील, कृषिक्षेत्र आदी ठिकाणाहून वर्षभरात गोळा होत असलेला चारा पशुधनासाठी पुरेसा आहे. जिल्ह्यात टंचाई नाही, असे ते म्हणाले.जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी अनंत पोटे यांनी शेतकऱ्यांना खरीप हंगामात कोणत्याही प्रकारे अडचण येणार नाही याची खबरदारी कृषी विभागाने घेतली असल्याचे सांगितले.या बैठकीला आत्माचे प्रकल्प संचालक डॉ.प्रकाश पवार, कृषि अधीक्षक अनंत पोटे, उपसंचालक जाधव, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शशीकांत शंभरकर, नरेगाचे बिडीओ एस.पी.पडघन, समाजकल्याण अधिकारी सुरेश पेंदाम आदी अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.यावर्षी खरीपाचे क्षेत्र वाढणारजिल्हयाचे सरासरी पर्जन्यमान १५०२.३८ मिमी इतके आहे. गेल्या खरीप हंगामात १३५५.३१ अर्थात ९५.९३ टक्के इतका पाऊस झाला होता. सर्वाधिक १३५.१० टक्के पाऊस सिरोंचा तालुक्यात तर सर्वात कमी ७४.७८ टक्के पाऊस कोरची तालुका क्षेत्रात झाला होता.जिल्हयात धानाचे सर्वसाधारण क्षेत्र १.५ लाख हेक्टर असले तरी गेल्या हंगामात १.८२ लाख हेक्टरवर (११९ टक्के) धान पेरणी झाली हे लक्षात घेऊन येणाऱ्या २०१९-२० च्या खरीप हंगामात २ लाख २२ हजार हेक्टर क्षेत्रावर धान लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे.कृषी विद्यापीठाने शिफारस केलेले चार सुत्री धान लागवड तंत्रज्ञान, तसेच श्री पध्दतीने लागवड याचा अधिक वापर व्हावा यासाठी प्रचार करण्यात येत आहे. या पध्दतीने लागवड केल्यास उत्पादन ५५ टक्के अधिक मिळते, अशी माहिती यावेळी पालक सचिवांना देण्यात आली.

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली