लोकप्रतिनिधींवर तीव्र नाराजी : हजारोंच्या संख्येत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकलागडचिरोली : बिगर आदिवासींवर अन्याय करणारा पेसा कायदा रद्द करण्यात यावा, जिल्हा निवड मंडळ स्थापन करून वर्ग ३ व ४ च्या पदभरतीत स्थानिकांना प्राधान्य द्यावे, ओबीसींचे आरक्षण पूर्ववत १९ टक्के करावे आदी प्रमुख मागण्यांना घेऊन सुशिक्षीत बेरोजगार संघटना व विविध बिगर आदिवासी संघटनांच्यावतीने आज गुरूवारी हजारोंच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाची सुरूवात येथील इंदिरा गांधी चौकातून करण्यात आली. या मोर्चासाठी बाराही तालुक्यातील बिगर आदिवासी संघटनांचे पदाधिकारी व नागरिक गडचिरोलीत दाखल झाले होते. शाळा, महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचीही या मोर्चात लक्षणिय उपस्थित होती. इंदिरा गांधी चौकात मोर्चेकरांच्या गर्दीमुळे वाहतूक प्रभावित झाली होती. मोर्चा निघण्यापूर्वी सुशिक्षीत बेरोजगार संघटना व बिगर आदिवासी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मोर्चाला संबोधित केले. प्रचंड जनसमुदाय असल्याने हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचण्यासाठी तब्बल २ तास लागले. या मोर्चात सुशिक्षीत बेरोजगार संघटनेचे अध्यक्ष भास्कर बुरे, संतोष बोलुवार, संदीप लांजेवार, लिलाधर भरडकर, अतुल मल्लेलवार, पराग महाजन, नितेश राठोड यांच्यासह माजी नगराध्यक्ष अॅड. राम मेश्राम, सुरेश पोरेड्डीवार, भुपेश कुळमेथे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख हरिष मने, ज्येष्ठ काँग्रेस नेते प्रकाश पोरेड्डीवार, भाजपचे जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे, भाजपचे ज्येष्ठ नेते बाबुराव कोहळे, प्रमोद पिपरे, रमेश भुरसे, प्रशांत वाघरे, प्रतिभा चौधरी, बेबी चिचघरे, जिल्हा परिषदेचे कृषी सभापती अतुल गण्यारपवार, जिल्हा परिषद सदस्य जगन्नाथ पाटील बोरकुटे, विश्वास भोवते, प्रा. अशोक इंदूरकर, अमोल मारकवार, नगरसेवक विजय गोरडवार, गडचिरोली न.प.चे गटनेते प्रा. राजेश कात्रटवार, बांधकाम सभापती आनंद श्रृंगारपवार, उपाध्यक्ष रमेश चौधरी, सचिन बोबाटे, संजय मेश्राम, अॅड. नितीन कामडी, माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्रसिंह चंदेल, जि.प. सभापती छाया कुंभारे, निरांजनी चंदेल, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख अरविंद कात्रटवार, मनसेचे जिल्हाध्यक्ष विश्वास देशमुख, राजेंद्र साळवे, राकाँचे हेमंत जंबेवार, देसाईगंज पं.स.चे सभापती परसराम टिकले, पं.स. सदस्य चांगदेव फाये, काँग्रेसचे नेते पंकज गुड्डेवार, भाऊसाहेब मडके बसपाचे जिल्हाध्यक्ष रमेश मडावी, सुनिल खोब्रागडे, शेषराव येलेकर, दादाजी चुधरी, प्राचार्य खुशाल वाघरे, प्राचार्य राजेंद्र लांजेकर, रजनिकांत मोटघरे, अनिल भांडेकर, राष्ट्रीय ओबीसी बहूजन महासंघाचे एम. डी. चलाख, सोनाली वरगंटीवार, वेणूताई ढवगाये, अरूण मुनघाटे, स्मिता मुनघाटे, आनंद श्रूंगारपवार, शरद देशमुख, डॉ. किशोर वैद्य, डॉ. प्रशांत चलाख, सतिश विधाते, महेंद्र ब्राम्हणवाडे, राजू खंगार, नितीन मुलकलवार, अरूण हरडे, संतोष बारसागडे, डॉ. रामकृष्ण मडावी, हलबा समाज संघटनेचे पदाधिकारी उदय धकाते, आम आदमी पक्षाचे योगेश गोहणे, नामदेव गडपल्लीवार, शालिकराम विधाते, गोविंदराव बानबले, पंडीतराव पुळके, पुरूषोत्तम झंझाळ, मनिष डांगोरे, रत्नदिप म्हशाखेत्री, आदी उपस्थित होते.सदर मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी सुशिक्षीत बेरोजगार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. तब्बल दीड ते दोन तास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चकऱ्यांनी पेसा कायद्याच्या विरोधात तीव्र नारेबाजी केली. त्यानंतर सुशिक्षीत बेरोजगार संघटना व बिगर आदिवासी संघटनांच्या शिष्टमंडळाने आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी रणजितकुमार यांना दिले. पेसा कायद्याविरोधात पुकारलेल्या या मोर्चाला व बंद आंदोलनाला भारतीय जनता पार्टी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, ओबीसी संघर्ष कृती समिती, रिपब्लीकन पार्टी आॅफ इंडिया, भाजपायुमो, एनएसयुआय, युवाशक्ती संघटना, गडचिरोली विधानसभा युवक काँग्रेस, सोनार समाज सेवा संस्था, सम्यक विद्यार्थी आंदोलन, मनविसे, नॅशनल स्टूडंट युनियन आॅफ इंडिया, जिल्हा महिला काँग्रेस यांच्यासह अनेक बिगर आदिवासी संघटनांनी पाठींबा दर्शविला होता. या मोर्चात कुरखेडा, कोरची, धानोरा, अहेरी, एटापल्ली, सिरोंचा, चामोर्शी, देसाईगंज, आरमोरी, या तालुक्यातील शेकडो नागरिक सहभागी झाले होते. वडधा व रांगी येथेही कडकडीत बंद ठेवण्यात आला होता. दरम्यान वडधा येथे पेसा कायद्याच्या शासन निर्णयाच्या प्रतीची जाळून होळी करण्यात आली. बिगर आदिवासी संघटनेचा मोर्चा असल्याने अनेक व्यावसायीकांनी आपली प्रतिष्ठाणे स्वयंस्फूर्तपणे बंद ठेवली होती. गडचिरोली शहरातील मुख्य बाजारपेठ, फुटपाथ परिसरातील दुकाने पूर्णत: बंद होती. कॉम्प्लेक्स परिसरातील दुकानेसुध्दा बंद ठेवण्यात आली होती. आंदोलनादरम्यान प्रचंड पोलीस बंदोबस्त होता. (स्थानिक प्रतिनिधी)
बिगर आदिवासी जनतेचा उद्रेक
By admin | Updated: August 14, 2014 23:42 IST