शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

सहकारी संस्थांचे धान उघड्यावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 23:51 IST

तालुक्यातील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेने खरेदी केलेल्या धानाची उचल आदिवासी विकास महामंडळाने केली नाही. सदर धान ताडपत्री झाकून उघड्यावरच ठेवण्यात आले असल्याने हे धान पावसाने भिजून खराब होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देउचल करण्याची मागणी : हजारो क्विंटल धान सडण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्ककुरखेडा : तालुक्यातील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेने खरेदी केलेल्या धानाची उचल आदिवासी विकास महामंडळाने केली नाही. सदर धान ताडपत्री झाकून उघड्यावरच ठेवण्यात आले असल्याने हे धान पावसाने भिजून खराब होण्याची शक्यता आहे. धानाची उचल करावी, अशी मागणी कुरखेडा पंचायत समितीचे सभापती गिरीधारी तितराम यांनी केली आहे.आदिवासी विविध कार्यकारी संस्थांनी धान खरेदी केले. मात्र काही संस्थांकडे गोदामाची व्यवस्था नाही. त्यामुळे धान उघड्यावर ठेवावे लागत आहे. संस्थांनी धान खरेदी केल्यानंतर सदर धान उचलण्याची जबाबदारी आदिवासी विकास महामंडळाची आहे. पावसाळ्यापूर्वी धान उचलणे आवश्यक होते. मात्र पावसाला सुरूवात होऊनही काही संस्थांचे धान उचलले नाही. चार वर्षांपूर्वी अशाच प्रकारे धानाची उचल करण्यात आली नव्हती. त्यामुळे लाखो क्विंटल धान सडले होते. धानाची दुर्गंधी येत होती. यामुळे शासनाचे कोट्यवधी रूपयांचे नुकसान झाले होते. यावर्षीही धानाची उचल न केल्यास पावसाने धान भिजून खराब होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आदिवासी विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन धानाची उचल करावी, अशी मागणी गिरीधारी तितराम यांनी केली आहे.ताडपत्री झाकून धान ठेवण्यात आले आहे. मात्र ही केवळ तात्पुरती सोय आहे. ताडपत्रीमधून पाणी शिरून धानाचे नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे धानाची उचल करणे आवश्यक आहे.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड