शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

हिंदू संस्कृतीच्या पितृपक्षातील पूजनीय कावळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 23:26 IST

वाढत्या प्रदूषणाचा परिणाम मानवासह पशुपक्ष्यांवरही होत आहे. याची प्रचिती पर्यावरणातील होत असलेल्या ....

ठळक मुद्देमहत्त्व आजही कायम : प्रदूषण, टॉवर, रसायने प्रजातींसाठी ठरताहेत ‘काळ’

लोकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : वाढत्या प्रदूषणाचा परिणाम मानवासह पशुपक्ष्यांवरही होत आहे. याची प्रचिती पर्यावरणातील होत असलेल्या जीवसृष्टीच्या ºहासावरून नेहमीच आलेली आहे. पर्यावरणातील तसेच हिंदू संस्कृतीतील महत्त्वपूर्ण मानला जाणारा पक्षी कावळा आज वाढत्या प्रदूषणामुळे जवळजवळ नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. वायू प्रदूषण, मोबाईल टॉवरमधील धोकादायक तरंग तसेच शेती व इतर क्षेत्रात वापरल्या जाणाºया रसायनांच्या परिणामांमुळे आजघडीला कावळ्यांची संख्या कमी झाली आहे. तरीसुद्धा पितृपक्षातील कावळ्याचे महत्त्व आजही कायम आहे. सर्वपित्री अमावस्या मंगळवारी साजरी होत आहे. या निमित्ताने सण व कावळ्याच्या महत्त्वाचा घेतलेला हा आढावा.पितृपक्षाच्या पंधरवड्यात प्राचीन काळापासून कावळ्याला एक वेगळे महत्त्व आहे. ही परंपरा हिंदू संस्कृतीत आजही जोपासली जात आहे. कावळा हा चतूर व बुद्धिमान पक्षी आहे. देशी कावळा, डोम कावळा, पहाडी कावळा तर चवथा अत्यंत दुर्मीळ आढळणारा पांढरा कावळा असे कावळ्यांच्या जातीचे चार प्रकार पाहावयास मिळतात. ग्रामीण भागात बहुतेक देशी व डोम कावळा आढळतो. परंतु पूर्वीच्या तुलनेत आज झालेल्या प्रदूषणामुळे कावळ्यांचे अस्तित्त्व धोक्यात आले आहे. श्री गणेशाचे विसर्जन झाल्यानंतर पितृपक्षाला सुरूवात होते. या पंधरवड्यात घरावर टाकलेले अन्न कावळ्यांनी खावे याकरिता हाजीहाजी करावी लागते. पितृपक्षात पूजापाठ केल्यानंतर द्रोणातील नवैैद्य जोपर्यंत कावळा ग्रहण करीत नाही. तोपर्यंत सारेजण जेवणाची वाट पाहत असतात. पितृपक्षात फिरणाºया कावळ्यांना यावेळी सुगीचे दिवस असतात. पितृपक्षात पूजापाठ केल्यानंतर नवैैद्याचा अधिकार प्रथम कावळ्यांना दिला जातो. पूर्वजांच्या रूपात कावळा घरी अन्नग्रहण करण्याकरिता येतो, असाही समज ग्रामीण भागात आहे. किंवा कावळ्याच्या पिलांना, कावळ्याला माणसाचा स्पर्श झाला तर त्या कावळ्यावर इतर कावळे हल्ला करतात, असाही समज ग्रामीण भागात आहे. एकूणच, पितृपक्षातील पंधरवड्यात कावळ्याचे महत्त्व आजही कायम आहे.अमावस्येला अशी होते पूजापितृपक्ष अमावस्येच्या दिवशी पितरांसाठी खास पक्वानांचे पात्र तयार केले जाते. त्याची पूजा केल्यानंतरच पात्रातील सर्व पदार्थ एका पळसाच्या किंवा घोगर वनस्पतीच्या पानांच्या द्रोणात काढून ते अंगणात ठेवतात. त्यामागील उद्देश असा की, कावळ्यांनी चोच मारून ते थोडेतरी ग्रहण करावे. कारण कावळ्यांनी चोच मारल्यानंतर ते पात्र स्वर्गातील आपल्या पितरांना पावन होते, असा समज हिंदू संस्कृतीत आजही कायम आहे. त्यामुळे पितृपक्षात कावळ्यांचे महत्त्व पूजनीय व अनन्यसाधारण आहे.दुर्गम भागातून कावळे लुप्तजिल्ह्यातील जंगलात अनेक जातींचे पशुपक्षी आढळून येतात. यात कावळ्यांची संख्या पूर्वी मोठ्या प्रमाणात होती. परंतु मागील काही वर्षांपासून प्रत्येक गावात आढळणारा कावळा दुर्गम भागातून लुप्त झाला आहे. चिमणी व इतर पक्ष्यांचा ठावठिकाणाही दुर्गम भागातील पाड्यांमध्ये दिसून येत नाही. कावळ्यांची शिकार करून त्यांचे पंख एका बांबूच्या टोकावर अडकवून ठेवण्याची प्रवृत्ती बळावल्यामुळे तसेच शिकारी वाढल्याने दुर्गम भागातील कावळे लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत, असे संख्येवरून दिसून येते.