लोकमत न्यूज नेटवर्कएटापल्ली : एटापल्ली तालुक्यातील एका आरोग्य उपकेंद्रात कार्यरत असलेल्या महिला आरोग्य कर्मचाऱ्याला स्थायी करून देण्याचे तसेच जिल्हा मुख्यालयी बदली करून देण्याचे आमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्तापित करणाऱ्या आरोपीस एटापल्ली पोलिसांनी ७ जून रोजी अटक केले आहे.रवीकिरण बाबुराव वनकर (४५) रा. बल्लारपूर जि. चंद्रपूर असे अटक झालेल्या आरोपीचे नाव आहे. पीडित महिला ही एटापल्ली तालुक्यातील एका आरोग्य उपकेंद्रात कंत्राटी तत्वावर कार्यरत होती. आरोपी व पीडित महिला दोघेही बल्लारपूर येथील असल्याने दोघांचीही ओळख झाली. या ओळखीचा गैरफायदा वनकर याने घेतला. वनकर हा कंत्राटदारीचा व्यवसाय करतो. त्याने पीडित महिलेला स्थायी करून देण्याचे तसेच जिल्हा मुख्यालयी बदली करून देण्याचे आमिष दाखविले. मागील पाच वर्षांपासून तो पीडित महिलेला गडचिरोली किंवा गोंडपिपरी येथे बोलावून शारीरिक संबंध प्रस्तापित करीत होता. पीडित महिलेसोबत लग्न करण्याचेही आश्वासन आरोपी वनकर याने दिले होते. पीडित महिलेकडून त्याने जवळपास एक ते दीड लाख रुपयेही लुबाडले. याबाबतची तक्रार पीडित महिलेने एटापल्ली पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली. आरोपीविरोधात पोलिसांनी १५ मे रोजी गुन्हा दाखल केला. ७ जून रोजी अटक केली. न्यायालयात हजर केले असता, आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. घटनेचा तपास प्रभारी ठाणेदार संजय राठोड करीत आहेत.तब्बल २० दिवसानंतर अटकमहिलेने तक्रार केल्यानंतर १५ मे रोजी आरोपी वनकर विरोधात एटापल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मात्र अटक केली नव्हती. १५ दिवसांचा कालावधी उलटूनही पोलीस आरोपीला अटक करीत नसल्याने पीडित महिलेला पोलिसांच्या कार्यपध्दतीबाबत शंका निर्माण झाली. तिने ६ जून रोजी जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. आरोपीला अटक का केली जात नाही, असा प्रश्न एटापल्ली पोलिसांना विचारला. पोलीस अधीक्षकांच्या आदेशानंतर दुसºयाच दिवशी म्हणजे, ७ जून रोजी पोलिसांनी आरोपी वनकर याला अटक केली आहे.
बदलीचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2019 23:47 IST
एटापल्ली तालुक्यातील एका आरोग्य उपकेंद्रात कार्यरत असलेल्या महिला आरोग्य कर्मचाऱ्याला स्थायी करून देण्याचे तसेच जिल्हा मुख्यालयी बदली करून देण्याचे आमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्तापित करणाऱ्या आरोपीस एटापल्ली पोलिसांनी ७ जून रोजी अटक केले आहे.
बदलीचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार
ठळक मुद्देआरोपीला अटक : एक लाख रुपयेही लुटले