शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

आयटीआय कार्यशाळा व इमारतीचे लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2019 01:22 IST

येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकरिता इमारत व कार्यशाळेची निर्मिती करण्यात आली. गत सहा महिन्यांपासून इमारत उद्घाटनाच्या प्रतीक्षेत होती. सदर प्रशासकीय इमारत व कार्यशाळेचे लोकार्पण शुक्रवारी आदिवासी विकास व वने राज्यमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या हस्ते करण्यात आले.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांचे प्रतिपादन : दुर्गम भागातील विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा

लोकमत न्यूज नेटवर्कभामरागड : येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकरिता इमारत व कार्यशाळेची निर्मिती करण्यात आली. गत सहा महिन्यांपासून इमारत उद्घाटनाच्या प्रतीक्षेत होती. सदर प्रशासकीय इमारत व कार्यशाळेचे लोकार्पण शुक्रवारी आदिवासी विकास व वने राज्यमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्ष संगीता गाडगे, विशेष अतिथी म्हणून केंद्रीय जनजाती कार्य मंत्रालयाचे सचिव दीपक खांडेकर, राज्य आदिवासी विकास विभागाच्या सचिव मनीषा वर्मा, जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण नागपूरचे सहसंचालक चंद्रकांत निनाळे, भामरागड पंचायत समितीचे सभापती सुखराम मडावी, तहसीलदार कैलास अंडील, उपविभागिय पोलीस अधिकारी तानाजी बरडे, प्रकल्प अधिकारी नीरज मोरे उपस्थित होते. औद्योगिक प्रशिक्षण संस्था तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी वरदान ठरावी. यासाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा व प्रशिक्षण पूर्ण करावे. अधिकाधिक विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण पूर्ण केल्यास त्या विद्यार्थ्यांना रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील. आयटीआय झालेल्या विद्यार्थ्यांना विविध कंपन्यांमध्ये नोकरी नक्कीच मिळेल, असा आशावाद पालकमंत्र्यानी व्यक्त केला.भामरागड तालुक्याच्या दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना रोजगाराविषयी प्रशिक्षण घेण्यासाठी जिल्हास्तरावर तसेच अन्य ठिकाणी तालुकास्तरावर जावे लागत होते. परंतु आता येथे प्रशिक्षणासाठी कार्यशाळा व प्रशासकीय इमारत झाल्याने अधिकाधिक विद्यार्थ्यांना येथे प्रवेश घेता येईल. अनेक वर्षांपासून मिळालेल्या या संधीचा सदुपयोग करावा, असे प्रतिपादन उपस्थित मान्यवरांनी केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी अनंत सोनकुवर, संचालन प्रा.संतोष डाखरे, तर आभार प्राचार्य एस.बी.सत्तारी यांनी मानले.

टॅग्स :ministerमंत्री