शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
2
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
3
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
4
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
5
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
6
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
7
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
8
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
9
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
10
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
11
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
12
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
13
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
14
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
15
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
16
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
17
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
18
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
19
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."

वनमहामंडळाला वनक्षेत्र देण्यास विरोध

By admin | Updated: July 16, 2014 00:10 IST

भंडारा जिल्ह्यातील कोका अभयारण्यासाठी वनविकास महामंडळाला गडचिरोली जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील वनविभागाचे वनक्षेत्र देण्याचे परिपत्रक रद्द न केल्यास शासनाविरूध्द आंदोलन उभारण्याचा इशारा

गडचिरोली : भंडारा जिल्ह्यातील कोका अभयारण्यासाठी वनविकास महामंडळाला गडचिरोली जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील वनविभागाचे वनक्षेत्र देण्याचे परिपत्रक रद्द न केल्यास शासनाविरूध्द आंदोलन उभारण्याचा इशारा जिल्हा जंगल कामगार सहकारी संस्था संघाचे अध्यक्ष माजी खासदार मारोतराव कोवासे यांनी दिला आहे. कोका अभयारण्यासाठी वनविकास महामंडळाची जागा वनविभागात देण्यात आली. आलापल्ली वनविभागातील वनक्षेत्र वनविकास महामंडळास हस्तांतरीत करण्याचा निर्णय २८ एप्रिल २०१४ च्या परिपत्रकानुसार घेण्यात आला आहे. घोट वनपरिक्षेत्रातील २९, चामोर्शी वनपरिक्षेत्रातील ९, पेडीगुडम वनक्षेत्रातील ४ असे ४२ वनक्षेत्र वनविकास महामंडळास हस्तांतरीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्या क्षेत्रात जंगलाची घनता ०.४ पेक्षा कमी आहे. अशाच क्षेत्रात वनविकास महामंडळाच्या मार्फतीने जंगल कटाई करून त्यावर नवीन जंगल निर्माण करणे व त्याचा विकास करण्याचे काम केले जाते. मात्र नियमाला फाटा देऊन गडचिरोली, गोंदिया, भंडारा, नागपूर व इतर अनेक जिल्ह्यातील घनदाट मौल्यवान, नैसर्गिक जंगल वनविकास महामंडळास देण्याचा निर्णय शासनाने १९ जून २०१४ च्या परिपत्रकातून घेतला आहे. राज्यातील एकंदरीत ३८९७७.९३९ हेक्टर वनक्षेत्र वनविकास महामंडळाला देण्याचा निर्णय महसूल व वनविभागाने २८ एप्रिल व १९ जून २०१४ रोजी देण्याचा निर्णय घेतला आहे. या शार्सन निर्णयामुळे कुपकटाईच्या माध्यमातून हजारो आदिवासी बांधवांना रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या जंगल कामगार सहकारी संस्थांपुढे अस्तित्वाचा प्रश्न उभा ठाकला आहे. जंगल कामगार सहकारी संस्थांच्या माध्यमातून वनविभागाला महसूल मिळतो व वनविभागाच्या निर्देशानुसारच कूपकटाईचे काम केले जातात. त्यावरही आता बंधन येणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)