शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

पावसाने धान चिंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 00:20 IST

जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून ढगाळी वातावरण कायम असून सोमवारी पहाटे व सायंकाळच्या सुमारास जिल्ह्याच्या विविध भागात अवकाळी पाऊस बरसल्याने रबी पिकांसह धान पुंजन्यांचे नुकसान झाले.

ठळक मुद्देशेतकरी संकटात : ढगाळ वातावरणाने रबी पिकांचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून ढगाळी वातावरण कायम असून सोमवारी पहाटे व सायंकाळच्या सुमारास जिल्ह्याच्या विविध भागात अवकाळी पाऊस बरसल्याने रबी पिकांसह धान पुंजन्यांचे नुकसान झाले. कुरखेडा, देसाईगंज, चामोर्शी तालुक्यात केंद्रावर विक्रीसाठी आणलेला धान भिजल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.कुरखेडा : सोमवारी पहाटेच्या सुमारास झालेल्या अवकाळी पावसामुळे कुरखेडा तालुक्यातील गोठणगाव, आंधळी, सोनसरी, येंगलखेडा व कुरखेडा या केंद्राच्या परिसरात ठेवलेले धानाचे पोते भिजले. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. धानाची विक्री करण्यासाठी कुरखेडा परिसरातील शेतकºयांनी विविध केंद्रांवर आपले धान आणले. तीन ते चार गाव मिळून महामंडळाच्या वतीने एक धान खरेदी केंद्र मंजूर करण्यात आले. त्यामुळे एका गावाला आठवड्यातून केवळ एक दिवस धानाचा काटा करण्यासाठी मिळतो. अनेक शेतकरी थेट शेताच्या शेतातून आविकाच्या केंद्रांवर धान विक्रीसाठी आणतात. केंद्र परिसरात शेडची व्यवस्था नसल्याने खुल्या परिसरात धान ठेवले जाते. दरम्यान अवकाळी पाऊस झाल्याने शेतकºयांचे धान भिजून नुकसान झाले.विसोरा : ढगाळी वातावरणामुळे देसाईगंज तालुक्याच्या विसोरा भागासह अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस झाला. या पावसाने विसोरा भागातील अनेक शेतकºयांचे धान पुंजने ओले झाल्याने शेतकºयांचे नुकसान झाले. आॅगस्ट महिन्याअखेरीस झालेला पाऊस सप्टेंबर, आॅक्टोबर, नोव्हेंबर व आता डिसेंबर महिन्याचा पहिला आठवडा संपल्यानंतर पुन्हा परतला. तब्बल १०० दिवसांनी झालेल्या या पावासाच्या सरींनी शेतकºयांचे नुकसान केले. सद्य:स्थितीत धान उत्पादक शेतकºयांच्या धान मळणीचे काम अंतिम टप्प्यात आहे. अनेक शेतकºयांचे धान पुंजने अद्यापही शेतातच आहे. सोमवारी झालेल्या पावसाने धान पुंजने ओले झाले. नुकसानीच्या भितीपोटी आता शेतकरी हवालदिल झाला आहे. पेरणी, रोवणी, निंदन, कापणी, बांधणी व आता मळणी असे टप्पे शेतकºयांना पार करावे लागतात. सर्वत्र धान मळणीची लगबग सुरू असल्याने बहुतांश शेतकऱ्यांना वेळेवर मळणी यंत्र उपलब्ध होत नाही. परिणामी धान पुंजने तसेच शेतात ठेवावे लागतात. मळणीसाठी विलंब झाल्याने अनेक शेतकऱ्यांचे धान पुंजने सोमवारी झालेल्या पावसात सापडले. पाऊस बंद होऊन कडक ऊन निघाल्यास धान पुंजने सडणार नाहीत. मात्र पुन्हा पाऊस झाल्यास धानाचे नुकसान निश्चित आहे. बळीराजा आता सुर्योदयाची आशा बाळगूण आहे. ढगाळ वातावरण व अवकाळी पावसाने रबी हंगामातील तूर, मूग, लाखोळी, उडीद आदीसह भाजीपाला पिकांचेही नुकसान झाले आहे.आष्टी : आष्टी येथे सायंकाळी ६.४० वाजताच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. या पावसाचा फटका कापूस, तूर पिकांना बसला आहे. आष्टी भागात आज सकाळपासूनच ढगाळी वातावरण कायम होते. अवकाळी पावसाने या भागातील शेतकरी पुन्हा अडचणीत सापडला आहे. आष्टी भागाला मेघगर्जनेसह झालेल्या पावसाने चांगलेच झोडपले. त्यामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाले.सायंकाळच्या सुमारास देसाईगंज तालुक्याच्या विसोरा, शंकरपूर येथे पावसाला सुरूवात झाली आहे. देसाईगंज तालुक्यात १.०, कोरची तालुक्यात ६.३ पाऊस झाल्याची नोंद आपत्ती व्यवस्थापन विभागाने घेतली आहे. अवकाळी पाऊस व ढगाळी वातावरणामुळे टमाटर पिकासह इतर भाजीपाला पिकांना फटका बसला. शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाईची मागणी होत आहे.

टॅग्स :Marketबाजार