शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
2
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
3
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
4
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
5
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू
6
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया
7
IPL 2025 अंतिम सामन्यावरून मोठा गोंधळ; BCCIच्या 'या' निर्णयावर चाहते संतापले, नेमकं काय घडलं?
8
जबरदस्त! कंपनी असावी तर अशी, नफा होताच बोनस म्हणून दिली ७ महिन्यांची दिली सॅलरी
9
पुणे IED केस: ISIS साठी काम करणाऱ्या दोन जणांना NIA ने विमानतळावरून केली अटक
10
चर्चा युद्धबंदीची सुरू होती, रशियाने हल्ले वाढवले, प्रवाशांवर बॉम्ब टाकले; ९ जणांचा मृत्यू झाला
11
मनाविरुद्ध काही झालं की संताप होतो, चिडचिड होते? रागावर नियंत्रण मिळवण्याच्या ६ टिप्स
12
भयानक! तरुणाची स्टंटबाजी, वेगाने कार चालवून ४ जणांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
13
आता 'टीम इंडिया' पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणणार; श्रीकांत शिंदेंसह सुप्रिया सुळेंना जबाबदारी
14
"ओशो आश्रमात गेल्यावर बाबांनी.."; अक्षय खन्नाचा मोठा खुलासा, विनोद खन्नांविषयी काय म्हणाला?
15
Video: केदारनाथ धामला जाताना हेलिकॉप्टर क्रॅश; दैव बलवत्तर म्हणून वाचले
16
Coronavirus Outbreak: टेन्शन वाढलं! हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोनाचं थैमान, रुग्णांमध्ये मोठी वाढ; भारताला किती धोका?
17
Video - जॉर्जिया मेलोनींच्या स्वागतासाठी अल्बेनियाचे पंतप्रधान भर पावसात गुडघ्यावर बसले अन्...
18
"लग्नानंतर टिंडरवर अकाऊंट उघडून मी दोन तीन मुलींसोबत..."; अभिजीत सावंतची कबूली, म्हणाला-
19
UPI Lite, वॉलेट पेमेंट... युजर्सच्या पसंतीस का उतरत नाहीयेत हे नवे फीचर्स? कुठे येतेय समस्या
20
परेश रावल यांचा 'हेराफेरी ३'ला रामराम! सुनील शेट्टीनं सोडलं मौन, म्हणाला - "बाबू भैयाशिवाय श्याम..."

सहा हजार हेक्टरवर धान राेवणी पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 05:00 IST

धान राेवणी करण्यासाठी ११ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर पऱ्हे टाकण्यात आले आहे. राेवणीच्या कामाला सुरुवात करण्यासाठी माेठ्या पावसाची गरज भासते. मात्र अजूनही अपेक्षित पाऊस झालेला नाही. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे शेत सखल भागात तसेच ज्यांच्याकडे सिंचनाची सुविधा आहे अशानीच राेवणीला सुरुवात केली आहे. त्यामुळेच केवळ सहा हजार हेक्टर क्षेत्रावर धानाच्या राेवणीची कामे आटाेपली आहेत.

ठळक मुद्देदमदार पावसाची प्रतीक्षा : जिल्हाभरात १ लाख ६८ हजार क्षेत्रावर लागवड होणार

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : कृषी विभागाच्या अहवालानुसार जिल्ह्यात सहा हजार हेक्टर क्षेत्रावर धान राेवणीची कामे आटाेपली आहेत. अधूनमधून पावसाच्या सरी काेसळत असल्याने धान राेवणी सुरू असली तरी अजूनही शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा कायम येत आहे. यावर्षीच्या खरीप हंगामात सुमारे १ लाख ६८ हजार ४२० हेक्टर क्षेत्रावर धान पिकाची लागवड केली जाणार आहे. धान राेवणी करण्यासाठी ११ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर पऱ्हे टाकण्यात आले आहे. राेवणीच्या कामाला सुरुवात करण्यासाठी माेठ्या पावसाची गरज भासते. मात्र अजूनही अपेक्षित पाऊस झालेला नाही. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे शेत सखल भागात तसेच ज्यांच्याकडे सिंचनाची सुविधा आहे अशानीच राेवणीला सुरुवात केली आहे. त्यामुळेच केवळ सहा हजार हेक्टर क्षेत्रावर धानाच्या राेवणीची कामे आटाेपली आहेत. आता काही दिवसापूर्वी पाऊस झाल्याने राेवणीचे काम वेगात आले आहे. परिणामी मजूर मिळत नाही.

१५७९१ हेक्टरवर आवत्या 

धान राेवणीचा खर्च वाचविण्यासाठी काही शेतकरी आवत्या पद्धतीने धानाची राेवणी करतात. यावर्षी सुमारे १५ हजार ७९१ हेक्टर क्षेत्रावर आवत्या पद्धतीने धानाची लागवड करण्यात आली आहे. आवत्या बराेबरच काही शेतकऱ्यांनी यावर्षीपासून धानाच्या पेरणीला सुरुवात केली आहे. गडचिराेली तालुक्यात ३ हजार २६९, कुरखेडा ४७६, आरमाेरी ४ हजार १०४, चामाेर्शी ५५३, धानाेरा ३ हजार ८९, काेरची १ हजार, देसाईगंज १ हजार २१७, मुलचेरा १५९, भामरागड ३९८ हेक्टर क्षेत्रावर आवत्याची लागवड करण्यात आली आहे. 

सिराेंचा तालुक्यात पऱ्हे भरण्यास सुरुवात 

सिराेंचा तालुक्यात यावर्षी उशिरा पाऊस झाला. आता शेतकरी पऱ्हे टाकत आहेत. त्यामुळे धान राेवणीच्या कामाला सुरुवात हाेण्यास पुन्हा १५ दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. या तालुक्यात कापसाचे माेठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. त्यामुळे पावसाळ्याच्या सुरुवातीला शेतकरी कापसाच्या लागवडीत व्यस्त असल्याचे दिसून येतात. कापसाची लागवड झाल्यानंतर शेतकरी धान पिकाकडे वळतात. 

तळोधी, कुनघाडा परिसरातील  रोवणीला सुरुवाततळोधी (मो) : परिसरातील कुनघाडा रै, तळोधी (मो.), पाविमुरंडा परिसरातील रोवणीच्या कामांनी वेग घेतला आहे. आतापर्यंत पावसाने सातत्य राखल्याने पावसाच्या पाण्यावरच पऱ्हे व रोवणीची कामे केली जात आहेत. यावर्षी पिकांमध्ये मोहरा धानाच्या वाणाला पहिली पसंती असल्याचे दिसते. त्याचबरोबर ५५५, श्रीराम आणि अन्य वाणांच्या बीजाचे रोपण केले जात आहे. पुढेही पावसाने योग्य साथ दिली तर यावर्षी पूर्ण पीक येण्याची आशा शेतकऱ्यांना आहे. यावर्षी कोरोनाच्या संकटात डिझेल, पेट्रोलचे भाव अधिक झाल्याने शेतीकामासाठी ट्रॅक्टरचे भाडे वाढले असून, शेतकऱ्यांच्या खिशाला अधिकचा भार पडत आहे. पीक निघाल्यावर धानाचे भाव योग्य राहिल्यास शेतकऱ्यांचा हा अधिकचा खर्च भरून निघू शकतो, अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांमध्ये उमटत आहे.

 

टॅग्स :agricultureशेती