शहरं
Join us  
Trending Stories
1
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
2
"मंदिरापासून ते स्मशानभूमीपर्यंत सगळ्यांना समान अधिकार हवा"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान
3
"PM मोदी युद्ध थांबवण्यात यशस्वी, जर ते लांबले असतं तर नुकसान झालं असतं"; चंद्राबाबू नायडूंनी केलं कौतुक
4
आजचे राशीभविष्य : ०९ जून २०२५; आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी, नोकरीत बढती संभवते
5
...तर गुप्ता, सुपेकरांची चौकशी होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
6
अमेरिकेतील हॉलीवूडचे शहर पेटले; पोलिसांवर फेकले दगड अन् फटाके, अवैध प्रवाशांविरुद्धच्या मोहिमेला प्रचंड विरोध
7
मोबाइल, लॅपटॉपमधून येणाऱ्या प्रकाशामुळेही तुम्हाला होऊ शकतो कॅन्सर; डॉक्टर म्हणतात, मोबाइल पाहणे थांबवाच
8
लाचखोर उपजिल्हाधिकारी, डीवायएसपी, तहसीलदार यांना अभय कोणाचे?; ३६६ प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत
9
पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांमध्ये ५० टक्के कौशल्याधारित शिक्षण, युजीसीकडून लवकरच मार्गदर्शक सूचना; विद्यार्थ्यांच्या रोजगार क्षमतेत होणार वाढ
10
यूपीपाठोपाठ दिल्लीत एन्काउंटरमध्ये वाढ, जूनच्या पहिल्या पाच दिवसांत पाच एन्काउंटर
11
नेपाळच्या ७ हजार लोकांना अमेरिका सोडावी लागणार, अमेरिकेने विशेष देशाचा दर्जा काढून घेतला
12
अंध वकिलाकडून सुप्रीम कोर्टात प्रथमच युक्तिवाद, भारतीय न्यायव्यवस्थेत ऐतिहासिक क्षण
13
जळक्या नोटा : न्या. वर्मांपुढे आता राजीनाम्याचाच पर्याय
14
मणिपूर पेटले, निदर्शकांनी अंगावर घेतले पेट्रोल ओतून
15
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
16
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
17
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
18
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
19
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
20
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...

१५ दिवसांपासून केंद्रावर धान पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2019 06:00 IST

घोट येथील मार्केटिंग फेडरेशनच्या केंद्रावर ४० किलोच्या कट्ट्यावर अडीच किलो अधिकचे धान्य घेतले जात आहे. याबाबत अनेक शेतकऱ्यांनी विरोध केला. त्यामुळे १५ दिवसांपासून सदर शेतकऱ्यांच्या धानाचा काटा करण्यात आला नाही. उलट व्यापाऱ्यांचे धान खरेदी केले जात आहे. या केंद्रावर भोंगळ कारभार सुरू असून शेतकऱ्यांचे धान तत्काळ खरेदीची सोय करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

ठळक मुद्देसिमुलतला परिसरातील शेतकरी त्रस्त : खासगी व्यापाऱ्यांना प्राधान्य असल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कघोट : महाराष्ट्र राज्य सहकारी मार्केटिंग फेडरेशनमार्फत सुरु असलेल्या घोट येथील विकास सहकारी भात गिरणीच्या धान खरेदी केंद्रावर व्यापाऱ्यांच्या धानाचा काटा लवकर करण्यात येतो. मात्र सर्वसामान्य शेतकऱ्यांचे धान मोजले जात नाही. त्यांना प्रतीक्षाच करावी लागते, असा आरोप सिमुलतला येथील शेतकऱ्यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेतून केला.घोट येथील मार्केटिंग फेडरेशनच्या केंद्रावर ४० किलोच्या कट्ट्यावर अडीच किलो अधिकचे धान्य घेतले जात आहे. याबाबत अनेक शेतकऱ्यांनी विरोध केला. त्यामुळे १५ दिवसांपासून सदर शेतकऱ्यांच्या धानाचा काटा करण्यात आला नाही. उलट व्यापाऱ्यांचे धान खरेदी केले जात आहे. या केंद्रावर भोंगळ कारभार सुरू असून शेतकऱ्यांचे धान तत्काळ खरेदीची सोय करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.अनेक शेतकरी येथील खरेदी केंद्रावर धानाची विक्री करण्याकरिता येत आहेत. परंतु त्यांच्या धानाचा काटा करण्यास विलंब होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून शेतकऱ्यांच्या धान खरेदीची योग्य सोय करावी, अशी मागणी माजी सरपंच श्यामल मंडल, विमल हाजरा, रतन पाईक, शेखर रॉय, भण्णाजीत मंडल, सुरेश मिस्त्री अमला बिश्वास, शंकर मल्लीक, निरंजन मैत्र, रंजीत मंडल, गौरंग हलदर आदी शेतकऱ्यांनी केली आहे.रेगडी आविका संस्थेचे कार्यालय व गोडावूनला ठोकले कुलूपचामोर्शी तालुक्यातील आदिवासी विकास महामंडळ उपप्रादेशिक कार्यालय घोट अंतर्गत येणाऱ्या रेगडी आविका संस्थेचे व्यवस्थापक भोंगळ कारभार करीत असल्याचा आरोप करीत शेतकऱ्यांनी गोडावून व कार्यालयाला कुलूप ठोकले. रेगडी खरेदी केंद्राअंतर्गत बोलेपल्ली, हेटलकसा, रेगडी, देवदा, गरंजी, वेंगनूर, पुल्लीगुंडम, अडंगेपल्ली, सुरगाव आदी नऊ गावे येतात. या संस्थेत व्यवस्थापक पदावर मनोहर भोवरे अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत. त्यांनी तीन वर्षांपासून प्रती कट्टा पाच रुपये प्रमाणे अवैध रक्कम शेतकऱ्यांकडून जमा केली तसेच २०१२-१३ व २०१६-१७ या दोन वर्षातील बारदाण्याची रक्कम शेतकऱ्यांना दिली नाही. शेतकऱ्यांकडून हमालीची रक्कमही घेतली, असा आरोप करीत शेतकऱ्यांनी सभा घेऊन १९ डिसेंबरला नारेबाजी करीत कार्यालय व धान गोडाऊनला कुलूप ठोकले. यासंदर्भात मनोहर भोवरे यांची विचारणा केली असता, चामोर्शीच्या सहायक निबंधकाकडून चौकशी झाली आहे. या चौकशीत काहीच तथ्य न आढळल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड