लोकमत न्यूज नेटवर्कगुड्डीगुडम : अहेरी तालुक्यातील गुड्डीगुडम व तिमरम परिसरात अनेक शेतकºयांचे धान पीक निसवा होण्याच्या मार्गावर आहे. मध्यम व जड प्रतिच्या धानाचा निसवा होण्याच्या कालावधीतच धानावर सफेद व लाल करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने धान पीक नष्ट होण्याच्या स्थितीत आहे. त्यामुळे या भागातील शेतकरी चिंताग्रस्त आहे. कृषी विभागाने या भागातील शेतकºयांना योग्य सल्ला द्यावा, अशी मागणी होत आहे.गुड्डीगुडम व तिमरम परिसरातील शेतकºयांनी रोगापासून पिकाचा बचाव करण्याकरिता एक ते दोन वेळा फवारणी केली. तरीसुद्धा रोग आटोक्यात आला नाही. सध्या हलक्या प्रतिच्या धानाचा निसवा झालेला आहे. बहुतांश ठिकाणी कापणीही सुरू आहे. काही दिवसांतच मध्यम प्रतिच्या धानाची कापणी होणार आहे. सध्या जड प्रतिच्या धानाचा निसवा होण्याची स्थिती निर्माण झाली आहे. परंतु अशा स्थितीतच अनेक रोगांची लागण पिकांना झाली आहे. सफेद व लाल करप्याचा बंदोबस्त करण्यात शेतकरी अपयशी ठरला आहे. चार ते पाच दिवसांत उर्वरित पीक नष्ट होण्याची स्थिती निर्माण झाली आहे. या भागातील शेतकºयांनी दोन ते तीन वेळा फवारणी केली. परंतु रोग आटोक्यात आला नाही.शेतकºयांनी कृषी केंद्र चालकांकडून मार्गदर्शन घेऊन उपाययोजनात्मक फवारणी केली. तरीसुद्धा काहीच उपयोग झाला नाही. उलट शेतकºयांचा खर्च वाया गेला. या भागातील शेतकºयांचे पीक नष्ट होण्याची शक्यता असल्याने कृषी विभागाने शेतकºयांना योग्य मार्गदर्शन करावे, त्यांना रोगाच्या बंदोबस्तासाठी सल्ला द्यावा, अशी मागणी परिसरातील शेतकºयांनी प्रशासनाकडे केली आहे.
धान पीक रोगांच्या कचाट्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 01:04 IST
अहेरी तालुक्यातील गुड्डीगुडम व तिमरम परिसरात अनेक शेतकºयांचे धान पीक निसवा होण्याच्या मार्गावर आहे. मध्यम व जड प्रतिच्या धानाचा निसवा होण्याच्या कालावधीतच धानावर सफेद व लाल करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने धान पीक नष्ट होण्याच्या स्थितीत आहे.
धान पीक रोगांच्या कचाट्यात
ठळक मुद्देगुड्डीगुडम-तिमरम परिसर : पांढºया व लाल करप्याने वाढविली शेतकºयांची चिंता