शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

सिझरदरम्यान कापली दुसरीच नस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2019 23:42 IST

सिझर करताना डॉक्टरांनी लघवीची नस कापल्याचा प्रकार जिल्हा सामान्य रूग्णालयात २५ मे २०१७ रोजी घडला. त्यामुळे आपल्याला शासनाकडून ५० लाख रुपयांची नुकसान भरपाई द्यावी, या मागणीसाठी पीडित महिला सुशोगीता मुकेश बेडोले रा. परसटोला ता. अर्जुनी जि. गोंदिया यांनी जिल्हा सामान्य रूग्णालयासमोर गुरूवारपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

ठळक मुद्देरूग्णालयासमोर आंदोलन : ५० लाख रुपये भरपाई देण्याची पीडित महिलेची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : सिझर करताना डॉक्टरांनी लघवीची नस कापल्याचा प्रकार जिल्हा सामान्य रूग्णालयात २५ मे २०१७ रोजी घडला. त्यामुळे आपल्याला शासनाकडून ५० लाख रुपयांची नुकसान भरपाई द्यावी, या मागणीसाठी पीडित महिला सुशोगीता मुकेश बेडोले रा. परसटोला ता. अर्जुनी जि. गोंदिया यांनी जिल्हा सामान्य रूग्णालयासमोर गुरूवारपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे.सुशोगीता हिला २४ मे २०१७ रोजी कुरखेडा ग्रामीण रूग्णालयात प्रसुतीसाठी भरती केले. तिला सिझर व पुढील तपासण्यासाठी गडचिरोली रूग्णालयात पाठविण्यात आले. २६ मे रोजी डॉ. चोखांदरे व डॉ. बोकडे यांनी सिजर केला. सिझर करतेवेळी लघवीची नस कापली. मात्र याबाबतची माहिती डॉक्टरांनी रूग्ण व नातेवाईकांना दिली नाही. त्यानंतर सुशोगीताला चंद्रपूर येथे हलविले. उपचार सुरू केले मात्र फारसा आराम झाला नाही. नळी बसविण्यात आली आहे. परंतु प्रत्येक महिन्याला नळी बदलवावी लागते. त्यामुळे पीडित महिला त्रस्त झाली आहे. डॉक्टरांवर कारवाई करावी, या मागणीसाठी उपोषण आंदोलन सुरू केले आहे. मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे.याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल रूडे यांना लोकमतने विचारणा केली असता, या प्रकरणाची चौकशी झाली आहे. वरिष्ठांकडून अभिप्राय मागितला आहे. वरिष्ठांनी या प्रकरणाची चौकशी करावी, असे पत्र वरिष्ठांना दिले आहे. महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य विमा योजनेंतर्गत मोफत उपचार करून दिला जाईल, अशी माहिती डॉ. रूडे यांनी दिली.

टॅग्स :Healthआरोग्य