शहरं
Join us  
Trending Stories
1
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-रादजवर खोचक टीका
2
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
3
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
4
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
5
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
6
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
7
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
8
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
9
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
10
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
11
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
12
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
13
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
14
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
15
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
16
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
17
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
18
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
19
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
20
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण

रांगी येथे धान उघड्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2020 06:00 IST

आदिवासी विकास महामंडळाअंतर्गत आविका संस्था रांगीच्या वतीने येथील केंद्रावर आतापर्यंत १६ हजार ५८२ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली. यापैकी महामंडळाच्या वतीने केवळ दोन हजार क्विंटल धानाची राईस मिलर्समार्फत उचल करण्यात आली. त्यानंतर १४ हजार ५८२ क्विंटल धान शिल्लक राहिला. यापैकी ७ हजार क्विंटल धान गोदामात साठविण्यात आला.

ठळक मुद्देउचलच्या कामात दिरंगाई : अवकाळी पावसाने नुकसानीची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्करांगी : आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था रांगीच्या वतीने यंदाच्या खरीप हंगामात धानाची खरेदी रांगी येथील केंद्रावर करण्यात येत आहे. या केंद्रावर धानाची आवक वाढली असून गोदाम पूर्णत: भरले आहे. धान उचल करण्याच्या प्रक्रियेत दिरंगाई होत असल्याने साडेसात क्विंटलवर धान उघड्यावर आहे. परिणामी अवकाळी पावसाने हे धान भिजून नुकसानीची शक्यता आहे.आदिवासी विकास महामंडळाअंतर्गत आविका संस्था रांगीच्या वतीने येथील केंद्रावर आतापर्यंत १६ हजार ५८२ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली. यापैकी महामंडळाच्या वतीने केवळ दोन हजार क्विंटल धानाची राईस मिलर्समार्फत उचल करण्यात आली. त्यानंतर १४ हजार ५८२ क्विंटल धान शिल्लक राहिला. यापैकी ७ हजार क्विंटल धान गोदामात साठविण्यात आला. आता ७ हजार ५८२ क्विंटल धान केंद्राच्या परिसरात उघड्यावर ठेवण्यात आला आहे. अवकाळी पावसामुळे या धानाचे नुकसान होऊ नये, यासाठी संस्थेच्या कार्यालयाच्या वतीने ताडपत्री झाकून हे धान ठेवण्यात आले आहे.रांगी येथे खरेदी केलेले धान साठविण्यासाठी आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेकडे एकच गोदाम आहे. या केंद्राला परिसरातील निमगाव, बोरी, रांगी, मासरगाटा, निमनवाडा, खेडी आदी गावे जोडण्यात आली आहे. या सर्व गावातून सदर केंद्रावर अनेक शेतकरी आपले धान विक्रीसाठी आणतात. त्यामुळे अल्पावधीतच येथील एकमेव गोदाम धानाने पूर्णत: भरले. आता धान साठवणुकीसाठी कोणतीही जागा शिल्लक नाही. येथे आणखी एका गोदामाची निर्मिती करणे गरजेचे आहे. धानोरा तालुक्यातील अनेक आविका संस्थेच्या केंद्रांवर अशीच स्थिती आहे. यामुळे शेतकरी त्रस्त आहेत.व्यापाऱ्यांकडूनही खरेदीआदिवासी विकास महामंडळाअंतर्गत धानोरा तालुक्यात आविका संस्थेचे जवळपास १० केंद्र आहेत. या केंद्रांवर धानाची आवक मोठ्या प्रमाणात झाली असून काटा होण्यासाठी शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागत आहे. परिणामी काही शेतकरी व्यापाºयांना आपले धान विकत आहेत.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड