शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी सक्तीच्या भूमिकेवरून साहित्यिक एकवटले; लेखक, कवी महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार परत करणार
2
Assembly Bypoll Result 2025: पोटनिवडणुकांचे निकाल! गुजरातमध्ये एका जागेवर आप भाजपाला टक्कर देतेय; पंजाबमध्ये संजीव अरोरा आघाडीवर
3
सोनम रघुवंशीला 'वाचवणारा आणि लपवणारा' लोकेंद्र तोमर कोण? राजा हत्याकांडात आणखी एक मोठा खुलासा
4
Devendra Fadnavis: राहुल गांधींना मेक इन इंडिया माहिती नाही, त्यांनी गृहपाठ करायला हवा; फडणवीसांचा टोला!
5
तुमचा पैसा 'रॉकेट' बनवणार! 'या' ५ म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याची हीच योग्य वेळ? पाहा संपूर्ण यादी!
6
पुतण्याच्या प्रेमात काकी झाली वेडी, पती आणि तीन वर्षांच्या मुलीला सोडलं, पुतण्यासोबत लग्न केलं
7
नितीशकुमारांची सत्ता धोक्यात? नव्या सर्व्हेतून धक्कादायक 'लाट'; बिहार निवडणुकीपूर्वीच....
8
Maharashtra Politics : ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसणार, भास्कर जाधव मोठा निर्णय घेणार?, संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
9
भारतासोबतच्या सिंधू जल करार वादात OIC ची एन्ट्री; ५७ इस्लामिक देशांचा पाकिस्तानच्या सूरात सूर
10
युनूस यांची खेळी, भारताविरोधी षडयंत्र; बांगलादेशात पाकिस्तानी ISI हस्तकाला मोठी जबाबदारी
11
जगभर: डोनाल्ड ट्रम्प याची 'दादागिरी', अमेरिकेत भारतीय प्राध्यापकांनाही ‘बंदी’!
12
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
13
पुण्याच्या नळ स्टॉप स्टेशनवरुन पकडली मेट्रो, प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याला ओळखलंत का?
14
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
15
Iran Israel War: इराण-इस्रायल युद्धाचा परिणाम नोकऱ्यांवरही, कंपन्यांमध्ये भरती प्रक्रिया थांबली; कर्मचारीही चिंतेत
16
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
17
Lalit Upadhyay: भारतासाठी दोन ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती!
18
पहिल्या कसोटीत इंग्लंडला एवढ्या धावांचं आव्हान दिल्यास भारताचा विजय निश्चित, असं आहे समीकरण 
19
राज्याचा दर्जा न दिल्यास सर्वोच्च न्यायालयात जाणार; फारुक अब्दुल्ला यांचा केंद्र सरकारला इशारा
20
महागाईचा काळ... बँक FD चे कमी व्याजदर! 'या' ५ सरकारी योजना तुमचं नशीब बदलतील, वाचा संपूर्ण माहिती

जुव्वी नाल्यावर रपटा बनविण्यास स्थानिकांचा विरोध

By admin | Updated: September 19, 2016 02:01 IST

भामरागड तालुक्यातील जुव्वी नाल्यावर रपटा बनविण्याचा निर्णय भूमकाल संघटनेने घेतला होता.

१० गावांच्या जनसभेत निर्णय : भूमकाल संघटनेवर विविध आरोपगडचिरोली : भामरागड तालुक्यातील जुव्वी नाल्यावर रपटा बनविण्याचा निर्णय भूमकाल संघटनेने घेतला होता. जुव्वी नाल्यातील पाण्याचा प्रवाह लक्षात घेता पाईप टाकून तयार करण्यात आलेला रपटा पावसाच्या पहिल्याच पाण्यात वाहून जाण्याची शक्यता असल्याने सदर रपटा केवळ फार्स ठरणार आहे. हे सर्व काही भूमकाल संघटना केवळ प्रसिध्दीसाठी करीत आहे. त्यामुळे रपटा निर्मितीस विरोध करीत असल्याचा निर्णय १७ सप्टेंबर रोजी आयोजित १० गावांच्या जनसभेमध्ये घेण्यात आला. जनसभेला भटपार, कवंडे, मिर्झापल्ली, जुव्वी, धोडराज, गोंगवाडा, परथीनार, दरदा, घोटपाडा, येनगुंडा या १० गावांमधील शेकडो नागरिक उपस्थित होते. भूमकाल संघटनेचे अरविंद सोवनी त्यांची पत्नी रश्मी सोवनी, दत्ता शिर्के व त्यांचे साथीदार मागील चार-पाच महिन्यांपासून या परिसरात येऊन नदी, नाल्यांवर पूल बांधून देण्याचे खोटे व फसवे आश्वासन देत आहे. भूमकाल संघटना कष्टकरी शेतकरी, शेतमजूर, आदिवासींच्या संघर्षाला दडपून टाकण्याचा प्रयत्न करीत आहेत. भूमकाल संघटनेचे एकही कार्यकर्ते या परिसरातील नाही. स्वत:च्या प्रसिध्दीसाठी खोट्या विकासाचा आव आणला जात आहे. जुव्वी नाला मोठा आहे. पावसाळ्यामध्ये या नाल्यामध्ये माणसापेक्षा अधिक पाणी राहते. त्यामुळे या नाल्यात पाईप टाकल्यास सदर पाईप पहिल्याच पावसात वाहून जातील. त्याचबरोबर या पाईपांवरूनही पाणी राहिल. त्यामुळे या रपट्याचा काहीच उपयोग होणार नाही. जागोजागी लोखंड, फुटलेल्या पाईपाचे तुकडे साचतील व मोठमोठे खड्डे पडतील. जे नागरिक आज सहजपणे पाण्यातून मार्गक्रमण करतात, ते खड्ड्यांमुळे शक्य होणार नाही. सलवा जुडूमचे कार्यकर्ते मधुकरराव यांच्याशी हात मिळवणी करून छत्तीसगडप्रमाणे महाराष्ट्रातही अंतर्गत युध्द भूमकाल संघटना छेडू पाहत आहे. विकासच करायचा असेल तर शिक्षण, स्वास्थ, रेशन, रोजगार या समस्या सोडविण्यासाठी भूमकाल संघटनेने झटावे, असा निर्णय जनसभेत घेण्यात आला. (प्रतिनिधी)