शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टीने शेकडो घरे जमीनदोस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2018 23:44 IST

१५ आॅगस्टपासून जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेकडो घरे जमीनदोस्त झाली आहेत. महसूल विभागाने झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण सुरू केले असून जमीनदोस्त झालेल्या एकूण घरांचा आकडा ३०० च्या वर जाण्याचा अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. घरांच्या पडझडीमुळे अनेक नागरिक बेघर झाले आहेत.

ठळक मुद्देमहसूल विभागामार्फत सर्वेक्षण सुरू : तात्काळ मदत देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा/जिमलगट्टा : १५ आॅगस्टपासून जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेकडो घरे जमीनदोस्त झाली आहेत. महसूल विभागाने झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण सुरू केले असून जमीनदोस्त झालेल्या एकूण घरांचा आकडा ३०० च्या वर जाण्याचा अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. घरांच्या पडझडीमुळे अनेक नागरिक बेघर झाले आहेत. या नागरिकांना शासनाने तत्काळ मदत द्यावी तसेच जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी होत आहे.१६ आॅगस्ट रोजी किष्टापूर नाल्याला पूर आल्याने किष्टापूर गावाला पाण्याचा वेढा बसला होता. नागरिकांनी इकडे तिकडे धाव घेत कसाबसा आपला प्राण वाचविला. मात्र पाळीव प्राणी, शेळ्या, मेंढ्या, कोंबड्या, गाय, बैल यांची जीवितहानी झाली. घरातील साहित्य पुराच्या पाण्यात वाहून गेले. घरात पाणी शिरल्याने मातीची घरे जमीनदोस्त झाली. शेडा गावालाही पुराने वेढा घातला होता. या गावातील २० घरे पाण्याखाली होती. या घरांमध्ये जवळपास चार फूट पाणी होते. किष्टापूर येथील बाजीराव बापय्या सिडाम यांचे घर कोसळले.जून ते आॅगस्ट या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सिरोंचा तालुक्यातील सुमारे ११८ घरांची पडझड झाली असून यामध्ये लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. तीन दिवसांपूर्वी सिरोंचा तालुक्यात अतिवृष्टी झाली. नदी, नाल्यांना आलेल्या पुराचे पाणी नागरिकांच्या घरामध्ये यामुळे घरांचे नुकसान झाले. सिरोंचा तालुका जंगलाने व्यापला आहे. परिणामी दरवर्षीच पुराचा फटका सिरोंचा तालुक्याला बसतो. अतिवृष्टीनंतर महसूल विभागाने केलेल्या पाहणीत सुमारे ११८ घरांची पडझड झाली असल्याचे दिसून आले आहे. त्याचबरोबर एक गाय, एक बैल व एक रेडा मृत्यूमुखी पडला आहे. महसूल विभागाच्या मार्फत सर्वेक्षण केले जात आहे. नुकसान भरपाईची मागणी होत आहे.

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर