शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

हुकूमशाही सरकारविरोधात आंदोलन उभारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2018 00:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : भाजप-सेना युती सरकारच्या चार वर्षाच्या कार्यकाळात महिला व युवतींवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. विद्यमान सरकार हे हुकूमशाही व हिटलरशाहीचे सरकार आहे. या हुकूमशाहीला आमचा विरोध आहे. त्यामुळे राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने संविधान बचाव, देश बचाव हा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. या कार्यक्रमादरम्यान सरकारच्या विरोधात आंदोलनही ...

ठळक मुद्देफौजीया खान यांची माहिती : राकाँतर्फे संविधान बचाव, देश बचाव कार्यक्रमाची जय्यत तयारी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : भाजप-सेना युती सरकारच्या चार वर्षाच्या कार्यकाळात महिला व युवतींवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. विद्यमान सरकार हे हुकूमशाही व हिटलरशाहीचे सरकार आहे. या हुकूमशाहीला आमचा विरोध आहे. त्यामुळे राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने संविधान बचाव, देश बचाव हा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. या कार्यक्रमादरम्यान सरकारच्या विरोधात आंदोलनही उभारण्यात येणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री फौजीया खान यांनी गडचिरोली येथे पत्रपरिषदेत दिली.राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने १७ जुलैला नागपूर येथे संविधान बचाव, देश बचाव हा कार्यक्रम राकाँचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या गडचिरोली जिल्ह्याच्या पूर्व नियोजनाबाबत रविवारी गडचिरोली येथील सर्कीट हाऊसमध्ये पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीच्या निमित्ताने फौजीया खान यांनी पत्रकार परिषद घेतली.यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या माजी प्रदेशाध्यक्ष सुरेखा ठाकरे, राजलक्ष्मी भोसले, जि.प.च्या बांधकाम सभापती भाग्यश्री आत्राम, महिला आघाडी अध्यक्ष सोनाली पुण्यपवार, राकाँचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, युनुस शेख आदी उपस्थित होते.यावेळी बोलताना फौजीया खान म्हणाल्या, भारतीय संविधानाच्या बचावासाठी राकाँच्या वतीने जम्बो कार्यक्रम आखण्यात आला आहे. यापूर्वी दिल्ली व मुंबई येथे पक्षाचे सर्व नेते व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शरदचंद्र पवार यांच्या नेतृत्वात हा कार्यक्रम पार पडला. नागपूर येथे १७ जून रोजी होणाऱ्या कार्यक्रमादरम्यान कार्यकर्ते मनुस्मृती व ईव्हीएम मशीनची होळी करणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेस