मुनगंटीवारांकडून दखल : सर्वेक्षणातून वगळले होतेआरमोरी : सन २०१३-१४ मध्ये दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे चुकीचे सर्वे करून पिकांची आणेवारी ५० टक्क्याच्यावर दाखविली होती. अनेक शेतकऱ्यांचे नुकसान यामुळे झाले होते. याला आरमोरीचे तहसीलदार व शेगाव टोली साजाचे तलाठी जबाबदार असल्याची तक्रार केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हंसराज अहीर यांच्याकडे करण्यात आली होती. यासंदर्भात सर्वेक्षणातून नावे वेगळलेल्या शेतकऱ्यांना व अनुदानापासून वंचित ठेवणाऱ्या शेतकऱ्यांचा अहवाल मागवून त्यांना सवलत देण्याचे ना. अहीर यांनी कळविले. तसेच वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही २ जून २०१५ ला जिल्हाधिकारी व तहसीलदार यांना पत्र पाठवून यासंदर्भातील अहवाल मागितला आहे, अशी माहिती राष्ट्रहित जनकल्याण संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोवर्धन काळे यांनी लोकमतला लेखी निवेदनातून दिली आहे. अनेक शेतकऱ्यांच्या तहसील व तलाठ्याकडे वाऱ्या सुरू असून त्यांनाही न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्याला लाभ देण्याचे आदेश
By admin | Updated: July 2, 2015 02:11 IST