शहरं
Join us  
Trending Stories
1
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
2
"कमी जागा मिळो अथवा जास्त, मुख्यमंत्री नितीश कुमारच होणार", जदयूचा भाजपला स्पष्ट मेसेज, एनडीएमध्ये पेच
3
पाकिस्तान समर्थक जमात ए इस्लामीने बांगलादेशात दाखवली ताकद; देशात इस्लामिक राजवटीचे संकेत?
4
तेल ते टेलिकॉमपर्यंत... उद्योगपती मुकेश अंबानींचं साम्राज्य किती मोठं? इतक्या कंपनीचे आहेत मालक
5
महाराष्ट्रातील ४-५ मंत्र्यांना मिळणार डच्चू?; संजय राऊतांचा दावा, एका मंत्र्याचं नावही सांगितले
6
लँडिंगची तयारी अन् अचानक उड्डाण; दोन विमानांच्या २५ मिनिटे आकाशात! इंडिगोच्या विमानांमध्ये प्रवाशांचा थरकाप
7
शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित, कृषीमंत्री ‘रमी’ खेळण्यात मग्न; रोहित पवारांनी व्हिडिओच दाखवला
8
"दिवसाला ८ शेतकरी आत्महत्या अन् कृषिमंत्री विधानसभेत बसून रमी खेळतायेत, लाज वाटत नाही का?"
9
'स्लीपिंग प्रिन्स'ची २० वर्षांची लढाई संपली! वडिलांनी लाईफ सपोर्ट काढण्यास दिला होता नकार!
10
ओडिशात नराधमांनी किशोरवयीन मुलीला पेटवले, ७० टक्के भाजल्याने प्रकृती गंभीर
11
Live in Partner Murder: 'एएसआय' लिव्ह पार्टनरची हत्या, ज्या पोलीस ठाण्यात होती सेवेत तिथेच गेला शरण
12
भारत-पाकिस्तान सामना रद्द; तीव्र नाराजीनंतर WCL आयोजकांनी मागितली जाहीर माफी, म्हणाले...
13
विधानसभा विरोधी पक्षनेतेपद रिकामेच, आता नागपूर अधिवेशनापर्यंत प्रतीक्षा!
14
ठाकरे बंधू एकत्रच, कुणाला काय प्रॉब्लेम?, मी आणि राज एकत्र आल्यानं..."; उद्धव ठाकरे कडाडले
15
सभागृहाबाहेरच्या कारनाम्यांनी सरकारची अधिवेशनातील कामगिरी झाकोळली!
16
महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या निवडणुकीत 'सहकार पॅनेल'ची आघाडी: २१ पैकी ९ उमेदवार बिनविरोध
17
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘भक्तशिरोमणी संत श्री नामदेव महाराज पुरस्कार’ जाहीर
18
भारताची ताकद जग बघेल! शुभांशू शुक्लांच्या अनुभवातून गगनयानला बळ, स्वदेशी मोहिमेची तयारी
19
यूट्यूबवरून आयडिया मिळाली; क्यूआर कोड बदलून दुकानदारांची फसवणूक केली
20
ड्रग्ज विक्रीसाठी आलेले सहा जण अटकेत, ५४ लाख ४६ हजार रुपयांचा अमली पदार्थांचा साठा जप्त

धान गंजीवर मोकाट जनावरांचा डल्ला

By admin | Updated: December 16, 2015 01:46 IST

परिसरात भाकड जनावरांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. पशुपालकांना या जनावरांपासून कुठल्याही प्रकारचे काम करून घेता येत नाही.

वैरागड परिसरात धुमाकूळ : पशुपालकांच्या बेजबाबदारपणामुळे शेतकरी हैराणवैरागड : परिसरात भाकड जनावरांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. पशुपालकांना या जनावरांपासून कुठल्याही प्रकारचे काम करून घेता येत नाही. तसेच त्यांच्यापासून आर्थिक लाभही मिळत नाही. परिणामी पशुपालक आपली जनावरे मोकाट सोडतात अथवा गुरांच्या कळपात सोडतात. मात्र कळपातून अंग काढून अनेक जनावरे हिरव्या दिसणाऱ्या चाऱ्याच्या शोधात शेत गाठून रबी पिकाची नासधूस करतात. सदर नित्यक्रम वैरागड परिसरात नेहमीच सुरू आहे. परंतु आता मोकाट जनावरांकडून धान गंजीचीही नासधूस करण्याचा सपाटा सुरू आहे. या मोकट जनावरांमुळे वैरागड परिसरातील शेतकरी हैराण झाले आहेत. काही पशुपालक धानपीक निघल्याबरोबर जनावरे मोकाट सोडून देत आहेत. ही जनावरे धानाचे पुंजणे खाण्याबरोबरच रबी पिकांचेही नुकसान करीत आहेत. त्यामुळे शेतकरीवर्ग चिंताग्रस्त झाला आहे. वैरागड परिसरात धानाच्या कापणीनंतर बांधीत रबी पिकाचेही उत्पादन घेतले जाते. शेतकऱ्यांनी शेत नांगरून उडीद, मूग, हरभरा, लाखोळी आदी पिकांची पेरणी केली आहे. त्याचबरोबर बांधीच्या पाऱ्यावर तूर पिकाची लागवड करण्यात आली आहे. काही पशुपालकांची क्षमता नसतानाही अधिकचे जनावरे पाळत आहेत. ही जनावरे चरण्यासाठी मोकाट सोडून दिली जात आहेत. या जनावरांकडून रबी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले जात आहे. शेतकऱ्यांना दिवस-रात्र पहारा देऊन पिकाची राखण करावी लागत आहे. अनेक शेतकरी मोकाट जनावरांमुळे त्रस्त होऊन रबी पिकांची पेरणी करीत नाही. मोकाट जनावरांना पकडून कोंडवाड्यात टाकल्यास ग्राम पंचायत प्रती गुरामागे २५० रूपये दंड आकारते. मात्र या २५० रूपयांपैकी २०० रूपये सहा महिन्यांनी परत मिळतात. त्यामुळे मोकाट पशुपालक सुद्धा या दंडाला जुमानत नसल्याची बाब अनेक शेतकरी बोलून दाखवित आहेत. शासनाने या दंडात दोन ते तीन पटीने वाढ करावी, अशी मागणी वैरागड येथील शेतकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)