शहरं
Join us  
Trending Stories
1
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
2
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
3
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
4
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
6
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
7
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
8
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
9
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
10
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
11
कोकोने पटकावले पहिले फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम
12
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
13
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
14
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
15
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
16
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
17
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
18
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
19
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
20
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा

पिंपळगावात झाली यंत्राने धान रोवणी

By admin | Updated: July 17, 2014 00:07 IST

देसाईगंज तालुक्यातील आदर्श गाव असलेल्या पिंपळगाव (हलबी) येथे यंत्राच्या सहाय्याने भात रोवणीचा कार्यक्रम मंगळवारी पावसाच्या सरींसोबतच गावातील शेतकऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

देसाईगंज : देसाईगंज तालुक्यातील आदर्श गाव असलेल्या पिंपळगाव (हलबी) येथे यंत्राच्या सहाय्याने भात रोवणीचा कार्यक्रम मंगळवारी पावसाच्या सरींसोबतच गावातील शेतकऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती अतुल गण्यारपवार, पं. स. चे सभापती परसराम टिकले तसेच पिंपळगाव येथील आदर्श महिला विकास बचत गटाच्या अध्यक्ष व सरपंच सुहांगणा प्रधान, उपविभागीय कृषी अधिकारी तांबे, उपसरपंच मोहनलाल शेंडे, जिल्हा कृषी अधिकारी एस. टी. पठाण, वनव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माधव भोयर, ग्रा. पं. सदस्य ज्योती घुमडे, मंगला गेडाम, मंडळ अधिकारी सहारे, कृषी अधिकारी धोटे, आदी उपस्थित होते. याप्रसंगी कृषी सभापती अतुल गण्यारपवार यांनी शेतकऱ्यांना पारंपरिक शेती पद्धतीपासून दूर जाऊन आधुनिक तंत्रज्ञानाचा स्विकार करावा, असे आवाहन केले. जिल्ह्यात ३७ गटांना नव्या तंत्रज्ञानाची माहिती देऊन रोवणीचे कार्यक्रम राबविले जात आहे, असे सांगितले. सभापती परसराम टिकले यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तांबे यांनी तर संचालन तुषार पवार, आभार हिरालाल प्रधान यांनी मानले.(तालुका प्रतिनिधी)