शहरं
Join us  
Trending Stories
1
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
2
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
3
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
4
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
5
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
6
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
7
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
8
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
9
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
10
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
11
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
12
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
13
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
14
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
15
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
16
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
17
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
18
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
19
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
20
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर

५२ वर्षांत लढल्या फक्त दोन महिला उमेदवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2019 01:00 IST

महिलांनी आता सर्वच क्षेत्र व्यापले असले तरी गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्र त्यासाठी अपवाद ठरले आहे. या मतदार संघात गेल्या ५२ वर्षात झालेल्या १३ निवडणुकांमध्ये केवळ २ महिला उमेदवारांनी निवडणूक लढली.

ठळक मुद्दे१३ निवडणुका : १४५ पुरूष उमेदवार उतरले लोकसभेच्या रणसंग्रामात

अतुल बुराडे/विष्णू दुनेदार ।लोकमत न्यूज नेटवर्कविसोरा/तुळशी : महिलांनी आता सर्वच क्षेत्र व्यापले असले तरी गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्र त्यासाठी अपवाद ठरले आहे. या मतदार संघात गेल्या ५२ वर्षात झालेल्या १३ निवडणुकांमध्ये केवळ २ महिला उमेदवारांनी निवडणूक लढली. त्यांना अत्यल्प मतांवर समाधान मानावे लागले. एकीकडे जिल्ह्याच्या अनेक गावांमध्ये सरपंचपदी महिला असताना देशाचा कारभार चालविणाऱ्या संसदेचे प्रतिनिधीत्व एकदाही महिलेकडे येऊ नये? असा प्रश्न सहज पडल्याशिवाय राहात नाही.२००९ मध्ये चिमूर लोकसभा मतदार संघाचे नाव गडचिरोली-चिमूर मतदार संघ असे झाले. सन १९८० ला झालेल्या लोकसभेच्या सातव्या निवडणुकीत चिमूर लोकसभा मतदारसंघातून एकूण ९ उमेदवार रिंगणात होते. हे वर्ष चिमूर क्षेत्राच्या इतिहासात ऐतिहासिक ठरले. चिमूर लोकसभा मतदारसंघाच्या स्थापनेनंतर (स्थापना १९६७) प्रथमच एक महिला उमेदवार निवडणूक लढण्यास मैदानात उतरली होती. त्या होत्या चंद्रकला किसन जांभुळकर. विशेष म्हणजे त्यांनी अपक्षपणे ही निवडणूक लढली. पण त्यांना अवघी ३३९७ मते मिळाली. एकूण उमेदवारांमध्ये त्या सातव्या क्रमांकावर राहून पराभूत झाल्या. त्यावेळी या मतदारसंघातून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे विलास मुत्तेमवार विजयी झाले होते. त्यानंतर १९९१ च्या दहाव्या लोकसभा निवडणुकीत चिमूर मतदारसंघात प्रथमच सर्वात जास्त २१ उमेदवार खासदार बनण्यासाठी निवडणुकीत उतरले. त्यात दमयंतीबाई महादेवराव सोनेकुसरे या एकमेव महिला उमेदवार होत्या. त्यासुद्धा अपक्ष लढल्या. यावेळी मतांचे प्रमाण आणखी घसरले आणि जेमतेम १६५ मते मिळाली. आजपर्यंत या मतदार संघात एकूण १४७ उमेदवारांनी खासदारकीचे स्वप्न पाहात निवडणूक लढली. १४७ पुरूष उमेदवार होते.२८ वर्षांपासून महिला उमेदवार गायबआधीचा चिमूर लोकसभा मतदारसंघ (सन १९६७ ते सन २००९) आणि आताचा गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघ (२००९ पासून आतापर्यंत) यात आतापर्यंत १३ लोकसभा निवडणुका होऊन १३ खासदार झाले. सन २००९ पासून लोकसभा मतदारसंघ पुनर्रचना झाल्यावर चिमूरचे नाव बदलून झालेल्या गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघाचे दोन खासदार झाले. परंतू १९९१ च्या दहाव्या लोकसभा निवडणुकीनंतर आतापर्यंत गेल्या २८ वर्षात एकही महिला उमेदवार या मतदार संघात निवडणुकीच्या रिंगणात उतरली नाही. विशेष म्हणजे आजपर्यंत कोणत्याही राष्ट्रीय किंवा राज्य पक्षाने महिला उमेदवारांना या मतदार संघात संधी दिली नाही.

टॅग्स :Electionनिवडणूक