शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

शासन व संस्थेच्या नावाखाली पानठेला चालकांकडून पैसे उकळणाऱ्यास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2020 15:16 IST

राज्य शासन, जिल्हा प्रशासन व सर्च संस्थेच्या नावाखाली खेड्यापाड्यातील पानठेला चालकांकडून अवैधरित्या पैसे लुबाडणाऱ्या इसमास धानोरा पोलिसांनी अटक केली.

ठळक मुद्दे तपासणी पथकात असल्याची बतावणी करून लूटचार दिवसांचा पीसीआर

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : राज्य शासन, जिल्हा प्रशासन व सर्च संस्थेच्या नावाखाली खेड्यापाड्यातील पानठेला चालकांकडून अवैधरित्या पैसे लुबाडणाऱ्या इसमास धानोरा पोलिसांनी अटक केली. जिल्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. इम्रान शेख रा.गडचिरोली असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

तंबाखू नियंत्रण कायद्याची अंमलबजावणी झाल्यापासून जिल्ह्यातील पानठेले बंद आहेत. परंतु अजूनही जिल्ह्यातील पानठेला चालकांकडून तंबाखू व खर्रा विक्री सुरूच आहे. त्यामुळे प्रशासन पानठेले, दुकानांची तपासणी करून तंबाखूजन्य पदार्थ जप्त करीत आहे. हीच बाब हेरून पानठेला चालक-मालक या बनावट संघटनेचा अध्यक्ष असलेल्या इम्रान शेख आपल्या साथीदारांसोबत खेड्यापाड्यात जाऊन पानठेला चालकांकडून पैसे वसूल करीत होता. आम्ही सर्च संस्थेतून, जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या तंबाखू नियंत्रण विभागातून आल्याचे सांगत तो पानठेला चालकांकडून रक्कम वसूल करायचा. तसेच बनावट शिक्का व स्वाक्षरी असलेली पावती देखील शेख पानठेला चालकांना द्यायचा. याबाबतची माहिती जिल्हा तंबाखू सल्लागार डॉ. नंदू मेश्राम यांना कळताच प्रकरणाची शहानिशा करून त्यांनी धानोरा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार धानोरा पोलिसांनी इम्रान शेख व अन्य दोघांवर ३० सप्टेंबर रोजी भादंविचे कलम ४६५,४६९, ४७२, ४२०, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला.

गुन्हा दाखल झाल्यापासून इम्रान शेख फरार होता. दरम्यान धानोरा पोलिसांनी तपासचक्र फिरवून इम्रान शेखला अटक केली. त्याला गडचिरोलीच्या जिल्हा न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.कोरोना संसर्गामुळे पानठेले बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाच्या वतीने सर्व पानठेलाधारकांना देण्यात आले आहे. असे असतानासुद्धा काही पानठेलाधारक छुप्या मार्गाने सुगंधित तंबाखू व खर्राची विक्री करीत आहेत. दरम्यान गडचिरोली शहरासह अनेक ठिकाणच्या चौकात ‘खर्रा पाहिजे काय’ असे दबक्या आवाजात शौकीनांना पानठेला चालकांकडून विचारले जात आहे.

भूलथापांना बळी पडू नका; पोलिसांचे आवाहनशासनाच्या नावावर पानठेला चालकांकडून अवैधरित्या रक्कम वसूल करण्याचा गोरखधंदा सुरु असून सामान्य जनता व शासनाची फसवणूक केल्या जात आहे. अशा कोणत्याही व्यक्तीस, संघटनेच्या भूलथापांना बळी पडू नका. आजपावेतो अशा प्रकारे फसवणूक झालेले पानठेलाधारक पावतीसह धानोरा पोलीस ठाण्यात येऊन गुन्ह्याच्या तपासकामी सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस विभागाने केले आहे.

संघटनेची नोंदच नाहीपानठेला चालक-मालक संघटना या नावाने गडचिरोली जिल्ह्यामध्ये सहायक धर्मदाय आयुक्त यांच्या कार्यालयात कुठेही नोंद नाही. या संघटनेच्या कोणत्याही स्वयंघोषित पदाधिकारी यांना तंबाखू विषयी कारवाई करून दंडात्मक रक्कम वसूल करण्याचे कोणतेही अधिकार शासनाने प्रदान केले नाही. आरोपी इम्रान शेख यांनी पानठेलाधारकांना दंडात्मक कारवाई करीत असल्याचे भासवून पैसे वसूल केले आहे. तसेच काही दिवसांपूर्वी संघटनेच्या नावावर पैसे उकळून पानठेलाधारकांची सर्रास फसवणूक केली आहे. यामुळे पानठेलाधारकांनी आरोपीप्रती रोष व्यक्त केला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी