शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
5
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
6
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
7
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
8
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
9
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
10
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
11
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
12
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
13
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
14
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
15
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
16
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
17
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
18
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
19
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज

धान विक्रीचे चुकारे प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 05:00 IST

मोहली येथील धान खरेदी केंद्रांतर्गत मोडेभट्टी, मोहली, मेटेजांगदा, सीताटोला, चिंगली, सिनसूर, आस्वलपार, रामपुरी रिठ आदी गावांचा समावेश आहे. परंतु येथील केंद्र प्रमुखाचे पद रिक्त असल्याने सध्या तिरंगम हे कारभार पाहत आहेत. या केंद्रांतर्गत आत्तापर्यंत १३ हजार क्विंटल धानाची खरेदी झाली आहे. परंतु अद्यापही ८ ते ९ हजार क्विंटल धानाचे बिल तयार करण्यात आले नाही.

ठळक मुद्देमोहली केंद्रावरील प्रकार : एक महिन्यापासून सोसायटीच्या परिसरात धान पडून

लोकमत न्यूज नेटवर्करांगी : धानोरा तालुक्यातील मोहली येथील आदिवासी विविध कार्यकारी संस्थेच्या वतीने धान खरेदी केली जात आहे. परिसरातील ९ गावातील शेतकऱ्यांनी येथे धान विक्रीसाठी आणला आहे. परंतु मागील अनेक दिवसांपासून धान खरेदी संथगतीने सुरू आहे. विक्री केलेल्या धानाचेही चुकारे मिळण्यास विलंब होत आहे. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत.मोहली येथील धान खरेदी केंद्रांतर्गत मोडेभट्टी, मोहली, मेटेजांगदा, सीताटोला, चिंगली, सिनसूर, आस्वलपार, रामपुरी रिठ आदी गावांचा समावेश आहे. परंतु येथील केंद्र प्रमुखाचे पद रिक्त असल्याने सध्या तिरंगम हे कारभार पाहत आहेत. या केंद्रांतर्गत आत्तापर्यंत १३ हजार क्विंटल धानाची खरेदी झाली आहे. परंतु अद्यापही ८ ते ९ हजार क्विंटल धानाचे बिल तयार करण्यात आले नाही. एक ते दीड महिन्यापासून शेतकरी बिलाच्या प्रतीक्षेत आहेत. परिणामी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाले नाही. येथील व्यवस्थापक एल. पी. लेनगुरे यांचेही याकडे दुर्लक्ष असल्याने व ते मनमानीपणे कारभार करीत असल्याने शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. खरेदी केलेल्या धानाची उचल होत नसल्याने इतर शेतकºयांना धान विक्री करण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. येथील खरेदी झालेल्या धानासंदर्भात ऑनलाईन काम बरोबर होत नसल्याने हुंडी तयार झाली नाही. त्यामुळे शेतकºयांचे चुकारे अडले आहेत. मागील एक महिन्यापासून खरेदी केंद्रावर धान पडून आहे. हजारो क्विंटल धान पडून असतानाही काटा केला जात नाही. काटा करण्यासाठी शेतकºयांना वारंवार हेलपाटे मारावे लागतात. त्यामुळे या संपूर्ण प्रकाराची चौकशी करावी, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे. या संदर्भात आदिवासी विविध कार्यकारी संस्थेचे संचालक तथा जि. प. उपाध्यक्ष मनोहर पोरेटी यांची विचारणा केली असता, या खरेदी केंद्राचा कारभार दुसऱ्याकडे सोपविण्यात येईल. सोसायटीत पडलेल्या धानाचे काटे करून बिल बनविले जाईल. हुंड्या तयार करून शेतकºयांना न्याय देण्यात येईल, असे सांगितले.