कुरखेडा : तालुक्यातील गुरनोली येथे आदर्श गावाबाबत जनजागृती करणे व ग्रामविकास सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून या सप्ताहाचा शुभारंभ रविवारी करण्यात आला. सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी ग्रामपंचायत गुरनोली येथे आदर्श गावाच्या सप्तसूत्रीचे लोकार्पण करण्यात आले. या सप्तसूत्रीमध्ये नशाबंदी, नसबंदी, लोटाबंदी, कुर्हाडबंदी, o्रमदान, चराईबंदी, बोअरवेलबंदी या सप्तसूत्रीचा समावेश आहे. याबाबतची माहिती देणारे फलक व माहितीपत्रक संपूर्ण गावभर लावण्यात आले. याचे विधिवत उद्घाटन गावच्या सरपंच यांच्या हस्ते करण्यात आले. हंगामापूर्वची शेतीकामे o्रमदानाने करण्यात आली. यामध्ये शेतातील बांधाचे काम व शेणखत टाकणे ही सुध्दा कामे करण्यात आली. गुरनोली गावचे उपसरपंच राजन पाटील खुणे यांनी सांगितले की, आदर्श गाव योजना ही खेड्यांच्या विकासाला नवीन आकार व नवी दिशा देणारी आहे. या योजनेतून ग्रामीण भागाला स्वावलंबी होण्यास मदत होणार आहे. गावाच्या सर्वांगीण विकासाबरोबरच सामाजिक शिस्त सुधारून पथदर्शक व स्वावलंबन तसेच स्वयंपूर्ण गाव निर्माण करणे हे आदर्श गाव योजनेचे उद्दिष्ट आहे. राज्याने सुरू केलेली आदर्श गाव ही योजना देशाच्या इतर राज्याला मार्गदर्शक ठरत आहे. शेतीच्या विकासासोबतच गावाचा चेहरा बदलण्याची व विकास करण्याची ताकद या योजनेमध्ये आहे. या योजनेच्या यशस्वीतेसाठी गावात सामाजिक शिस्त व सामाजिक सौदार्य अत्यंत महत्वाच्या आहेत, असे सांगितले. गुरनोलीवासियांनी एकजुटीने प्रयत्न करून आदर्श गाव योजनेचा पुरस्कार मिळविला आहे. या गावाला पुरस्कार मिळण्यासोबतच या गावाचा विकास झाला आहे. नशाबंदी, लोटाबंदी, कुर्हाडबंदी, o्रमदान, चराईबंदी व बोअरवेलबंदी या केवळ आदर्श गावाच्या सप्तसुत्री नसून या सात बाबीमध्ये विकासाचे गुढ लपलेले आहे. या सात बाबींची अंमलबजावणी करून गावाचा विकास कसा होऊ शकतो. गावातील आरोग्य कसे चांगले राहून पर्यावरणाचा समतोल कायम राखता येते हे या गावाने प्रत्यक्षात उतरवून दाखविले आहे. या गावांचा आदर्श इतर गावांनी घेतल्यास जिल्ह्याचाच नव्हे तर संपूर्ण देशाचा विकास होण्यास वेळ लागणार नाही. (शहर प्रतिनिधी)
गुरूनोलीत विकास सप्ताहाचे आयोजन
By admin | Updated: June 2, 2014 01:13 IST